परभणी जिल्हा बँक अध्यक्षांच्या निवडणुकीचा मार्ग मोकळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 4, 2018 12:14 AM2018-04-04T00:14:45+5:302018-04-04T00:14:45+5:30

परभणी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी निर्वाचन अधिकारी म्हणून जिल्हा उपनिबंधक गणेश पुरी यांची नियुक्ती करण्यात आली असून, ते एक-दोन दिवसांत या संदर्भात निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करणार आहेत़

The path of elections for Parbhani district bank president is freed | परभणी जिल्हा बँक अध्यक्षांच्या निवडणुकीचा मार्ग मोकळा

परभणी जिल्हा बँक अध्यक्षांच्या निवडणुकीचा मार्ग मोकळा

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : परभणी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी निर्वाचन अधिकारी म्हणून जिल्हा उपनिबंधक गणेश पुरी यांची नियुक्ती करण्यात आली असून, ते एक-दोन दिवसांत या संदर्भात निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करणार आहेत़
परभणी जिल्हा बँकेची मे २०१५ मध्ये निवडणूक झाली होती़ या निवडणुकीत माजी आ़ रामप्रसाद बोर्डीकर व माजी मंत्री सुरेश वरपूडकर यांच्या जय तुळजाभवानी शेतकरी विकास पॅनलला १५ पैकी १२ जागा मिळाल्या होत्या़ तर या पॅनलचे ५ संचालक बिनविरोध निवडले गेले होते़ त्यामुळे पॅनलला २१ पैकी १७ जागा मिळाल्या होत्या़ माजी आ़ सुरेश देशमुख यांच्या पॅनलला ४ जागा मिळाल्या होत्या़ त्यानंतर झालेल्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत जय तुळजाभवानी शेतकरी विकास पॅनलचे कुंडलिकराव नागरे यांची निवड करण्यात आली होती़ नागरे यांचे ४ मार्च रोजी निधन झाले़ त्यामुळे जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले होते़ त्या अनुषंगाने प्रशासकीय पातळीवरून हालचालीही करण्यात आल्या़ या निवडणुकीसाठी निर्वाचन अधिकारी म्हणून जिल्हा उपनिबंधक गणेश पुरी यांची नियुक्ती झाल्याचे पत्र त्यांना ३ एप्रिल रोजी मिळाले़ त्यानंतर आता अध्यक्षपदाच्या निवडणुकीची अधिसूचना जिल्हा उपनिबंधक पुरी एक-दोन दिवसांमध्ये काढणार आहेत़ निवडणुकीच्या कार्यक्रमाची अधिसूचना सात दिवसांची असेल की पंधरा दिवसांची या संदर्भात मात्र स्पष्ट माहिती उपलब्ध होवू शकली नाही़
दरम्यान, जिल्हा परिषदेने जिल्हा बँकेतून आपले खाते काढले असल्याने त्याचा बँकेच्या व्यवहारावर निश्चितच परिणाम झाला आहे़ नूतन अध्यक्ष हे जिल्हा परिषदेचे बँक खाते परत जिल्हा बँकेत आणण्यासाठी प्रयत्न करणारे असावेत, या दृष्टीकोणातूनही चर्चा केली जात आहे़ त्याला कितपत यश मिळेल, हे आगामी काळातच समजणार आहे़
सुरेश वरपूडकर यांच्याच नावाची चर्चा
जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदासाठी सद्यस्थितीत माजी मंत्री सुरेश वरपूडकर यांच्याच नावाची चर्चा सुरू आहे़ मे २०१५ मध्ये झालेल्या निवडणुकीच्या वेळी माजी आमदार द्वय रामप्रसाद बोर्डीकर व कुंडलिकराव नागरे हे काँग्रेसमध्ये होते़ शिवाय माजीमंत्री सुरेश वरपूडकर हे देखील काँग्रेसमध्येच होते़ तसेच विरोधी पॅनलमधील माजी आ़ सुरेश देशमुख हे देखील काँग्रेसचेच नेते होते; परंतु, ही निवडणूक यावेळी पक्ष विरहित झाली असली तरी आज घडीला मात्र बँकेत वेगळे चित्र आहे़ गेल्या अनेक वर्षांपासून बँकेवर सत्ता असलेले माजी आ़ बोर्डीकर हे भाजपात गेले आहेत़ त्यामुळे बँकेच्या सत्तास्थापनेतील गणिते बदलू शकतात़
४काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसचे सदस्य एकत्र येऊन अध्यक्षपद पटकावू शकतात़ त्याचे नेतृत्व माजी मंत्री सुरेश वरपूडकर हेच करतील, अशी चर्चा आहे़ त्यांच्या मदतीला आ़ विजय भांबळे, आ़ बाबाजानी दुर्राणी हे राहतील, अशीही सहकार वर्तुळात चर्चा आहे़ त्यामुळेच वरपूडकर यांच्या नावाच्या चर्चेला अधिक बळ मिळत आहे़
४दुसरीकडे माजी आ़ बोर्डीकर हे वरपूडकर यांना सहकार्य करतात की आणखी वेगळी खेळी करतात, याकडे संपूर्ण परभणी व हिंगोली या दोन्ही जिल्ह्यांचे लक्ष लागले आहे़

Web Title: The path of elections for Parbhani district bank president is freed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.