परभणी महापालिका: सव्वातीन कोटींची वसुली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 24, 2018 12:45 AM2018-04-24T00:45:29+5:302018-04-24T00:45:29+5:30

शहरातील नागरिकांनी २२ दिवसांमध्ये महापालिकेकडे करापोटी तब्बल ३ कोटी २३ लाख रुपयांचा भरणा केला आहे. मनपा प्रशासनाने शास्तीच्या रक्कमेत सूट दिल्याने वसुलीमध्ये मोठी वाढ झाली आहे.

Parbhani Municipal Corporation: Recovery of Twenty-three Crore | परभणी महापालिका: सव्वातीन कोटींची वसुली

परभणी महापालिका: सव्वातीन कोटींची वसुली

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : शहरातील नागरिकांनी २२ दिवसांमध्ये महापालिकेकडे करापोटी तब्बल ३ कोटी २३ लाख रुपयांचा भरणा केला आहे. मनपा प्रशासनाने शास्तीच्या रक्कमेत सूट दिल्याने वसुलीमध्ये मोठी वाढ झाली आहे.
महानगरपालिकेच्या वतीने शहरातील नागरिकांकडून घरपट्टी आणि नळपट्टीच्या स्वरुपात कराची वसुली केली जाते. यावर्षी मनपाने परभणी शहरातील नागरिकांना मालमत्ताकरामध्ये मोठी वाढ केली होती.
दोन वर्षांपूर्वी महापालिकेने केलेल्या सर्व्हेक्षणात शहरातील मालमत्तांमध्येही मोठ्या प्रमाणात वाढ झाली होती. पूर्वी महापालिकेकडे केवळ ३५ हजार मालमत्तांचीच नोंद होती. परंतु, सर्व्हेक्षणात मात्र तब्बल ७० हजार मालमत्तांची नोंदणी करण्यात आली. त्यामुळे सहाजीकच महापालिकेच्या उत्पन्नामध्ये भर पडणार आहे. महापालिकेने शहरातील मालमत्तांचे सर्व्हेक्षण केल्यानंतर १५ वर्षानंतर घरपट्टीत वाढ करण्याचा निर्णय घेतला होता. यासाठी प्रक्रियाही राबविण्यात आली. सुरुवातीच्या काळात मनपाने नागरिकांना वाढीव घरपट्टीच्या नोटिसा बजावल्या. परंतु, घरपट्टीत केलेली वाढ अवाजवी असल्याने नागरिकांनी या घरपट्टीला विरोध केला होता. मोठ्या प्रमाणात घरपट्टी दिल्याने नगरसेवक आणि इतर लोकप्रतिनिधींनीही नागरिकांची बाजू घेत घरपट्टी कमी करण्यासाठी पुढाकार घेतला.
विशेष सर्वसाधारण सभेमध्ये घरपट्टीच्या रक्कमेत मोठ्या प्रमाणात कपात करण्यात आली. जवळपास ५० टक्के कर कमी करण्यात आल्याने शहरवासियांना दिलासा मिळाला आहे. कर कमी केल्यानंतरही घरपट्टी आणि नळपट्टीच्या वसुलीत वाढ करण्यासाठी महापालिकेने सवलतीची योजना लागू केली होती. त्यात २२ एप्रिलपर्यंत घरपट्टीचा भरणा करणाऱ्या नागरिकांना १०० टक्के शास्ती माफ करण्यात आली. तर नळपट्टीधारकांना ५० टक्के शास्ती माफ करण्याचा निर्णय घेतला होता. या निर्णयामुळे नागरिकांनी मोठ्या प्रमाणात कराचा भरणा केला आहे.
१ ते २२ एप्रिल या केवळ २२ दिवसांमध्ये ३ कोटी २३ लाख रुपयांची वसुली झाली आहे. घरपट्टी वसुली आणखी वाढ होणार आहे. त्यामुळे महापालिकेच्या उत्पन्नात घसघसीत वाढ झाली आहे.
करावर लावलेल्या शास्तीच्या रक्कमेत सूट देताना २२ एप्रिलपर्यंतची मुदत निश्चित करण्यात आली होती. नागरिकांना कर भरणे सोयीचे व्हावे, यासाठी सुटीच्या दिवशीही मनपा कर्मचाºयांनी कराची रक्कम स्वीकारली. शहरातील प्रभाग समिती अ, ब आणि क या तीनही प्रभाग समितीमध्ये रात्री उशिरापर्यंत मनपा कर्मचाºयांनी घरपट्टी आणि नळपट्टीची रक्कम स्वीकारली आहे. वाढीव करामुळे मनपाच्या उत्पन्नात भर पडली असून कर्मचाºयांचे पगार व इतर खर्चाची तडजोड होणार आहे.

Web Title: Parbhani Municipal Corporation: Recovery of Twenty-three Crore

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.