परभणी : सोळागाव पाणीपुरवठा योजनेचे पंधरा दिवसांपासून पाणी बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2019 12:18 AM2019-06-16T00:18:06+5:302019-06-16T00:18:40+5:30

जिंतूर तालुक्यातील निवळी धरणातून पाणीपुरवठा करणाऱ्या १६ गाव पाणीपुरवठा योजनेंतर्गतची विद्युत मोटार जळाल्याने १५ दिवसांपासून पाणीपुरवठा बंद आहे़ परिणामी बोरी व कौसडी येथील ग्रामस्थांना पाण्यासाठी दाहीदिशा भटकंती करावी लागत आहे़

Parbhani: Water closure for fifteen days of Solgaon Water Supply Scheme | परभणी : सोळागाव पाणीपुरवठा योजनेचे पंधरा दिवसांपासून पाणी बंद

परभणी : सोळागाव पाणीपुरवठा योजनेचे पंधरा दिवसांपासून पाणी बंद

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
बोरी (परभणी): जिंतूर तालुक्यातील निवळी धरणातून पाणीपुरवठा करणाऱ्या १६ गाव पाणीपुरवठा योजनेंतर्गतची विद्युत मोटार जळाल्याने १५ दिवसांपासून पाणीपुरवठा बंद आहे़ परिणामी बोरी व कौसडी येथील ग्रामस्थांना पाण्यासाठी दाहीदिशा भटकंती करावी लागत आहे़
यावर्षी दुष्काळी परिस्थिती निर्माण झाल्यामुळे गावातील हातपंप व विहिरींचे पाणी आटले आहे़ परिणामी जिंंतूर तालुक्यातील कौसडी, बोरी व इतर गावे या १६ गाव पाणीपुरवठा योजनेवर अवलंबून आहे़ मात्र ६ व ७ जून रोजी वादळी वाºयामुळे या योजनेचे विद्युत पोल पडल्यामुळे या योजनेचा विद्युत पुरवठा खंडित झाला आहे़ यामुळे बोरी व कौसडी येथे तीव्र पाणीटंचाई जाणवत आहे़ ग्रामस्थांना पाणी विकत घेण्याची वेळ आली आहे़ महावितरणने ग्रामस्थांची पाण्यासंदर्भात पाण्यासाठी होणारी गैरसोय तातडीने पावले उचलत वादळी वाºयात वीज खांबांचे व तारांचे झालेले नुकसान बाजुला सारत नव्याने ही यंत्रणा कार्यान्वित केली आहे; परंतु, विद्युत पुरवठा सुरळीत झाला असला तरी या योजनेंतर्गत पाणीपुवठा करणारी विद्युत मोटार जळाल्याने ही योजना सध्या बंद आहे़ महावितरणने ज्या प्रमाणे वीज दुुरुस्तीची कामे केली़ मात्र विद्युत मोटार जळाल्याने ग्रामस्थांचा पाणीपुरवठा बंद असून, ही संबंधित विभाग व यंत्रणा याकडे दुर्लक्ष करून ग्रामस्थांना दोन-तीन किमी पायपीट करून पाणी आणण्यास भाग पाडत आहे़ त्यामुळे याकडे तत्काळ संबंधित यंत्रणेने लक्ष देऊन ग्रामस्थांची पाण्यासाठी होणारी गैरसोय थांबवून न्याय द्यावा, अशी मागणी बोरी व कौसडी येथील ग्रामस्थांतून होत आहे दरम्यान, कधी विद्युत पुरवठ्यामुळे तर कधी वीज बिलामुळे तर कधी विद्युत उपकरणे जळाल्याने या योजनेंतर्गत होणारा पाणीपुरवठा वारंवार बंद पडत आहे़ ग्रामस्थांची पाण्यासाठी होणारी भटकंती दूर व्हावी, या उद्देशाने अंमलात आणलेली ही योजना प्रशासकीय यंत्रणेच्या उदासिन भूमिकेमुळे व निष्काळजीपणामुळे ग्रामस्थांसाठी गैरसोयीची ठरत आहे़ त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी या योजनेकडे लक्ष देऊन पाणीपुरवठा करताना येणाºया अडचणी दूर कराव्यात, अशी मागणी होत आहे़
प्रशासकीय मान्यतेत अडकला निधी
१६ गाव पाणीपुरवठा योजना सुरू करण्यासाठी जिल्हा परिषदेने सर्वसाधारण सभेत या योजनेच्या दुरुस्तीसाठी ५ लाख रुपयांचा निधी दीड महिन्यांपूर्वी मंजूर केला होता; परंतु, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडून हा निधी उचलण्यास मान्यता मिळत नसल्यामुळे तो अद्यापही उपलब्ध झालेला नाही़ परिणामी योजनेची विद्युत मोटार, विद्युत रोहित्र दुरुस्ती व इतर खर्चासाठी पैसे उपलब्ध नसल्याने दुरुस्तीची कामे वेळेवर होत नाहीत़ यामुळे सर्वसामान्य नागरिकांना पाण्यासाठी दाहीदिशा भटकंती करावी लागत आहे़ याबाबत जिल्हाधिकाºयांनी लक्ष देऊन येथील पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी आदेशित करून ग्रामस्थांची पाण्यासाठी होणारी गैरसोय दूर करावी, अशी मागणी होत आहे़

Web Title: Parbhani: Water closure for fifteen days of Solgaon Water Supply Scheme

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.