परभणी : जनआंदोलन समितीने आयुक्तांना पाठविल्या एक लाख स्वाक्षऱ्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 22, 2019 11:29 PM2019-05-22T23:29:55+5:302019-05-22T23:30:11+5:30

परभणी-जिंतूर महामार्ग जनआंदोलन समितीच्या वतीने या महामार्गाचे काम तत्काळ सुरू व्हावे, यासाठी विभागीय आयुक्तांना १ लाख स्वाक्षऱ्यांचे निवेदन देण्यात आले़ यावेळी आठ दिवसांत प्रत्यक्ष कामाला सुरुवात करण्यात येइल, असे आश्वासन शिष्टमंडळाला मिळाले़

Parbhani: One lakh signature sent by the Jan Andolan Samiti to the commissioners | परभणी : जनआंदोलन समितीने आयुक्तांना पाठविल्या एक लाख स्वाक्षऱ्या

परभणी : जनआंदोलन समितीने आयुक्तांना पाठविल्या एक लाख स्वाक्षऱ्या

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
जिंतूर (परभणी): परभणी-जिंतूर महामार्ग जनआंदोलन समितीच्या वतीने या महामार्गाचे काम तत्काळ सुरू व्हावे, यासाठी विभागीय आयुक्तांना १ लाख स्वाक्षऱ्यांचे निवेदन देण्यात आले़ यावेळी आठ दिवसांत प्रत्यक्ष कामाला सुरुवात करण्यात येइल, असे आश्वासन शिष्टमंडळाला मिळाले़
परभणी-जिंतूर महामार्ग जनआंदोलन समितीने रखडलेल्या रस्त्याचे काम तत्काळ सुरू होण्यासाठी आंदोलन पुकारले आहे़ आंदोलनाच्या पहिल्या टप्प्यात जिल्हाधिकारी यांना या शिष्टमंडळाने निवेदन दिले़ त्यानंतर काम सुरू न झाल्याने विभागीय आयुक्त यांना या जनआंदोलन समितीच्या वतीने १ लाख सह्यांचे निवेदन सादर केले़ आयुक्तांचे प्रतिनिधी उपायुक्त मृणाली सावंत निबांळकर यांनी या आंदोलनकर्त्यांचे निवेदन स्वीकारले़ या शिष्टमंडळाने महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे मुख्य अभियंता सुनील देशमुख यांच्याशी चर्चा केली़ यावेळी ब्रीजगोपाल तोष्णीवाल, अ‍ॅड़ मनोज सारडा, अनुप सोळंके, डॉ़ दुर्गादास कानडकर, डॉ़ श्रीधर भोंबे, अ‍ॅड़ विनोद राठोड, अ‍ॅड़ गोपाळ रोकडे, संतोष देशमुख, गणेश कुºहे, गणपत गडदे, शकील अहमद, गजानन चौधरी यांची उपस्थिती होती़
..तर करणार जेल भरो आंदोलन
जिंतूर- परभणी या महामार्गाचे काम आठ दिवसांत सुरू झाले नाही तर १ जून रोजी जनआंदोलन समितीच्या वतीने जेलभरो आंदोलन करण्यात येऊन संपूर्ण तालुका बंद ठेवला जाणार असल्याचे अ‍ॅड़ मनोज सारडा यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले़

Web Title: Parbhani: One lakh signature sent by the Jan Andolan Samiti to the commissioners

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.