परभणी : शुभमच्या भेटीसाठी आई-वडील व्याकुळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 5, 2018 12:30 AM2018-04-05T00:30:08+5:302018-04-05T00:30:08+5:30

Parbhani: Parents are worried about Shubham's visit | परभणी : शुभमच्या भेटीसाठी आई-वडील व्याकुळ

परभणी : शुभमच्या भेटीसाठी आई-वडील व्याकुळ

googlenewsNext

अन्वर लिंबेकर ।
लोकमत न्यूज नेटवर्क
कोनेरवाडी (जि. परभणी) : पाकिस्तानच्या सैनिकांनी केलेल्या गोळीबारात शहीद झालेले वीर जवान शुभम मुस्तापुरे यांचे पार्थिव बुधवारी दिवसभरात मूळ गावी दाखल झाले नाही़ मात्र अधिकाऱ्यांच्या गाड्यांची वर्दळ गावात वाढली होती. एखादी गाडी गावात दाखल झाली की, शुभमचे आई-वडिल दचकून उठत शुभम आला असेल, या आशेने अधिकाºयांकडे पाहत होते. त्यामुळे उपस्थितही गहीवरून जात होते.
वीर जवान शुभम मुस्तापुरे हे देशसेवेसाठी कर्तव्य बजावत असताना शहीद झाले आहेत़ मात्र त्यांच्या आई-वडिलांना शुभम जखमी झाल्याचीच माहिती देण्यात आली आहे़ सैन्यातील अधिकारी जखमी शुभमला घेऊन येत आहेत, असे आई-वडिलांना सांगितल्याने ते शुभमच्या भेटीसाठी व्याकूळ झाले आहेत़ दरम्यान, मंगळवारपासून गावात शासकीय अधिकाºयांची वर्दळी वाढली आहे़ चारचाकी गाड्यांतून अधिकारी मुस्तापुरे कुटूंबियांची भेट घेत आहेत़ अधिकाºयांच्या गाड्यांचा आवाज ऐकताच दचकून उठणारे त्यांचे आई-वडिल प्रत्येक व्यक्तीकडे आशाळभूत नजरेने पाहत आहेत़ कोणी तरी शुभमला आणले आहे, असे सांगेल, अशी आशा त्यांना वाटत आहे़ त्यातूनच प्रत्येकाला पानावलेल्या डोळ्यांनी शुभम कोठे आहे? असाचा प्रश्न विचारला जात आहे़
प्रवेशद्वारावरच अंत्यविधी
पालम तालुक्यातील चाटोरी येथून अडीच ते तीन किमी अंतरावर डोंगरी भागात कोनेरवाडी हे गाव वसलेले आहे़ साधारणत: ८०० लोकसंख्येचे हे गाव असून, गावाच्या प्रवेशद्वारावर शहीद वीर जवान शुभम मुस्तापुरे यांचा अंत्यविधी होणार आहे़ त्यापूर्वी जिल्हा परिषद शाळेच्या पाठीमागील शेतात त्यांचे पार्थिव अंतीमदर्शनाठी ठेवला जाणार आहे़ याच ठिकाणी त्यांना सलामी देण्यात येणार आहे़ प्रवेशद्वारावर रस्त्याच्या बाजुस असलेल्या जागेत लिंगायत समाजाच्या रितीरिवाजानुसार अंत्यसंस्कार होणार असल्याची माहिती मिळाली़
गावातील ७ जण भारतीय सैन्यात
केवळ ८०० लोकसंख्या असलेल्या कोनेरवाडी या गावातील सात जण भारतीय सैन्य दलामध्ये दाखल झालेले आहेत़ त्यापैकी दोघे सेवानिवृत्त झाले असून, सिमेवर देशसेवा बजावत असलेल्या ५ जवानांपैकी शुभम सूर्यकांत मुस्तापुरे (२०) हे ३ एप्रिल रोजी शहीद झाले आहेत़

Web Title: Parbhani: Parents are worried about Shubham's visit

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.