परभणी : भाजीपाला विक्रेत्या महिलेला ट्रकने चिरडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 2, 2019 12:44 AM2019-02-02T00:44:23+5:302019-02-02T00:45:03+5:30

मार्केटमधून खरेदी केलेला भाजीपाला विक्रीसाठी डोक्यावर घेऊन जाणाऱ्या वृद्ध महिलेला ट्रकने चिरडल्याने या अपघातात गंभीर जखमी झालेल्या महिलेचा अंबाजोगाई येथील शासकीय रुग्णालयात उपचारा दरम्यान मृत्यू झाल्याची घटना १ फेब्रुवारी रोजी सकाळी ९.१५ वाजता घडली.

Parbhani: The vegetable seller was hit by a truck by the seller | परभणी : भाजीपाला विक्रेत्या महिलेला ट्रकने चिरडले

परभणी : भाजीपाला विक्रेत्या महिलेला ट्रकने चिरडले

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
गंगाखेड (परभणी) : मार्केटमधून खरेदी केलेला भाजीपाला विक्रीसाठी डोक्यावर घेऊन जाणाऱ्या वृद्ध महिलेला ट्रकने चिरडल्याने या अपघातात गंभीर जखमी झालेल्या महिलेचा अंबाजोगाई येथील शासकीय रुग्णालयात उपचारा दरम्यान मृत्यू झाल्याची घटना १ फेब्रुवारी रोजी सकाळी ९.१५ वाजता घडली.
शहरातील गल्ली बोळात डोक्यावरून भाजीपाल्याची टोपली घेऊन फिरत भाजीपाला विक्री करणाºया वृद्ध महिला महेताबबी शेख नूर (वय ५५, रा. आझादनगर, गंगाखेड) या १ फेब्रुवारी रोजी सकाळी मार्केटमधून खरेदी केलेला भाजीपाला विक्रीसाठी घेऊन जात असताना शहरातील पोलीस ठाण्यासमोर असलेल्या संविधान चौकात विरुद्ध दिशेने वळण घेत कोद्री रस्त्याच्या दिशेने जाणाºया दहाचाकी ट्रकने (क्रमांक एम.एच.२१-एक्स ०७०४) सकाळी ९.१५ च्या सुमारास वृद्ध महिलेला जोराची धडक देत त्यांना चिरडले. यावेळी उपस्थित नागरिकांनी आरडाओरड करून ट्रकचालकास ट्रक थांबविण्यास भाग पाडले. अपघातात गंभीर जखमी झालेल्या महेताबबी शेख नूर यांना तातडीने गंगाखेड उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. वैद्यकीय अधिकाºयांनी प्रथमोपचार करून त्यांना अंबाजोगाई येथील शासकीय रुग्णालयात हलविले. मात्र गंभीर जखमी झालेल्या महेताबबी शेख नूर यांचा सकाळी १०.३० वाजेच्या सुमारास मृत्यू झाला.

Web Title: Parbhani: The vegetable seller was hit by a truck by the seller

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.