परभणी : वक्फ बोर्ड निवडणूक; दुर्राणींचा अर्ज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 18, 2019 11:36 PM2019-01-18T23:36:32+5:302019-01-18T23:37:19+5:30

महाराष्ट्र राज्य वक्फ बोर्डाच्या सदस्यपदाच्या निवडणुकीकरीता आ.बाबाजानी दुर्राणी मुंबई येथील जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे शुक्रवारी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.

Parbhani: Waqf Board Election; Remark application | परभणी : वक्फ बोर्ड निवडणूक; दुर्राणींचा अर्ज

परभणी : वक्फ बोर्ड निवडणूक; दुर्राणींचा अर्ज

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : महाराष्ट्र राज्य वक्फ बोर्डाच्या सदस्यपदाच्या निवडणुकीकरीता आ.बाबाजानी दुर्राणी मुंबई येथील जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे शुक्रवारी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.
महाराष्ट्र राज्य वक्फ बोर्डाच्या निवडणुकीचा कार्यक्रम घोषित करण्यात आला आहे. त्यामध्ये राज्यातील मुस्लिम विधानसभा- विधानपरिषद आमदारांमधून निवडून द्यावयाच्या एका जागेसाठी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष आ.बाबाजानी दुर्राणी यांनी शुक्रवारी मुंबई येथील जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी आ.खाजा बेग, वक्फ बोर्डाचे माजी सदस्य हबीब फकीर, जमील मौलाना, फहाद पठाण, अतिक जहागीरदार, सागर देशमुख, मुकूंद विटेकर आदींसह कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.
असा आहे निवडणूक कार्यक्रम
मुस्लिम विधानसभा- विधानपरिषद सदस्यांमधून वक्फ बोर्डावर पाठवायच्या एका सदस्यपदासाठी २१ जानेवारी रोजी दुपारी ३ वाजेपर्यंत अर्ज दाखल करता येणार आहेत. २२ रोजी अर्जांची छाननी होणार असून २४ रोजी दुपारी ३ वाजेपर्यंत अर्ज परत घेता येणार आहेत. आवश्यक असल्यास ४ फेब्रुवारी रोजी सकाळी ८ ते सायंकाळी ५ या वेळेत मुंबई शहर जिल्हाधिकाºयांच्या दालनात मतदान होणार आहे. ५ फेब्रुवारी रोजी सकाळी ८ वाजता मतमोजणी होणार आहे.

Web Title: Parbhani: Waqf Board Election; Remark application

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.