परभणी : भांडण सोडविताना एक जण जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 24, 2018 11:58 PM2018-02-24T23:58:08+5:302018-02-24T23:58:19+5:30

खाजगी सावकाराकडून घेतलेल्या व्याजाच्या पैशातून होत असलेले भांडण सोडविण्यासाठी मध्यस्थी करणारे शिवसेनेचे विधानसभा संघटक भाऊसाहेब जामगे यांनाच गुप्तीचा मार लागल्याने ते जखमी झाल्याची घटना २४ फेब्रुवारी रोजी दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास घडली़

Parbhani: One person injured while fighting a fight | परभणी : भांडण सोडविताना एक जण जखमी

परभणी : भांडण सोडविताना एक जण जखमी

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
गंगाखेड (परभणी) : खाजगी सावकाराकडून घेतलेल्या व्याजाच्या पैशातून होत असलेले भांडण सोडविण्यासाठी मध्यस्थी करणारे शिवसेनेचे विधानसभा संघटक भाऊसाहेब जामगे यांनाच गुप्तीचा मार लागल्याने ते जखमी झाल्याची घटना २४ फेब्रुवारी रोजी दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास घडली़
शहरातील यज्ञभूमी परिसरात राहणाºया समीर राजाराम जोशी (३०) यास उधार घेतलेल्या पैशाबद्दल बोलायचे आहे़, असे म्हणून किरण उर्फ बाळू भुमरे (रा़ भगवतीनगर, गंगाखेड) याने २४ फेब्रुवारी रोजी शनिवार बाजार येथे बोलावून घेतले़ तू उधार घेतलेले ५ हजार रुपये आणि त्यावर २० टक्क्यांनी व्याजाचे पैसे मिळून २८ ते ३० हजार रुपये दे, असे म्हणून किरण भुमरे याने वाद घालत शिवीगाळ केली़ कंबरेला ठेवलेली गुप्ती काढून समीर जोशी याच्यावर वार करू लागला़ यावेळी तेथे असलेले शिवसेना विधानसभा संघटक भाऊसाहेब जामगे यांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न करीत किरण भुमरे यास पकडले़ याच दरम्यान, गुप्तीचा मार लागून जामगे जखमी झाले़ या प्रकरणी समीर जोशी यांनी गंगाखेड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे़ त्यावरून आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला़ आहे.

Web Title: Parbhani: One person injured while fighting a fight

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.