केंद्र शासनाच्या सोयाबीन खरेदी केंद्रावर लागेना खरेदीचा मुहूर्त; कवडीमोल दराने शेतमालाची विक्री करावी लागल्याने शेतकरी हवालदिल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 26, 2017 01:47 PM2017-10-26T13:47:54+5:302017-10-26T13:52:39+5:30

केंद्र शासनाकडून किमान आधारभूत दराने सोयाबीन खरेदी केंद्र सुरू केल्याचे जाहीर करून १० दिवस उलटले. परंतु, मानवत येथील केंद्रावर अद्याप खरेदीचा मुहूर्त लागला नसल्याने शेतक-यांना अल्पदरात आपला शेतमाल विकावा लागत आहे.

The purchase of the Soybean procurement center of the Central Government delayed; Farmers will be relieved due to the sale of the farm at lower rate | केंद्र शासनाच्या सोयाबीन खरेदी केंद्रावर लागेना खरेदीचा मुहूर्त; कवडीमोल दराने शेतमालाची विक्री करावी लागल्याने शेतकरी हवालदिल

केंद्र शासनाच्या सोयाबीन खरेदी केंद्रावर लागेना खरेदीचा मुहूर्त; कवडीमोल दराने शेतमालाची विक्री करावी लागल्याने शेतकरी हवालदिल

googlenewsNext
ठळक मुद्देहमीभावाने शेतमाल विक्री करण्यासाठी खरेदी विक्री संघाकडे आॅनलाईन नोंदणी करणे अनिवार्य केले आहे. हमी भावापेक्षा खाजगी व्यापा-यांकडे कमी भाव मिळत आहे. परंतु, नाईलाजास्तव शेतक-यांना आपला शेतमाल विकावा लागत आहे.

मानवत (परभणी ) : केंद्र शासनाकडून किमान आधारभूत दराने सोयाबीन खरेदी केंद्र सुरू केल्याचे जाहीर करून १० दिवस उलटले. परंतु, मानवत येथील केंद्रावर अद्याप खरेदीचा मुहूर्त लागला नसल्याने शेतक-यांना अल्पदरात आपला शेतमाल विकावा लागत आहे. त्यामुळे तालुक्यातील सोयाबीन उत्पादक शेतक-यांचे कंबरडे मोडले आहे.  

केंद्र शासनाने मूग, सोयाबीनचे हमीभाव जाहीर केले. हमीभावाने शेतमाल विक्री करण्यासाठी खरेदी विक्री संघाकडे आॅनलाईन नोंदणी करणे अनिवार्य केले आहे. आतापर्यंत १७२ शेतक-यांनी नोंदणी केली असली तरी आर्द्रता जास्त असल्याने एकाही शेतक-याचा माल खरेदी केला नसल्याची माहिती मिळाली. शासनाकडून शेतक-यांना हमीभावाची शाश्वती दिली जात असली तरी प्रत्यक्षात खरेदी केंद्रावर खरेदी करताना अनेक अटी, निकषाचे ओझे शेतक-याच्या खाद्यांवर टाकले जात आहे. आपला माल विक्री केल्यानंतरही चुका-यासाठी तीन-तीन महिने ताटकळत रहावे लागत असल्याचा अनुभव शेतक-यांच्या पाठिशी आहे. 

एकीकडे जाचक अटींची पूर्तता करून नाकीनऊ आलेल्या शेतक-यांना नाफेडची खरेदी सुरू न झाल्याने खाजगी व्यापा-यांकडे मिळेल त्या भावात आपला माल विक्री करून मोकळे व्हावे लागत आहे. मूग, सोयाबीनची हमी भावात खरेदी सुरू न झाल्याने दीवाळी अंधारात काढणा-या शेतक-यांनी सोमवारपासून आपला माल बाजारात आणण्यास सुरुवात केली असली तरी हमी भावापेक्षा खाजगी व्यापा-यांकडे कमी भाव मिळत आहे. परंतु, नाईलाजास्तव शेतक-यांना आपला शेतमाल विकावा लागत आहे.

शेतक-यांना या आर्थिक कोंडीतून बाहेर पडण्यासाठी पुढे आड, मागे विहीर दिसू लागल्याने अनेक शेतक-यांनी सरकारच्या जाचक अटीत अडकायला नको म्हणून खाजगी व्यापा-यांकडे आपला माल खाली केला आहे. 
दहा वर्षापासूनचा शेती व्यवसाय आणि त्यापासून मिळणा-या उत्पादनाची तुलना केल्यास शेती सर्वात तोट्याचा व्यवसाय ठरत आहे. शेतीसाठी लागणारी औजारे, निविष्ठा यांचा खर्च दुपटीने वाढत असून शेतीमालाचा भाव घटत आहे. तालुक्यात सोयाबीन उत्पादनाचा विचार केल्यास शेतकºयाचे सर्वाधिक नुकसान झाले आहे. २००८ च्या तुलनेत सध्या सोयाबीन उत्पादनासाठी चौपट खच येत आहे. उत्पन्न निम्यावर आले आहे. 

सोयाबीनसाठी एकरी : येणारा खर्च
शेती कामासाठी येणा-या खर्चामध्ये दहा वर्षात मोठी वाढ झाली आहे. यामध्ये नांगरवटी, वखरणीसाठी २००८ या वर्षात २५० रुपये एवढा भाव होता. सध्या १ हजार रुपये एवढा भाव झाला आहे. रोटावेटरसाठी सध्या ५००, बियाणे २००८ साली ६०० रुपये तर सध्या २२०० रुपये तर पेरणी १०० रुपये तर सध्या ५०० रुपये, बीज प्रक्रिया १०० रुपये, तणनाशक दहा वर्षापूर्वी १००० रुपये, सध्या १ हजार रुपये, बुरर्शी नाशक ४०० ते ६००, फवारणी १०० ते ५००, कापणी ५०० ते २०००, काढणीसाठी ६० रुपये ते ९०० रुपये, बारदाना, वाहतूक, मजुरी १०० ते ५५० अशी वाढ झाली आहे. २००८ साली एक एकर सोयाबीनसाठी ३ हजार ५६० रुपये एवढा खर्च येत होता. तो सध्या ११ हजार रुपयांवर येऊन ठेपला आहे. परंतु, शेतक-यांच्या शेतीमालाच्या हमी भावात खर्चाच्या तुलनेत अपेक्षेप्रमाणे वाढ झाल्याचे दिसून येत नाही. शेतक-यांना आर्थिक फटका बसू नये, म्हणून हमी भाव खरेदी केंद्रावर खरेदी सुरू करण्याची मागणी शेतक-यांकडून केली जात आहे.


सोयाबीनच्या भावातील फरक
वर्ष                    हमीभाव             प्रत्यक्ष बाजारभाव
२००८-२००९        १३९०             १८०० ते २६००
२००९-२०१०        १३१०              २००० ते २७००
२०१०-२०११        १४४०              २१०० ते २८००
२०११-२०१२        १६९०              २४०० ते ५०००
२०१२-२०१३        २२४०            २३०० ते २५००
२०१३-२०१४        २५६०            २४५०ते ३७००
२०१४-२०१५        २५६०            २४०० ते ३३००
२०१५-२०१६        २६००             १८०० ते २८००
२०१६-२०१७        २७७५           १६०० ते २५००
२०१७-२०१८        ३०५०            १६०० ते २५००

Web Title: The purchase of the Soybean procurement center of the Central Government delayed; Farmers will be relieved due to the sale of the farm at lower rate

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Farmerशेतकरी