परभणी :धनुर्विद्या स्पर्धेत सहा खेळाडूंना पदके

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 26, 2018 12:01 AM2018-06-26T00:01:37+5:302018-06-26T00:02:04+5:30

भारत खेल संघाच्या वतीने गोवा येथे १४ ते १६ जून दरम्यान, दृश्यम धनुर्विद्या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते़ या स्पर्धेत परभणी जिल्ह्यातील वेगवेगळ्या गटातील सहा खेळाडूंनी पदके पटकावली.

Parbhani: Six Athlete in Archery Competition | परभणी :धनुर्विद्या स्पर्धेत सहा खेळाडूंना पदके

परभणी :धनुर्विद्या स्पर्धेत सहा खेळाडूंना पदके

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : भारत खेल संघाच्या वतीने गोवा येथे १४ ते १६ जून दरम्यान, दृश्यम धनुर्विद्या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते़ या स्पर्धेत परभणी जिल्ह्यातील वेगवेगळ्या गटातील सहा खेळाडूंनी पदके पटकावली.
या स्पर्धेत १४ वर्षे वयोटातील इंडियन राऊंडमध्ये अनिकेत मकासरे (गोल्ड मेडल), वरद अग्रवाल (ब्राँझ मेडल), १७ वर्षे वयोगटातील इंडियन राऊंडमध्ये अंश जांगडा (ब्राँझ मेडल), १९ वर्षे वयोगटातील इंडियन राऊंडमध्ये गणेश नरवाडे (गोल्ड मेडल), रामप्रसाद कदम, (सिल्व्हर मेडल) तर १७ वर्षे वयोगटातील रिकव्हर राऊंडमध्ये सुजल पत्तेवार याने गोल्ड मेडल पटकावले आहे़
या खेळाडूंची आंतरराष्ट्रीय धनुर्विद्या स्पर्धेसाठी निवड झाली आहे़ ही स्पर्धा बँकॉक येथे होणार आहेत़ या खेळाडूंचा शिरीष पत्तेवार, विष्णू मुलगीर, रवींद्र भूमकर, मुरलीधर अग्रवाल, प्रवीण चालक, संतोष तपकीर आदींनी सत्कार केला़ यावेळी विद्यार्थी, शिक्षक, पालकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती़

Web Title: Parbhani: Six Athlete in Archery Competition

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.