परभणी :गंगाखेड तालुक्यात भीषण पाणीटंचाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 25, 2019 12:12 AM2019-03-25T00:12:28+5:302019-03-25T00:14:03+5:30

तालुक्यातील नदी, नाले कोरडेठाक पडल्याने दिवसेंदिवस पाणीपातळी खालावत जाऊन जलस्त्रोत आटले आहेत. तालुक्यातील डोंगरी भागाबरोबर गोदावरी नदीकाठी असलेल्या गावातील नागरिकांना भीषण पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे.

Parbhani: Wasting water shortage in Gangakhed taluka | परभणी :गंगाखेड तालुक्यात भीषण पाणीटंचाई

परभणी :गंगाखेड तालुक्यात भीषण पाणीटंचाई

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
गंगाखेड : तालुक्यातील नदी, नाले कोरडेठाक पडल्याने दिवसेंदिवस पाणीपातळी खालावत जाऊन जलस्त्रोत आटले आहेत. तालुक्यातील डोंगरी भागाबरोबर गोदावरी नदीकाठी असलेल्या गावातील नागरिकांना भीषण पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे.
गेल्या काही वर्षांपासून अत्यल्प पर्जन्यमान होत असल्याने नदी, नाले, लघुपाझर तलाव, गोदावरी नदी पात्र व मासोळी प्रकल्प कोरडाठाक पडत आहेत. त्यामुळे भर हिवाळ्यातच गोदावरी नदीकाठी वसलेल्या गंगाखेड शहराबरोबर तालुक्यातील गावागावांत निर्माण होत असलेल्या पाणी टंचाईमुळे भीषण दुष्काळी परिस्थितीचा सामना करण्याची वेळ तालुकावासियांवर आली आहे. गत पाऊसाळ्यात सरासरीपेक्षा खूपच कमी पर्जन्यमान झाल्याने तालुक्यातील डोंगर भागात असलेल्या गावांबरोबरच गोदावरी नदी काठी असलेल्या गावांना ही नोव्हेंबर महिन्यातच पाणी टंचाई जाणवू लागली. तालुक्यातील डोंगरी व गोदावरी नदीकाठच्या २० ते २५ गावांचा समावेश आहे. यातील बहुतांश गावांत विहीर, बोअर अधिग्रहण करण्यासारखी परिस्थिती नसल्याने तालुक्यातील खंडाळी, पडेगाव, उमलानाईक तांडा, गोदावरी तांडा आदी गावातील ग्रामस्थांनी टँकरने पाणीपुरवठा करण्याची मागणी पंचायत समिती प्रशासनाकडे केली आहे.
५४ गावांत जलस्त्रोत अधिग्रहणाची मागणी
तालुक्यातील मालेवाडी, कासारवाडी, सुरळवाडी, गोदावरीतांडा, ढवळकेवाडी, कौडगाव, धरमनगरी, मरगीळवाडी, डोंगरगाव, डोंगरजवळा, वागदेवाडी, कोद्री, हरंगुळ, उंडेगाव, भगवानबाबा वस्ती, सिरसम, कर्लेवाडी, देवकतवाडी, खादगाव, वागदरा, वागदरातांडा, टाकळवाडी, खोकलेवाडी, मरडसगाव, बोर्डा, देवलानाईक तांडा, तांदुळवाडी, खोकलेवाडी, हनुमानवस्ती, उंबरवाडी, रुस्तुमनाईक तांडा, उंबरवाडी तांडा, मानकादेवी, पडेगाव, डुमनरवाडी, खंडाळी, राणीसावरगाव, पांगरी, चिमानाईक तांडा, लिंबेवाडी, धनगरमोहा, कातकरवाडी, गौडवाडी, गौळवाडी तांडा, ढेबेवाडी, गोपा, पांढरगाव, मानकादेवी, गोदावरीतांडा, खंडाळी, पडेगाव, उमलानाईक तांडा, नरळद, खळी या ५४ गावांनी विहीर व बोअर अधिग्रहणाबरोबर टँकरने पाणीपुरवठा करण्याची मागणी तालुका प्रशासनाकडे केली आहे.
ग्रामस्थांना लिकेज व्हॉल्वच्या पाण्याचा आधार
४गोदावरी नदी काठावरील खळी गावातील विहिरीची ही पाणी पातळी खालावल्याने टाकीत पाण्याचा पुरवठाच होत नाही. त्यामुळे खळी पुनर्वसन येथील ग्रामस्थांना गावापासून अंदाजे एक किलोमीटर अंतरावर असलेल्या पाईपलाईनच्या लिकेज झालेल्या व्हॉल्वमधून गळतीद्वारे येणारे पाणी भरून आपली तहान भागवावी लागत आहे.
४गावातील पाणीटंचाई दूर करावी अशी मागणी बालाजी गौरशेटे, अंबादास पिसाळ, महादेव गात, लिंबाजी गरड, वैजनाथ बिडगर, शेषराव धाकपाडे, प्रकाश झुरे, अमृत कचाले, पांडुरंग गात, मोकिंद सोळंके, सुधाकर गरड, मारोती पिसाळ, रामकिशन पिसाळ आदींनी तहसील कार्यालयात दिलेल्या निवेदनात केली आहे.
पाण्याअभावी १५ नळयोजना बंद
लोकमत न्यूज नेटवर्क
सेलू : जमिनीतील पाणी पातळी झपाट्याने कमी होत असून पाणी पुरवठा करणाऱ्या विहिरी कोरड्या ठाक पडत असल्याने तालुक्यातील १५ गावांतील नळ योजना बंद पडल्या आहेत.
तालुक्यात नोव्हेंबरपासूनच पाणीटंचाई निर्माण झाली होती. मार्च महिन्यात अधिकच गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. काही गावांतील पाणी पुरवठा योजना मोडकळीस आल्या आहेत. तर काही गावातील योजना कालबाह्य झाल्याने पाणी पुरवठा करणाऱ्या ग्रामपंचायतीला कसरत करावी लागत आहे. तालुक्यातील वाकी, तांदूळवाडी, कुपटा, म्हाळसापूर, निपाणी टाकळी, डासाळा या गावातील पाणी पुरवठा करणाºया विहिरी कोरड्या पडल्या आहेत. पाणीपुरवठा योजनाही कालबाह्य झाल्याने या गावातील ग्रामस्थांना हातपंप व इतर पाणी स्त्रोतावरून तहान भागविण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. डिग्रस खु., डिग्रसवाडी येथील नळयोजना किरकोळ दुरूस्ती अभावी बंद आहे. तर गोहेगाव व हिस्सी येथील योजना पाणी नसल्याने बंद पडली आहे. कवडधन, शिंदे टाकळी, गव्हा येथील जलस्त्रोत कोरडे पडले असून योजना कालबाह्य झाली आहे. दरम्यान, पाणी पुरवठा करणाºया विहिरी कोरड्या पडत असल्याने पाणी असलेले स्त्रोत अधिग्रहण करून १० गावातील ग्रामस्थांची तहान भागविणाचा प्रयत्न केला जात आहे. तसेच ४ गावांतील टँकरचे प्रस्ताव पंचायत समिती कार्यालयात दाखल झाले आहेत.

Web Title: Parbhani: Wasting water shortage in Gangakhed taluka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.