परभणी : पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 1, 2019 12:28 AM2019-07-01T00:28:54+5:302019-07-01T00:29:55+5:30

जिल्ह्यातील ७ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश पोलीस अधीक्षक कृष्णकांत उपाध्याय यांनी ३० जून रोजी काढले आहेत.

Parbhani: Transfers of Police Officers | परभणी : पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या

परभणी : पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : जिल्ह्यातील ७ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश पोलीस अधीक्षक कृष्णकांत उपाध्याय यांनी ३० जून रोजी काढले आहेत.
कोतवाली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुरेश दळवे यांची बदली पोलीस नियंत्रण कक्षात करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे तात्पुरत्या स्वरुपात निशस्त्र पोलीस निरीक्षक म्हणून नेमणूक झालेल्या प्रमोद पाटील यांची कोतवाली पोलीस ठाण्यात, सुभाष मारकड यांची बोरी पोलीस ठाण्यात, उमेश पाटील यांची जिंतूर पोलीस ठाण्यात तर अखिल इब्राहीम सय्यद यांची ताडकळस पोलीस ठाण्यात बदली करण्यात आली आहे. तसेच सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील माने यांची बदली पालम पोलीस ठाण्यात करण्यात आली असून पोलीस उपनिरीक्षक विश्वास खोले यांची बदली दहशतवाद विरोधी पथकात करण्यात आली आहे.
दोघांना केले कार्यमुक्त
परभणी जिल्हा पोलीस दलातील निशस्त्र पोलीस निरीक्षक सोनाजी आम्ले यांची यवतमाळ येथे बदली झाली असून राखीव पोलीस उपनिरीक्षक मधुकर चौंंदते यांची मुंबई शहर येथे बदली झाली आहे. त्यामुळे या दोन्ही अधिकाºयांच्या कार्यमुक्त करण्याचे आदेश पोलीस अधीक्षकांनी ३० जून रोजी काढले आहेत.

Web Title: Parbhani: Transfers of Police Officers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.