परभणी-मुदखेड दुहेरी रेल्वे मार्ग शासन दरबारी बेदखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 18, 2019 11:59 PM2019-06-18T23:59:18+5:302019-06-18T23:59:32+5:30

परभणी- मुदखेड या ८१ कि.मी. रेल्वे मार्गाच्या दुहेरीकरणाच्या कामावर तीन वर्षात तब्बल २४४ कोटी रुपयांचा खर्च झाला असताना या रेल्वे मार्गाच्या कामाची महाराष्ट्र शासनाच्या आर्थिक पाहणी अहवालात साधी नोंदही घेण्यात आलेली नाही. त्यामुळे राज्यशासन दरबारी सध्या तरी हा रेल्वे मार्ग बेदखल असल्याचे दिसून येत आहे.

Parbhani-Mudkhed deputy railway route displaced Government Court | परभणी-मुदखेड दुहेरी रेल्वे मार्ग शासन दरबारी बेदखल

परभणी-मुदखेड दुहेरी रेल्वे मार्ग शासन दरबारी बेदखल

Next

अभिमन्यू कांबळे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : परभणी- मुदखेड या ८१ कि.मी. रेल्वे मार्गाच्या दुहेरीकरणाच्या कामावर तीन वर्षात तब्बल २४४ कोटी रुपयांचा खर्च झाला असताना या रेल्वे मार्गाच्या कामाची महाराष्ट्र शासनाच्या आर्थिक पाहणी अहवालात साधी नोंदही घेण्यात आलेली नाही. त्यामुळे राज्यशासन दरबारी सध्या तरी हा रेल्वे मार्ग बेदखल असल्याचे दिसून येत आहे.
राज्य विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनास १७ जूनपासून सुरुवात झाली आहे. सोमवारी पहिल्याच दिवशी राज्याचा २०१८-१९ चा आर्थिक पाहणी अहवाल जाहीर करण्यात आला. या अहवालामध्ये राज्यात सुरु असलेल्या रेल्वे कामांची सद्यस्थिती दर्शविणारी माहिती देण्यात आली आहे. त्यामध्ये राज्यातील ९ प्रमुख रेल्वेमार्गांच्या प्रकल्पाची एकूण किंमत व झालेल्या कामाची भौतिक प्रगती याबाबतची माहिती देण्यात आली आहे. या माहितीमध्ये परभणी- मुदखेड या ८१ कि.मी.च्या रेल्वे मार्गाची माहितीच देण्यात आली नाही. २०१२-१३ या वर्षात या रेल्वेमार्गाच्या दुहेरीकरणाला मंजुरी देण्यात आली. यासाठीचा अंदाजित ३९० कोटी ६० लाख रुपयांचा खर्च होता. गेल्या तीन वर्षात यापैकी २४४ कोटी रुपये खर्च करण्यात आले असून एप्रिल ते नोव्हेंबर २०१८ या कालावधीत ५५ कोटी रुपयांचा खर्च करण्यात आला आहे. परभणी ते मिरखेल या १७ कि.मी. रेल्वे मार्गाच्या दुहेरीकरणाचे काम जून २०१७ मध्ये पूर्ण झाले असून या रेल्वेमार्गाचा वापर सुरु झाला आहे. याशिवाय नांदेड जिल्ह्यातील मुगट ते मुदखेड ९.३ कि.मी. व लिंबगाव-नांदेड- मालटेकडी या १४.१० रेल्वे मार्गाचेही दुहेरीकरणाचे काम पूर्ण झाले आहे. एकूणच परभणी ते मिरखेल या रेल्वे मार्गाच्या दुहेरीकरणाचे काम वेगाने पूर्ण झाल्यास त्याचा या भागाला मोठा फायदा होणार आहे. त्यामुळे या दुहेरीकरणाच्या कामाला गती मिळणे आवश्यक असताना दक्षिणमध्य रेल्वेच्या अधिकाऱ्यांकडून याकडे गांभीर्याने पाहिले जात नाही. परभणी-पूर्णा मार्गावरील पूर्णा नदीवरील रेल्वे पुलाचे काम मंद गतीने सुरु असून हे काम पूर्ण होण्यास आणखी ६ महिन्यांचा कालावधी लागणार आहे. तर लिंबगाव येथील भुयारी रेल्वेमार्गाचे काम अंतिम टप्प्यात आहे. जमीन अधिग्रहण प्रक्रियेमुळे हे काम रखडण्याची शक्यता आहे. या कामासंदर्भात मराठवाड्यातील काही लोकप्रतिनिधींकडून पाठपुरावा होत असला तरी दक्षिण मध्य रेल्वेचे सिकंदराबाद येथील अधिकारी याकडे लक्ष देण्यास तयार नाहीत. परिणामी या रेल्वे मार्गाच्या दुहेरीकरणाचे काम कधी पूर्ण होईल, हे ही अनिश्चित आहे. राज्य शासनाच्या आर्थिक पाहणी अहवालात या रेल्वे मार्गाची नोंद झाल्यास त्यावर चर्चा होईल आणि कामाला गती मिळेल, अशी अपेक्षा होती; परंतु, याबाबत राज्य शासनालाच गांभीर्य नसल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे शासन दरबारी हा रेल्वेमार्ग का बेदखल करण्यात आला आहे, असा सवाल यानिमित्ताने उपस्थित होत आहे.
गतवर्षीच्या अहवालातीलच माहिती केली कॉपी-पेस्ट
४राज्याच्या २०१८-१९ च्या आर्थिक पाहणी अहवालात राज्यात सुरु असलेल्या रेल्वे कामांची सद्यस्थिती दर्शविणारी माहिती दिली आहे. त्यात एकूण ९ कामांचा समावेश असून एकूण रेल्वेमार्गाची लांबी, प्रकल्पाची किंमत, कामाची भौतिक प्रगती (टक्के) या बाबींचा उल्लेख आहे. विशेष म्हणजे २०१७-१८ च्या अहवालात जी माहिती देण्यात आली होती. तीच माहिती २०१८-१९ च्या १७ जून रोजी जाहीर करण्यात आलेल्या अहवालात जशाच तशी कॉपी करुन देण्यात आली आहे.
४त्या आकडेवारीमध्ये कुठल्याही प्रकारचा बदल झालेला दिसून येत नाही. त्यामुळे हा अहवाल सादर करताना अधिकाऱ्यांकडून किती गांभीर्य बाळगले जाते, याचाही नमुना यानिमित्ताने समोर आला आहे. जर २०१८-१९ चा अहवाल खरा धरला तर मग गेल्या वर्षभरात नऊही रेल्वे मार्गावर काहीच काम झाले नाही का? असा सवाल उपस्थित होत आहे.
सलग तीन वर्षांपासून नोंदच नाही
४राज्य शासनाच्या २०१६-१७, २०१७-१८ व २०१८-१९ या तिन्ही आर्थिक अहवालामध्ये परभणी- मुदखेड या ८१ कि.मी. रेल्वे मार्गाच्या दुहेरीकरण कामाची नोंदच घेण्यात आली नाही.
४ त्यामुळे या कामाची भौतिक प्रगती किती होत आहे, याची अधिकृत माहितीच शासन दरबारी नोंदविली जात नाही. परिणामी कामाला गती देण्याच्या अनुषंगाने चर्चाही होत नाही.

Web Title: Parbhani-Mudkhed deputy railway route displaced Government Court

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.