परभणी : नटराज रंगमंदिरातील कक्षाचे छत कोसळले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 21, 2018 01:04 AM2018-08-21T01:04:51+5:302018-08-21T01:06:04+5:30

येथील नटराज रंगमंदिरमधील प्रभाग समिती सभापतींच्या कक्षाचे पीओपीचे छत कोसळल्याची घटना २० आॅगस्ट रोजी दुपारी १़३० वाजेच्या सुमारास घडली़ सुदैवाने यावेळी कक्षात कोणीही नसल्याने अनर्थ टळला़ शहरात होत असलेल्या संततधार पावसामुळे ही घटना घडली आहे़

Parbhani: The roof of the room of the Natraj Theater collapsed | परभणी : नटराज रंगमंदिरातील कक्षाचे छत कोसळले

परभणी : नटराज रंगमंदिरातील कक्षाचे छत कोसळले

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : येथील नटराज रंगमंदिरमधील प्रभाग समिती सभापतींच्या कक्षाचे पीओपीचे छत कोसळल्याची घटना २० आॅगस्ट रोजी दुपारी १़३० वाजेच्या सुमारास घडली़ सुदैवाने यावेळी कक्षात कोणीही नसल्याने अनर्थ टळला़ शहरात होत असलेल्या संततधार पावसामुळे ही घटना घडली आहे़
येथील जुना मोंढा भागातील नटराज रंगमंदिराची इमारत जीर्ण झाल्याने हे नाट्यगृह पाच वर्षांपासून बंद आहे़ या ठिकाणी कुठलेही सांस्कृतिक कार्यक्रम होत नसल्याने महानगरपालिकेने या नाट्यगृहात प्रभाग समिती अ चे कार्यालय स्थापन केले आहे़
या ठिकाणी या प्रभागांतर्गत येणाऱ्या नागरिकांच्या समस्या सोडविल्या जातात़ तसेच नळपट्टी, घरपट्टी व इतर कामेही या कार्यालयातून चालतात़ प्रभाग समिती अ च्या सभापती अमरिका बेगम अ़ समद यांच्यासाठी याच ठिकाणी कक्ष देण्यात आला आहे़ सोमवारी शहरात सकाळपासून पाऊस होत होता़
या पावसाच्या पाण्यामुळे सभापतींच्या कक्षाचे प्लास्टर आॅफ पॅरिस कोसळले़ सुदैवाने यावेळी कक्षात कोणीही नसल्याने अनर्थ टळला़
दरम्यान, पावसामुळे नटराज रंग मंदिरातील प्रभाग समितीच्या कार्यालयात जागोजागी पाणी साचले आहे़ महत्त्वाचे दस्ताऐवजही पाण्याने भिजले आहेत़ अशा धोकादायक अवस्थेत कर्मचाºयांना या ठिकाणी काम करावे लागत आहे़
दुरुस्तीची केली होती मागणी
दरम्यान, प्रभाग समिती सभापती अमरिका बेगम यांनी १७ जुलै रोजी मनपा आयुक्तांना पत्र पत्र पाठवून नाट्यमंदिरातील कार्यालयाच्या अवस्थेविषयी माहिती दिली होती़ नाट्यगृह अनेक ठिकाणी गळत आहे़ त्यामुळे कार्यालयात पाणी साचते़ कर्मचाºयांना दैनंदिन कामकाज करताना अडचणी येत आहेत़ तसेच नागरिकांनाही त्रासाला सामोरे जावे लागत आहे़ तेव्हा या कार्यालयाची दुरुस्ती करून द्यावी, अशी मागणी त्यांनी केली होती; परंतु, प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केले़ विशेष म्हणजे महापालिकेच्या सहाय्यक आयुक्तांनीही १९ जुलै रोजी आयुक्तांना पत्र पाठवून इमारतीच्या छताची दुरुस्ती करणे आवश्यक असल्याचे कळविले होते़ छताच्या किरकोळ दुरुस्तीची कामे तातडीने करून घेणे योग्य राहील, असेही कळविले होते़ नाट्यगृहाच्या छताची वेळीच दुरुस्ती झाली असती तर ही घटना टळली असती़

Web Title: Parbhani: The roof of the room of the Natraj Theater collapsed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :parabhaniपरभणी