परभणी : सौर कृषीपंप योजनेत २१ शेतकऱ्यांचे प्रस्ताव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 23, 2019 12:00 AM2019-01-23T00:00:07+5:302019-01-23T00:00:32+5:30

मुख्यमंत्री सौर कृषीपंप योजनेतून कृषीपंपाकरीता वीज जोडणी घेण्यासाठी महावितरणच्या वेबसाईटवर स्वतंत्र पोर्टल उपलब्ध करून देण्यात आले आहे. या पोर्टलच्या माध्यमातून सात दिवसांत जिल्ह्यातील २१ शेतकºयांनी सौर कृषीपंपासाठी प्रस्ताव दाखल केले आहेत.

Parbhani: Proposal of 21 farmers in Solar Agricultural Pumps Scheme | परभणी : सौर कृषीपंप योजनेत २१ शेतकऱ्यांचे प्रस्ताव

परभणी : सौर कृषीपंप योजनेत २१ शेतकऱ्यांचे प्रस्ताव

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : मुख्यमंत्री सौर कृषीपंप योजनेतून कृषीपंपाकरीता वीज जोडणी घेण्यासाठी महावितरणच्या वेबसाईटवर स्वतंत्र पोर्टल उपलब्ध करून देण्यात आले आहे. या पोर्टलच्या माध्यमातून सात दिवसांत जिल्ह्यातील २१ शेतकºयांनी सौर कृषीपंपासाठी प्रस्ताव दाखल केले आहेत.
परभणी जिल्हा हा सुपिक जमिनीचा जिल्हा म्हणून ओळखला जातो. दरवर्षीच्या खरीप हंगामात जिल्ह्यामध्ये ५ लाख २१ हजार हेक्टर क्षेत्रावर पेरणी होते. जवळपास ३ लाख शेतकरी जिल्ह्यात आहेत. या शेतकºयांपैकी ९२ हजार शेतकºयांनी वीज वितरण कंपनीकडे विहित नमुन्यात प्रस्ताव दाखल केले आहेत; परंतु, वीज वितरण कंपनीकडून कृषीपंपधारक शेतकºयांना वीजपुरवठा करताना काटकसर केली जाते. कधी वीज गळतीचे कारण पुढे केले जाते. तर कधी वीज बिलाची थकबाकी असल्याचे सांगितले जाते. महावितरणच्या या प्रशासकीय घोळामध्ये कृषीपंपधारकांना ऐनवेळी वीजपुरवठा उपलब्ध होत नाही. परिणामी शेतकºयांची पिके पाण्याअभावी हातची जातात. हा आजपर्यंतचा अनुभव आहे.
या सर्व प्रकारावर तोडगा काढण्यासाठी व शेतकºयांसाठी वरदान ठरणारी व शाश्वत विजेचे स्वप्न सत्यात साकारण्यासाठी राज्य शासनाने मुख्यमंत्री सौर कृषीपंप योजना अंमलात आणली. ही योजना तीन वर्षे चालणार असून या योजनेत लाभार्थी शेतकºयाला तीनही वर्षापर्यंत महावितणच्या वेबसाईटवर उपलब्ध करून देण्यात आलेल्या स्वतंत्र पोर्टलच्या माध्यमातून प्रस्ताव दाखल करता येणार आहेत. १५ जानेवारीपासून सुरू करण्यात आलेल्या मुख्यमंत्री सौर कृषीपंप योजनेत जिल्ह्यातील २१ शेतकºयांनी प्रस्ताव दाखल केले आहेत. त्यामुळे येत्या काळात या योजनेतील प्रस्तावांची संख्या वाढणार आहे.
नांदेड परिमंडळात ७८ शेतकºयांचा समावेश
नांदेड परिमंडळातील ७८ शेतकºयांनी सात दिवसांत सौर कृषीपंपाच्या जोडणीसाठी अर्ज केले आहेत. यामध्ये नांदेड जिल्ह्यातील १८, परभणी जिल्ह्यातील २१ तर सर्वाधिक हिंगोली जिल्ह्यातील ३९ शेतकºयांचा समावेश आहे. यामध्ये खुल्या प्रवर्गातून ६४ तर अनुसूचित जातीतील १० तसेच अनुसूचित जमातीतील ४ शेतकºयांचा समावेश आहे.

Web Title: Parbhani: Proposal of 21 farmers in Solar Agricultural Pumps Scheme

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.