परभणी : उरुसात तगडा बंदोबस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 3, 2019 12:35 AM2019-02-03T00:35:04+5:302019-02-03T00:35:14+5:30

उरुसामध्ये गर्दीचा फायदा घेऊन होणाऱ्या गुन्हेगारी स्वरुपाच्या घटनांना आळा घालण्यासाठी पोलिसांनी तगडा बंदोबस्त लावला आहे़ या काळामध्ये उरुस कार्यक्षेत्रात पोलिसांनी विविध उपाययोजनाही केल्या असून, गुन्हेगारी प्रवृत्तींवर करडी नजर ठेवली जाणार आहे़

Parbhani: A strong settlement in Uru | परभणी : उरुसात तगडा बंदोबस्त

परभणी : उरुसात तगडा बंदोबस्त

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : उरुसामध्ये गर्दीचा फायदा घेऊन होणाऱ्या गुन्हेगारी स्वरुपाच्या घटनांना आळा घालण्यासाठी पोलिसांनी तगडा बंदोबस्त लावला आहे़ या काळामध्ये उरुस कार्यक्षेत्रात पोलिसांनी विविध उपाययोजनाही केल्या असून, गुन्हेगारी प्रवृत्तींवर करडी नजर ठेवली जाणार आहे़
परभणी येथील हजरत सय्यद शाह तुराबूल हक यांचा उरुस राज्यभरात प्रसिद्ध आहे़ राष्ट्रीय एकात्मतेचे प्रतिक म्हणून ओळखल्या जाणाºया या उरुसात भाविक लाखोंच्या संख्येने दाखल होतात़ १५ दिवस चालणाºया उरुस काळात गर्दीचा फायदा घेऊन अनुचित घटना घडण्याची शक्यता असते़ ही बाब लक्षात घेऊन जिल्हा पोलीस प्रशासनाने पोलीस बंदोबस्त तैनात केला आहे़
२ फेब्रुवारीपासून या उरुसाला प्रत्यक्षात सुरुवात झाली़ दर्गा रोड परिसरात हा उरुस भरतो़ या भागात पोलिसांनी स्वतंत्र नियंत्रण कक्ष स्थापन केला आहे़ हा कक्ष वायरलेस यंत्रणेने जोडला आहे़ १ डीवायएसपी, ३ पोलीस निरीक्षक, ३२ सहाय्यक पोलीस निरीक्षक, पोलीस उपनिरीक्षक, २१९ पुरुष कर्मचारी, ६० महिला पोलीस कर्मचारी, २०० होमगार्ड आणि ५० महिला होमगार्डचीही उरुसाच्या परिसरात बंदोबस्त कामी नियुक्ती करण्यात आली आहे़
याशिवाय या संपूर्ण परिसरात ४ वॉच टॉवर उभारण्यात आले असून, अँटी हॉकर्स टीम, महिला छेडछाड विरोधी पथक, दवाखाना या शिवाय स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेचे पथक, दामिनी पथक तैनात करण्यात आले आहे़
तसेच साध्या वेशातील कर्मचाºयाचीही या भागात नियुक्ती करण्यात आली आहे़ पोलीस प्रशासनाने कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी संपूर्ण प्रयत्न केले आहेत़ आगामी काळात उरुसात येणाºया भाविकांची गर्दी वाढते़ ही बाब लक्षात घेऊन उपलब्ध पोलीस अधिकारी, कर्मचाºयांची वेगवेगळ्या ठिकाणी नियुक्ती करण्यात आली आहे़
दरम्यान, उरुसासाठी मीना बाजार, विविध राहटपाळणे, खाद्य पदार्थांची दुकाने सज्ज झाली आहेत़ रात्री उशिरापर्यंत उरुसामध्ये गर्दी राहते़ ही बाब लक्षात घेऊन पोलीस कर्मचाºयांना ड्युट्या निश्चित करून देण्यात आल्या आहेत़ उरुस काळामध्ये विविध मनोरंजनाचे कार्यक्रम तसेच प्रबोधनपर कार्यक्रमांचेही आयोजन केले जाते़ १५ दिवसांच्या या काळात परभणी शहरामध्ये उत्साहपूर्ण वातावरण असते़
जिल्हा प्रशासनाच्या वतीने १ फेब्रुवारी रोजी मानाचा संदल काढून उरुसाला प्रारंभ झाला आहे़ जिल्हा प्रशासन, महानगरपालिका, आरोग्य विभागानेही या ठिकाणी आवश्यक ती सुविधा उपलब्ध करून दिली आहे़ वीज, पाणी आणि दररोजच्या स्वच्छतेची जबाबदारी कर्मचाºयांवर दिली असून, सर्वच विभागाने या ठिकाणी कर्मचाºयांची नियुक्ती केली आहे़
३० कॅमेºयांची राहणार नजर
उरुस परिसरामध्ये एकूण ३० सीसीटीव्ही कॅमेरेही बसविण्यात आले आहेत़ या कॅमेºयांच्या माध्यमातून प्रत्येक बाबींवर पोलीस प्रशासन बारकाईने नजर ठेवणार आहे़ तसेच चार ठिकाणी वॉच टॉवरही बसविले आहेत़ या टॉवरवरून पथकातील कर्मचारी टेहळणी करतील़ तसेच उरुसामध्ये मुले हरवण्याचे प्रमाण वाढते़ गर्दीत मुले हरतात़ ही बाब लक्षात घेऊन हरवलेल्या मुलांसाठी स्वतंत्र कक्ष स्थापन करण्यात आला आहे़ या ठिकाणी ध्वनीक्षेपकांच्या माध्यमातून पालकांना आवाहन केले जाते आणि हरवलेली मुले त्यांच्या पालकांपर्यंत सुपूर्द करण्याचे काम या पथकाकडून केले जाते़ एकंदर पोलीस प्रशासनाने उरुसासाठीची जय्यत तयारी पूर्ण केली आहे़
सोशल मीडियाच्या माध्यमातून पसरणाºया अफवांवर नागरिकांनी विश्वास ठेवू नये चोरांपासून सावध रहावे, असे आवाहन पोलीस अधीक्षक उपाध्याय यांनी केले आहे़
उरुसासाठी हनुमान चौकापासून जाणारा रस्ता वाहनांसाठी बंद करण्यात आला असून, वाहनधारकांनी जुना पेडगाव रोडचा वाहतुकीसाठी वापर करावा, रस्त्यात वाहने उभी करू नयेत़
छेडछाड, टिंगलटवाळ्या, हुल्लडबाजी करणाºया लोकांची माहिती पोलिसांना कळवावी़ तसेच गर्दीच्या ठिकाणी गॅसचा वापर करून फुगे फुगविणाºया व्यक्तींची माहितीही द्यावी, असे आवाहन केले आहे़

Web Title: Parbhani: A strong settlement in Uru

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.