परभणी : पुरवठा विभागातील अव्वल कारकून चतुर्भूज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 17, 2018 12:30 AM2018-03-17T00:30:02+5:302018-03-17T00:30:08+5:30

वडिलांच्या नावे असलेले रेशनकार्ड तीन भावांच्या नावे विभक्त करून देण्यासाठी ३ हजारांची लाच घेणाऱ्या पाथरी येथील तहसील कार्यालयातील पुरवठा विभागाच्या अव्वल कारकुनास लाचलुचपत विभागाच्या पथकाने १६ मार्च रोजी सापळा रचून रंगेहाथ पकडले.

Parbhani: The top four quadrants in the supply chain | परभणी : पुरवठा विभागातील अव्वल कारकून चतुर्भूज

परभणी : पुरवठा विभागातील अव्वल कारकून चतुर्भूज

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
पाथरी : वडिलांच्या नावे असलेले रेशनकार्ड तीन भावांच्या नावे विभक्त करून देण्यासाठी ३ हजारांची लाच घेणाऱ्या पाथरी येथील तहसील कार्यालयातील पुरवठा विभागाच्या अव्वल कारकुनास लाचलुचपत विभागाच्या पथकाने १६ मार्च रोजी सापळा रचून रंगेहाथ पकडले.
पाथरी तालुक्यातील रेणापूर येथील तक्रारदार यांनी तहसील कार्यालयाच्या पुरवठा विभागात गेल्या दोन महिन्यापूर्वी आपल्या वडिलांच्या नावे असलेले रेशनकार्ड तीन भावांच्या नावे विभक्त करून सर्व कागदपत्रांची पूर्तता करून अर्ज सादर केला होता. मात्र या कामासाठी प्रत्येकी १ हजार रुपये या प्रमाणे तीन भावांसाठी ३ हजारांची मागणी पुरवठा विभागातील अव्वल कारकून भरत कचरु घनसावध यांनी केली होती. याबाबत तक्रारदार यांनी परभणी येथील लाचलुचपत विभागाकडे लेखी तक्रार नोंदविली होती. १५ मार्च रोजी तहसील कार्यालय पाथरी येथे पडताळणी करण्यात आली. त्यानंतर १६ मार्च रोजी तहसील कार्यालयात सापळा रचण्यात आला. तक्रारदार यांच्याकडून २८०० रुपये लाचेची रक्कम स्वीकारताना भरत घनसावध यास रंगेहाथ पकडण्यात आले. पोलीस उपअधीक्षक एन.ए. बेंबडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक विवेक भारती, अनिल गव्हाणकर, पो.हे. लक्ष्मण मुरकुटे, अनिल कटारे, माणिकराव चट्टे यांंनी कारवाई केली.
दरम्यान, या प्रकरणी पाथरी पोलीस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.

Web Title: Parbhani: The top four quadrants in the supply chain

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.