परभणी नामविस्तार दिन सोहळा :संंविधान वाचेल तरच देश वाचेल- अमोल मिटकरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 18, 2019 11:49 PM2019-01-18T23:49:24+5:302019-01-18T23:49:45+5:30

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या संविधानामुळे आज देशातील प्रत्येक नागरिकाला त्यांचे अधिकार व हक्क प्राप्त झाले आहेत. राजकारणी लोक हे संविधान बदलण्याचा प्रयत्न करीत आहेत. संविधान प्रेमींनी त्यांचा हा प्रयत्न हानून पाडावा, असे प्रतिपादन संभाजी ब्रिगेडचे प्रवक्ते अमोल मिटकरी यांनी केले.

Parbhani Nomination Day Celebration: Only the country will be saved if the Constitution is read - Amol Mitakari | परभणी नामविस्तार दिन सोहळा :संंविधान वाचेल तरच देश वाचेल- अमोल मिटकरी

परभणी नामविस्तार दिन सोहळा :संंविधान वाचेल तरच देश वाचेल- अमोल मिटकरी

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
पूर्णा (परभणी): डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या संविधानामुळे आज देशातील प्रत्येक नागरिकाला त्यांचे अधिकार व हक्क प्राप्त झाले आहेत. राजकारणी लोक हे संविधान बदलण्याचा प्रयत्न करीत आहेत. संविधान प्रेमींनी त्यांचा हा प्रयत्न हानून पाडावा, असे प्रतिपादन संभाजी ब्रिगेडचे प्रवक्ते अमोल मिटकरी यांनी केले.
शहरातील तथागत मित्रमंडळाच्या वतीने १९ जानेवारी रोजी नामविस्तार दिन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक येथे आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी नगराध्यक्ष प्रा. मोहन मोरे होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. भदंत उपगुप्त महाथेरो, शिक्षणाधिकारी वंदनाताई वाव्हुळ, प्रकाश कांबळे, उत्तम खंदारे अ‍ॅड. धम्मा जोंधळे, शिवाजी साखरे, देवराव खंदारे, यादव भवरे, मधुकर गायकवाड, अनिल खर्गखराटे, लक्ष्मीकांत शिंदे, अशोक धबाले, श्यामराव जोगदंड, मुकुंद भोळे, अशोक कांबळे, शाहीर गौतम कांबळे, केशव जोंधळे, राहुल बलखंडे, सुनिल कांबळे, प्रवीण कनकुटे, रौफ कुरेशी, साहेबराव कदम यांची उपस्थिती होती.
सम्यक जोंधळे यांनी प्रास्ताविक केले. श्रीकांत हिवाळे, त्र्यंबक कांबळे यांनी सूत्रसंचालन केले. कार्यकम यशस्वी करण्यासाठी तथागत मित्रमंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी प्रयत्न केले.

Web Title: Parbhani Nomination Day Celebration: Only the country will be saved if the Constitution is read - Amol Mitakari

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.