परभणी: रबी हंगामात १७९ कोटींचे पीककर्ज वाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 27, 2019 12:10 AM2019-03-27T00:10:20+5:302019-03-27T00:10:59+5:30

जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दुष्काळी परिस्थितीत आर्थिक मदत व्हावी, यासाठी रबी हंगाम २०१८-१९ साठी ३१३ कोटी ४७ लाख रुपयांचे पीक कर्ज वाटप करण्याचे उद्दिष्ट देण्यात आले होते. त्यापैकी बँकांनी २२ हजार २३३ शेतकऱ्यांना १७९ कोटी १६ लाख रुपयांचे पीक कर्ज वाटप केले आहे. त्यामुळे यावर्षी बँकांनी पीक कर्ज वाटप करताना आखडता हात घेतल्याचे दिसून येत आहे.

Parbhani: Wheat distribution of 179 crores during Rabi season | परभणी: रबी हंगामात १७९ कोटींचे पीककर्ज वाटप

परभणी: रबी हंगामात १७९ कोटींचे पीककर्ज वाटप

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दुष्काळी परिस्थितीत आर्थिक मदत व्हावी, यासाठी रबी हंगाम २०१८-१९ साठी ३१३ कोटी ४७ लाख रुपयांचे पीक कर्ज वाटप करण्याचे उद्दिष्ट देण्यात आले होते. त्यापैकी बँकांनी २२ हजार २३३ शेतकऱ्यांना १७९ कोटी १६ लाख रुपयांचे पीक कर्ज वाटप केले आहे. त्यामुळे यावर्षी बँकांनी पीक कर्ज वाटप करताना आखडता हात घेतल्याचे दिसून येत आहे.
२०१७-१८ या आर्थिक वर्षात बँकांनी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पीक कर्ज वाटप करताना पुढाकार घेतला होता. त्यामुळे कर्ज वाटपाची टक्केवारी १०२ टक्क्यांपर्यंत गेली होती; परंतु, २०१८-१९ या आर्थिक वर्षात जिल्ह्यामध्ये दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली. त्यामुळे शेतकºयांना खरीप हंगामात पेरणी केलेल्या सोयाबीन, तूर, मूग, उडीद व कापूस या पिकांतून उत्पन्नच मिळाले नाही. त्यामुळे शेतकरी आर्थिक कोंडीत सापडला. त्यामुळे जिल्ह्यातील शेतकºयांना बँका दुष्काळी परिस्थितीत पुढाकार घेऊन मोठ्या प्रमाणात कर्ज वाटप करून आर्थिक मदत करतील, अशी अपेक्षा होती. त्यानुसार २०१८-१९ या वर्षासाठी राज्य शासनाने ३१३ कोटी ४७ लाख रुपयांचे रबी हंगामात पीक कर्ज वाटप करण्याचे उद्दिष्ट दिले होते. यामध्येही जिल्ह्यातील वाणिज्य बँकांनी १२ हजार २२ शेतकºयांना १२१ कोटी ५३ लाख रुपयांचे पीक कर्ज वाटप केले आहे. त्याच बरोबर खाजगी बँकांनी ९०३ शेतकºयांना १५ कोटी ३ लाख, महाराष्टÑ ग्रामीण बँकेने ३ हजार ६८३ शेतकºयांना २७ कोटी २३ लाख, जिल्ंहा मध्यवर्ती बँकेने ५ हजार ६२५ शेतकºयांना १५ कोटी ३७ लाख रुपयांचे वाटप केले आहे. त्यामुळे बँकांनी शेतकºयांची परिस्थिती लक्षात न घेता जिल्ह्यातील २२ हजार ३२३ शेतकºयांना केवळ १७९ कोटी १६ लाख रुपयांचे पीक कर्ज वाटप केले आहे.
त्यामुळे गतवर्षी जिल्ह्याचा पीक कर्ज वाटपाचा आलेख यावर्षी मात्र केवळ ५० टक्यावरच येऊन ठेपला आहे. त्यामुळे एकीकडे दुष्काळी परिस्थिती आणि दुसरीकडे बँकांनी पीक कर्ज वाटप करताना घेतलेला आखडता हात शेतकºयांना आर्थिक कोंडीत ढकलणाराच दिसून येत आहे.
खरीप : हंगामही ३० टक्क्यांवर
४जिल्ह्यातील बँकांनी यावर्षी खरीप पाठोपाठ रबी हंगामातही पीक कर्ज वाटप करताना आखडा हात घेतल्याचे दिसून येत आहे.
४२०१८-१९ या आर्थिक वर्षातील खरीप हंमागासाठी १४७० कोटी ४४ लाख रुपयांचे उद्दिष्ट देण्यात आले होते. त्यापैकी बँकांनी ८३ हजार ३८५ शेतकºयांना ४४० कोटी २७ लाख रुपयांचे वाटप केले आहे. त्याची टक्केवारी केवळ ३०.५ टक्के आहे.
४त्यामुळे बँकांनी खरीप हंगामापाठोपाठ रबी हंगामातही पीक कर्ज वाटपाकडे कानाडोळा केल्याचे दिसून येत आहे.

Web Title: Parbhani: Wheat distribution of 179 crores during Rabi season

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.