स्वागतासाठी प्लास्टीकचा वापर पाहताच रामदास कदम भडकले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 22, 2019 04:24 PM2019-06-22T16:24:58+5:302019-06-22T16:33:43+5:30

प्लास्टिक बंदी असतानाही प्लास्टिक येते कुठून? असा प्रश्न उपस्थित केला.

Ramdas Kadam furious on use of plastic for the welcome at Parabhani | स्वागतासाठी प्लास्टीकचा वापर पाहताच रामदास कदम भडकले

स्वागतासाठी प्लास्टीकचा वापर पाहताच रामदास कदम भडकले

Next

सेलू (परभणी ) :- येथील शिवसेनेच्यावतीने शेतकऱ्यांसाठी स्थापन करण्यात आलेल्या पीक विमा मदत केंद्राचे उद्घाटन व शेतकरी संवाद कार्यक्रम शनिवारी (दि. २२ ) दुपारी 1.30  वाजेच्या सुमारास सुरु झाला. यावेळी स्वागतासाठी प्लास्टिक लावलेले पुष्पगुच्छ समोर येताच पर्यावरण मंञी रामदास कदम चांगलेच भडकले. तहसीलदार बालाजी शेवाळे यांची त्यांनी चांगलीच खरडपट्टी काढत प्लास्टिक बंदी असतानाही प्लास्टिक येते कुठून? असा प्रश्न उपस्थित केला. कदम यांचा वाढलेला पारा पाहून संयोजकांसह उपस्थितीत शांतता पसरली. काही वेळ शेतकऱ्यांशी संवाद साधून कदम परभणीच्या दिशेने रवाना झाले.

शिवसेनेचे जिंतूर विधानसभा प्रमुख तथा जिल्हा परिषदेचे गटनेते राम पाटील खराबे यांच्या नियोजित संपर्क कार्यालयाच्या ठिकाणी शेतकऱ्यांच्या मदतीसाठी पीक विमा मदत केंद्राचे उद्घाटन पर्यावरण मंत्री रामदास कदम यांच्या हस्ते शनिवारी झाले. यावेळी राज्यमंत्री अर्जुन खोतकर जिल्हाप्रमुख ए जे बोराडे, सुरेश ढगे, राम खराबे पाटील ,रणजित गजमल ,रमेश डख, संदीप लहाने आदींची उपस्थिती होती. कदम व खोतकर यांचे मदत केंद्रात आगमन होताच संयोजकांनी स्वागतासाठी पुष्पगुच्छ समोर आणले. त्या पुष्पगुच्छा भोवती प्लास्टिक गुंडाळलेले दिसताच कदम भडकले. शासनाने प्लास्टिकवर बंदी घातली आहे. पर्यावरणासाठी आम्ही एवढे काम करत असताना तुम्ही प्लास्टीकाचा वापर करताय! असे म्हणून तहसीलदार बालाजी शेवाळे यांना समोर बोलावून हे प्लास्टिक येते कुठून? तुम्ही काय करताय ? असे प्रश्न विचारत धारेवर धरले. दरम्यान, संयोजकांनी कार्यक्रमास उपस्थित असलेल्या   शेतकऱ्यांना पाणी पिण्यासाठी प्लास्टिकचे ग्लास आणले होते. कदम यांचा राग पाहताच  संयोजकांनी प्लास्टिकचे ग्लास तेथून हलवले.

Web Title: Ramdas Kadam furious on use of plastic for the welcome at Parabhani

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.