परभणीत दगडफेक प्रकरणी तीन गुन्हे दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 22, 2018 12:40 AM2018-04-22T00:40:53+5:302018-04-22T00:41:21+5:30

कठुआ व उन्नाव येथील बालिकेवरील अत्याचाराच्या घटनेप्रमाणी पुकारलेल्या शहर बंद दरम्यान ६ बसवर दगडफेक करुन दीड लाख रुपयांचे नुकसान केल्या प्रकरणी कोतवाली आणि नानलपेठ पोलीस ठाण्यात तीन गुन्हे दाखल झाले आहेत.

In Parbhani's stone-throwing case | परभणीत दगडफेक प्रकरणी तीन गुन्हे दाखल

परभणीत दगडफेक प्रकरणी तीन गुन्हे दाखल

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : कठुआ व उन्नाव येथील बालिकेवरील अत्याचाराच्या घटनेप्रमाणी पुकारलेल्या शहर बंद दरम्यान ६ बसवर दगडफेक करुन दीड लाख रुपयांचे नुकसान केल्या प्रकरणी कोतवाली आणि नानलपेठ पोलीस ठाण्यात तीन गुन्हे दाखल झाले आहेत.
एमएच.२०/बीएल ११२५ या बसवर दगडफेक करुन काचा फोडल्याने बसचे २५ हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. या प्रकरणी अज्ञात तीन ते चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. तसेच एम.एच.२०/डी ३१३२, एम.एच. २०/बीएल ४०५६, एम.एच. २०/बीएल ३५०२ या तीन बसवर १० ते १५ जणांनी दगडफेक करुन ७० हजार रुपयांचे नुकसान केल्याप्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे. एम.एच.२०/बीएल ११०४ या बसवर झालेल्या दगडफेकीत १५ ते २० हजार रुपयांचे आणि एमएच २०/बीएल १२७० या बसवर झालेल्या दगडफेकीत बसचे ४० हजार रुपयांचे नुकसान झाल्या प्रकरणी नानलपेठ पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तींविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.

Web Title: In Parbhani's stone-throwing case

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.