परभणी पाणीपुरवठा करताना सेलू नगरपालिकेची कसरत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 10, 2019 11:34 PM2019-06-10T23:34:09+5:302019-06-10T23:34:27+5:30

निम्न दुधना प्रकल्पाची पाणी पातळी झपाट्याने कमी झाल्याने सेलू शहराला पाणीपुरवठा करताना नगरपालिकेला चांगलीच कसरत करावी लागत आहे. तसेच वादळी वाऱ्यामुळे विजेचा वारंवार अडथळा निर्माण होत असल्याने नियोजन कोलमडले आहे.

Sailu Municipality's exercise during the supply of Parbhani water | परभणी पाणीपुरवठा करताना सेलू नगरपालिकेची कसरत

परभणी पाणीपुरवठा करताना सेलू नगरपालिकेची कसरत

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
सेलू (परभणी): निम्न दुधना प्रकल्पाची पाणी पातळी झपाट्याने कमी झाल्याने सेलू शहराला पाणीपुरवठा करताना नगरपालिकेला चांगलीच कसरत करावी लागत आहे. तसेच वादळी वाऱ्यामुळे विजेचा वारंवार अडथळा निर्माण होत असल्याने नियोजन कोलमडले आहे.
दिवसेंदिवस शहराचा चारही बाजूने विस्तार होत असून लोकसंख्या ५० हजार झाली आहे. शहरात नगरपालिकेने जवळपास ४ हजार नागरिकांना नळजोडणी दिली आहे. यावर्षी अत्यल्प पाऊस झाल्याने जमिनीतील पाणी पातळी खालावली आहे.
निम्न दुधना प्रकल्पही पूर्ण क्षमतेने भरला नाही. परिणामी शहरातील नागरिकांना नगरपालिकेच्या पाण्यावर अवलंबून रहावे लागत आहे. शहराला दोन महिन्यांपासून दुधना प्रकल्पाच्या मृत साठ्यातून शहराला पाणीपुरवठा करावा लागत आहे. त्यातच नदी काठावरील अनेक गावात भीषण पाणीटंचाई निर्माण झाल्याने तसेच परभणी व पूर्णा शहराला पाणी पुरवठा करण्यासाठी १ जून रोजी प्रकल्पाच्या मृत साठ्यातून १५ दलघमी पाणी नदीपात्रात सोडण्यात आले. सद्यस्थितीत सेलू शहराला दोन दिवसाआड पाणीपुरवठा करण्यात येत आहे. ४ दिवसापांसून वादळी वाºयासह पाऊस पडत असल्याने वीजपुरवठ्यावर परिणाम झाला आहे.
जलकुंभ भरण्यासाठी नगरपालिकेला तारेवरची कसरत करावी लागत आहे. त्यामुळे काही भागात २ दिवसआड सोडण्यात येणारे पाणी ३ दिवसाआड सोडण्यात येत आहे. मृतसाठ्यातून पाणी सोडल्याने दुधना प्रकल्पातील बॅकवॉटर परिसरातील १ कि.मी. अंतरावरील जमीन उघडी पडली आहे. दरम्यान, पाणीपुरवठा करताना नगरपालिका प्रशासनाची चांगलीच दमछाक होत आहे.
एकच विहीर पाण्याखाली : १४ विहिरी पडल्या उघड्या
४शहराला निम्न दुधना प्रकल्पातून पाणीपुरवठा करण्यात येतो. वाढीव पाणीपुरवठा योजनेचे पंपहाऊस प्रकल्पाजवळील देवला या गावालगत आहे. पंपहाऊसपर्यंत पाणी आणण्यासाठी प्रकल्पात १५ इंटेकवेल घेण्यात आल्या आहेत. प्रकल्पातून पाणी सोडल्यानंतर १४ इंटेकवेल कोरड्या पडल्या आहेत. सद्यस्थितीत केवळ एकच विहीर पाण्यात आहे. त्यामुळे पाणीपुरवठा करताना अडचणी निर्माण होत आहेत.
४शहराला पाणीपुरवठा सुरळीत होण्यासाठी देवला येथील शेतकऱ्यांनी स्वत:हून विद्युत मोटारी काढून घेतल्या आहेत. प्रकल्पातील पाणीसाठा कमी झाला असला तरी शहराला सुरळीत पाणीपुरवठा करण्यासाठी नगरपालिकेचे प्रयत्न सुरू आहेत. शहराला पाणी कमी पडू दिले जाणार नाही, असे नगराध्यक्ष विनोद बोराडे यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.
साडे तीन एमएलडी लागते पाणी
४शहराला दररोज तब्बल साडेतीन एमएलडी पाणी लागते. नगरपालिकेकडून ६ झोन करून परिसरानुसार २ दिवसाआड पाणीपुरवठा केला जातो. मात्र विजेचा वारंवार अडथळा निर्माण होतो. त्यामुळे जलकुंभ भरताना वेळ लागत आहे. परिणामी २ ऐवजी काही भागात ३ दिवसाआड पाणी येत आहे.

Web Title: Sailu Municipality's exercise during the supply of Parbhani water

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.