परभणी : रबीचे दोन लाख हेक्टर क्षेत्र राहणार पडिक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 22, 2018 12:38 AM2018-10-22T00:38:49+5:302018-10-22T00:38:52+5:30

कृषी विभागाने २०१८-१९ च्या रबी हंगामाच्या पेरणीसाठी २ लाख ७७ हजार ३६७ हेक्टर क्षेत्र प्रस्तावित केले आहे़; परंतु, जिल्ह्यात परतीच्या पावसाने पाठ फिरविल्याने यावर्षी २ लाख हेक्टर क्षेत्र पेरणीविना पडिक राहणार आहे़ त्यामुळे जिल्ह्यात शेतकऱ्यांना मोठ्या आर्थिक संकटाला तोंड द्यावे लागणार आहे़

Parbhani: Rabi will have two lakh hectare area | परभणी : रबीचे दोन लाख हेक्टर क्षेत्र राहणार पडिक

परभणी : रबीचे दोन लाख हेक्टर क्षेत्र राहणार पडिक

Next

मारोती जुंबडे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : कृषी विभागाने २०१८-१९ च्या रबी हंगामाच्या पेरणीसाठी २ लाख ७७ हजार ३६७ हेक्टर क्षेत्र प्रस्तावित केले आहे़; परंतु, जिल्ह्यात परतीच्या पावसाने पाठ फिरविल्याने यावर्षी २ लाख हेक्टर क्षेत्र पेरणीविना पडिक राहणार आहे़ त्यामुळे जिल्ह्यात शेतकऱ्यांना मोठ्या आर्थिक संकटाला तोंड द्यावे लागणार आहे़
यावर्षीच्या खरीप हंगामात पेरणी केलेली सोयाबीन, कापूस, मूग व उडीद ही पिके पावसाअभावी शेतकºयांच्या हातून गेली आहेत़ त्यामुळे उसणवारी करून पिकांवर खर्च केला़ परंतु, उत्पादनातून तेवढे पैसेही शेतकºयांच्या हाती लागले नाहीत़ त्यामुळे आर्थिक कोंडीत सापडलेल्या शेतकºयांच्या आशा परतीच्या पावसावर होत्या़ परंतु, आॅक्टोबर संपत आला तरीही जिल्ह्यात परतीचा पाऊस झाला नाही़ परिणामी कृषी विभागाने २०१८-१९ च्या रबी हंगामासाठी २ लाख ७७ हजार ३६७ हेक्टर क्षेत्र प्रस्तावित केले आहे़ यामध्ये ज्वारी पिकासाठी १ लाख ११ हजार ९६०, गव्हासाठी ३७ हजार २९६, हरभºयासाठी १ लाख २३ हजार ३९०, करडईसाठी २ हजार ५४९ तर मक्यासाठी १८ हजार ३८ हेक्टर क्षेत्र प्रस्तावित केले आहे; परंतु, या वर्षीच्या पावसाळ्यात एकही समाधानकारक पाऊस झाला नाही़ त्यातच परतीच्या पावसानेही पाठ फिरविली आहे़
त्यामुळे विहीर, नदी, तलाव, ओढे यांना पाणीच आले नाही़ जिल्ह्यातील शेतकºयांसाठी वरदान ठरलेला निम्न दूधना प्रकल्प व येलदरी धरणातही समाधानकारक पाणीसाठा झाला नाही़ त्यामुळे या धरणातील पाणी शेतकºयांना रबी हंगामातील पिके जगविण्यासाठी उपलब्ध होणार नाही़ सध्या शेतकºयांनी खरिप हंगामातील पिकांची विल्हेवाट लावून रबी हंगामातील पेरणीसाठी शेतजमीन तयार केली आहे़; परंतु, २० आॅगस्टपासून जिल्ह्यात पाऊस झालेला नाही़ त्यामुळे ठिक ठिकाणी जमीन भेगाळली आहे़ या जमिनीवर पेरणी करावी कशी? असा प्रश्न शेतकºयांसमोर उभा आहे़ ज्या शेतकºयांकडे सध्या पाणी उपलब्ध आहे; परंतु, हे पाणी रबी हंगामातील सिंचनासाठी पुरेल की नाही या भीतीने शेतकºयांनी चाढ्यावर मूठ धरली नाही़
२१ आॅक्टोबरपर्यंत जिल्हा कृषी अधीक्षक कार्यालयाकडे एकरभर क्षेत्रावरही पेरणी झाल्याची नोंद नाही़ त्यामुळे जिल्ह्यातील जवळपास २ लाख हेक्टर क्षेत्र पेरणीविना पडिक राहणार आहे़ यावर्षीचा रबी हंगाम शेतकºयांची अग्नीपरीक्षा पाहणारा ठरणार आहे़
कृषी निविष्टा व्यवसायही धोक्यात
४यावर्षीच्या रबी हंगामात कृषी विभागाने केलेल्या नियोजनानुसार शेतकºयांना बियाणांची कमतरता भासू नये, यासाठी जिल्हा परिषदेच्या कृषी विभागानेही ४२ हजार ५६९ क्विंटल बियाणांचे नियोजन केले आहे़ त्याचबरोबर हजारो मे़ टन खतही उपलब्ध आहे़ परंतु, २१ आॅक्टोबरपर्यंत जिल्ह्यात कोठेच पेरणी झाली नसल्याची नोंद कृषी विभागाकडे आहे़ त्यामुळे जिल्ह्यातील ११ बाजार समित्यांच्या मार्केटयार्डात लाखो रुपयांच्या कृषी निविष्टा पडून असल्याने व्यापाºयांची चिंताही वाढली आहे़
४ खरिपापाठोपाठ रबी हंगामही शेतकºयांच्या हातून गेला आहे़ त्यामुळे येणारे आर्थिक वर्ष शेतकºयांसाठी प्रशासन व शासन यांच्या मदतीवरच अवलंबून आहे़ शेतकºयांच्या पडत्या काळात शासनाने मदत केल्यास शेतकºयांना धीर मिळणार आहे़
१० टक्के क्षेत्रावरच होणार पेरा
कृषी विभागाने २ लाख ७७ हजार ३६७ हेक्टर क्षेत्र म्हणजेच पावणेतीन लाख हेक्टर क्षेत्र रबी हंगामासाठी प्रस्तावित केले आह; परंतु, गेल्या अडीच महिन्यांपासून जिल्ह्यात पावसाचा थेंबही बरसला नाही़ त्यामुळे जिल्ह्यातील केवळ १० टक्के क्षेत्रावरच उपलब्ध पाण्यावर पेरणी होऊ शकते, असा अंदाज कृषी विभागाने व्यक्त केला़ त्यामुळे येणारा काळ शेतकºयांसाठी कठीण राहणार आहे़

Web Title: Parbhani: Rabi will have two lakh hectare area

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.