परभणी : दुचाकीस्वार गंभीर जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 13, 2019 12:16 AM2019-06-13T00:16:23+5:302019-06-13T00:16:59+5:30

चुकीच्या दिशेने भरधाव वेगाने जाणाऱ्या ट्रॅव्हल्सखाली सापडून एक दुचाकीस्वार गंभीर जखमी झाल्याची घटना १२ जून रोजी सकाळी ७़३० वाजेच्या सुमारास कोल्हापाटी येथील टोलनाक्यावर घडली़

Parbhani: Two-wheeler seriously injured | परभणी : दुचाकीस्वार गंभीर जखमी

परभणी : दुचाकीस्वार गंभीर जखमी

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
मानवत (परभणी) : चुकीच्या दिशेने भरधाव वेगाने जाणाऱ्या ट्रॅव्हल्सखाली सापडून एक दुचाकीस्वार गंभीर जखमी झाल्याची घटना १२ जून रोजी सकाळी ७़३० वाजेच्या सुमारास कोल्हापाटी येथील टोलनाक्यावर घडली़
तांदूळवाडी (ता़जिंतूर) येथील कल्याण साहेबराव पिसोरे हे एमएच २२ एसी- ५४७३ या क्रमांकाच्या दुचाकीने करंजी येथील नातेवाईकांना भेटण्यासाठी जात होते़ पिसोरे हे सकाळी ७़३० च्या सुमारास कोल्हा पाटी येथील वळण रस्त्यावर आले असता, पुण्याहून परभणीच्या दिशेने जाणाºया एक खाजगी ट्रॅव्हल्स (एमएच १४ सीडब्ल्यू-९१७१) चुकीच्या दिशेने आली़ या ट्रॅव्हल्सने पिसोरे यांच्या दुचाकीला जोराची धडक दिली़ त्यात पिसोरे यांच्या हाताला व डोक्याला मार लागला आहे़ जखमी पिसोरे यांच्यावर परभणी येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत़ दरम्यान घटनेमुळे काही वाहतूक विस्कळीत झाली होती. पोलीस उपनिरीक्षक गणेश राठोड, बीट जमादार प्रताप साळवणे, चालक खरात यांनी घटनास्थळी भेट देऊन वाहतूक सुरळीत केली.
कार पलटी झाल्याने चौघे जखमी
४मानवत- राष्ट्रीय महामार्गावरील कोल्हावाडी शिवारात पुलावरील खड्ड्यांचा अंदाज न आल्याने एक कार पलटी होऊन चार जण जखमी झाल्याची घटना १२ जून रोजी सकाळी ११ वाजेच्या सुमारास घडली़
४जिंतूर तालुक्यातील चारठाणा येथील डॉ़ पोकर्णा, दिलीप तमशेटे, अनंता भुले, राजू म्हेत्रे हे चौघे एमएच २४ व्ही-१०८७ या क्रमांकाच्या कारने राष्ट्रीय महामार्गावरून परभणीकडे जात होते़
४बुधवारी सकाळी ११ वाजेच्या सुमारास कोल्हावाडी शिवारात पुलावरील खड्ड्याचा अंदाज न आल्याने चालकाचा कारवरील ताबा सुटला व ही कार पलटी झाली़ त्यात कारमधील चौघे जण किरकोळ जखमी झाले असून, त्यांच्यावर कोल्हा येथील आरोग्य केंद्रात उपचार करण्यात आले़

Web Title: Parbhani: Two-wheeler seriously injured

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.