परभणी : शेतीमालाच्या चुकाऱ्यासाठी मुक्काम ठोको आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 26, 2018 12:36 AM2018-09-26T00:36:51+5:302018-09-26T00:37:26+5:30

जिल्हा मार्केटींग अधिकारी कार्यालयामार्फत मागील वर्षी खरेदी केलेल्या शेतमालाचे चुकारे अद्यापपर्यंत शेतकºयांना न मिळाल्याने २५ सप्टेंबर रोजी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने मार्केटींग अधिकारी कार्यालयात मुक्काम ठोको आंदोलन करण्यात आले.

Parbhani: Stop the agitation of farming | परभणी : शेतीमालाच्या चुकाऱ्यासाठी मुक्काम ठोको आंदोलन

परभणी : शेतीमालाच्या चुकाऱ्यासाठी मुक्काम ठोको आंदोलन

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : जिल्हा मार्केटींग अधिकारी कार्यालयामार्फत मागील वर्षी खरेदी केलेल्या शेतमालाचे चुकारे अद्यापपर्यंत शेतकºयांना न मिळाल्याने २५ सप्टेंबर रोजी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने मार्केटींग अधिकारी कार्यालयात मुक्काम ठोको आंदोलन करण्यात आले.
परभणी आणि हिंगोली जिल्ह्यातील शेतकºयांची तूर, हरभरा जिल्हा मार्केटींग अधिकारी कार्यालयामार्फत २०१७-१८ मध्ये खरेदी करण्यात आली. मात्र त्यापोटी शेतकºयांना अद्यापही रक्कम वितरित झाली नाही. सध्या जिल्ह्यात पिकांची नाजूक परिस्थिती बनली आहे. कापूस, सोयाबिन पावसाअभावी हातचे गेले. शासनाने शेतकºयांचा माल खरेदी करुन तो बाजरात विक्री देखील केला. मात्र त्याचे पैसे अद्यापपर्यंत दिले नाहीत.
त्यामुळे शेतकºयांच्या पिकांचे चुकारे वितरित होत नाहीत, तोपर्यंत मुक्काम ठोको आंदोलन करण्याचा निर्णय स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी घेतला. मंगळवारी सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास स्वाभिमानीचे जिल्हाध्यक्ष किशोर ढगे, डिगांबर पवार, रामेश्वर आवरगंड, केशव आरमळ, अनंत कदम, शेख इरशाद पाशा, बालासाहेब ढगे, दीपक गरुड, रामकिश्न गरुड, हिमायतुल्ला खान आदींसह इतर कार्यकर्ते जिल्हा मार्केटींग अधिकारी कार्यालयात दाखल झाले.
दरम्यान, सायंकाळी ४ वाजण्याच्या सुमारास जिल्हा मार्केटींग अधिकारी कापुरे यांनी फोनद्वारे संपर्क साधला. आठ दिवसांत शेतकºयांचे पैसे त्यांच्या खात्यावर जमा करण्याचे लेखी पत्र बुधवारी दिले जाईल, असे आश्वासन दिल्याने हे आंदोलन मागे घेण्यात आले.

Web Title: Parbhani: Stop the agitation of farming

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.