परभणीत हमीभाव केंद्रांकडे शेतकºयांची पाठ

By लोकमत न्यूज नेटवर्क on Thu, January 04, 2018 12:29am

सोयाबीन उत्पादक शेतकºयांची बाजारपेठेत आर्थिक कोंडी होऊ नये, यासाठी राज्य शासनाने जिल्ह्यामध्ये ६ ठिकाणी हमीभाव खरेदी केंद्र सुरु केले. परंतु, त्यामध्ये असलेल्या जाचक अटी, नियम व निकषांमुळे शेतकºयांनी या केंद्रांऐवजी खाजगी बाजारपेठेतच आपले सोयाबीन विक्री केले. दोन महिन्यात या केंद्रावर केवळ २ हजार ५ क्विंटल सोयाबीनचीच विक्री झाली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क परभणी: सोयाबीन उत्पादक शेतकºयांची बाजारपेठेत आर्थिक कोंडी होऊ नये, यासाठी राज्य शासनाने जिल्ह्यामध्ये ६ ठिकाणी हमीभाव खरेदी केंद्र सुरु केले. परंतु, त्यामध्ये असलेल्या जाचक अटी, नियम व निकषांमुळे शेतकºयांनी या केंद्रांऐवजी खाजगी बाजारपेठेतच आपले सोयाबीन विक्री केले. दोन महिन्यात या केंद्रावर केवळ २ हजार ५ क्विंटल सोयाबीनचीच विक्री झाली आहे. यावर्षीच्या खरीप हंगामात जिल्ह्यामध्ये जवळपास २ लाख हेक्टर क्षेत्रावर सोयाबीनचा पेरा झाला होता. परंतु, जुलै, आॅगस्ट या दोन महिन्यात पावसाने उघडीप दिल्यामुळे सोयाबीनच्या उत्पादनात मोठी घट झाल्याचे दिसून आले. ज्या शेतकºयांनी उपलब्ध असलेल्या पाण्यावर सोयाबीन घेतले, त्यांना चांगले उत्पन्न झाले. मात्र गतवर्षी सारखी याहीवर्षी बाजारपेठेत सोयाबीन उत्पादकांची कोंडी होऊ नये, यासाठी राज्यशासनाने १० आॅक्टोबरपासून जिल्ह्यामध्ये पूर्णा, गंगाखेड, परभणी, मानवत, जिंतूर, सेलू या सहा ठिकाणी हमीभाव खरेदी केंद्र सुरु केले. या केंद्राच्या माध्यमातून ३ हजार ५० रुपये या हमीभाव दराने सोयाबीनची खरेदी केली जावू लागली. परंतु, नाफेडच्या निकष, अटी व नियमांनी सोयाबीन उत्पादक पुरता घायाळ झाला. हमीभाव केंद्राऐवजी खाजगी बाजारपेठेत आपले सोयाबीन विक्री करण्यास शेतकºयांनी पसंती दिली. जिल्ह्यातील ६ हमीभाव केंद्रावर दोन महिन्यांत केवळ २ हजार ५ क्विंटल सोयाबीनची खरेदी झाली आहे. गंगाखेडात खरेदीच नाही आॅक्टोबर महिन्यात जिल्ह्यातील ६ ठिकाणी हमीभाव खरेदी केंद्र सुरु करण्यात आले. या खरेदी केंद्रावर आतापर्यंत २ हजार ५ क्विंटल सोयाबीनची खरेदी झाली आहे. यामध्ये परभणी येथील खरेदी केंद्रावर ५६५ क्विंटल ५० किलो, मानवत ५५३ क्विंटल, जिंतूर ३८५ क्विंटल, सेलू २६२, पूर्णा ४० क्विंटल तर गंगाखेड येथील हमीभाव खरेदी केंद्रावर आतापर्यंत एक किलोचीही खरेदी करण्यात आलेली नाही.

संबंधित

स्थायी समितीतील बंडखोरांच्या तलवारी म्यान; ‘वाटा’घाटीनंतर मंगळवारी होणार बैठक
वक्फच्या ७ सदस्यांवर फौजदारी कारवाई करा; राज्य अल्पसंख्याक विभागाचे आदेश 
काकीनाडा दरोडा प्रकरणात 'चोर सोडून संन्याशाला शिक्षा'; संशयित प्रवासी मनमाड पोलिसांच्या ताब्यात
हर्षवर्धन जाधव यांच्या ‘शिवस्वराज्य’पक्षासमोर कायदेशीर पेच
मराठवाड्यात २५०० कि.मी. लांबीचे रस्ते

परभणी कडून आणखी

स्थायी समितीतील बंडखोरांच्या तलवारी म्यान; ‘वाटा’घाटीनंतर मंगळवारी होणार बैठक
वक्फच्या ७ सदस्यांवर फौजदारी कारवाई करा; राज्य अल्पसंख्याक विभागाचे आदेश 
काकीनाडा दरोडा प्रकरणात 'चोर सोडून संन्याशाला शिक्षा'; संशयित प्रवासी मनमाड पोलिसांच्या ताब्यात
हर्षवर्धन जाधव यांच्या ‘शिवस्वराज्य’पक्षासमोर कायदेशीर पेच
मराठवाड्यात २५०० कि.मी. लांबीचे रस्ते

आणखी वाचा