परभणी शहरात सायबर गुन्ह्यांविषयी कार्यशाळेस प्रतिसाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 18, 2018 12:39 AM2018-01-18T00:39:13+5:302018-01-18T00:39:26+5:30

जिल्हा पोलीस दलाच्या वतीने १७ जानेवारी रोजी घेण्यात आलेल्या सायबर गुन्ह्यांविषयीच्या जनजागृती कार्यशाळेस प्रतिसाद मिळाला. सुमारे २०० युवक -युवतींची यावेळी उपस्थिती होती.

Responding to the workshop on cyber crimes in Parbhani city | परभणी शहरात सायबर गुन्ह्यांविषयी कार्यशाळेस प्रतिसाद

परभणी शहरात सायबर गुन्ह्यांविषयी कार्यशाळेस प्रतिसाद

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : जिल्हा पोलीस दलाच्या वतीने १७ जानेवारी रोजी घेण्यात आलेल्या सायबर गुन्ह्यांविषयीच्या जनजागृती कार्यशाळेस प्रतिसाद मिळाला. सुमारे २०० युवक -युवतींची यावेळी उपस्थिती होती.
शिवाजी महाविद्यालयाच्या सभागृहात ही कार्यशाळा पार पडली. यावेळी आयसीआयसीआय बँकेचे विभागीय व्यवस्थापक सुमीत महाबळेश्वरकर आणि सायबर एक्सपर्ट संदीप गादिया यांनी विद्यार्थी व उपस्थितांना मार्गदर्शन केले. महाबळेश्वरकर यांनी बँके संदर्भात होणारे गैरव्यवहार, डेबीट कार्ड, क्रेडीट कार्ड, आॅनलाईन ट्रान्झेक्शन यातून होणाºया फसवणुकीची माहिती दिली. तर गादिया यांनी अकाऊंट हॅगिंक, हॅकिंक याबाबत माहिती देत फेसबुक, व्हॉटस्अ‍ॅप हाताळताना काय काळजी घ्यावी तसेच या माध्यमातून कोणते गुन्हे होऊ शकतात, याबाबत माहिती दिली. कार्यक्रमास अप्पर पोलीस अधीक्षक विश्व पानसरे, प्राचार्य बाळासाहेब जाधव, उपविभागीय पोलीस अधिकारी नारायण शिरगावकर, अनिल घेरडीकर, पोनि. सोहन माचरे, दहशतवाद विरोधी पथकाचे पंडित रेजीतवाड, पोलीस उपनिरीक्षक विवेक सोनवणे, गोपीनवार, कापुरे, बहात्तरे, भुसारे आदींची उपस्थिती होती. पोलीस निरीक्षक संजय हिबारे यांनी उपस्थित मान्यवरांचा सत्कार केला. सायबर सेलच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक सुजाता शानमे यांनी सूत्रसंचालन केले. सपोनि बी.पी. चोरमले यांनी आभार मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी बालाजी रेड्डी, गौस पठाण, संतोष व्यवहारे, वर्षा कोल्हेकर, रविकुमार भूमकर, राजेश आगाशे, राम घुले आदींनी प्रयत्न केले.

Web Title: Responding to the workshop on cyber crimes in Parbhani city

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.