परभणी : भाजपाची सदस्य नोंदणी; काँग्रेसकडे इच्छुकांची गर्दी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 6, 2019 11:17 PM2019-07-06T23:17:57+5:302019-07-06T23:19:58+5:30

विधानसभा निवडणुकीला आणखी जवळपास तीन महिन्यांचा कालावधी असताना राजकीय पक्षांकडून या संदर्भातील तयारी सुरु करण्यात आली असून भारतीय जनता पार्टीने परभणी शहरात सदस्य नोंदणीला सुरुवात केली आहे. तर काँग्रेसने परभणी विधानसभा मतदारसंघातून इच्छुकांच्या अर्ज मागणीची प्रक्रिया पूर्ण केली आहे.

Parbhani: Members of BJP registered; A crowd of enthusiasm for Congress | परभणी : भाजपाची सदस्य नोंदणी; काँग्रेसकडे इच्छुकांची गर्दी

परभणी : भाजपाची सदस्य नोंदणी; काँग्रेसकडे इच्छुकांची गर्दी

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी: विधानसभा निवडणुकीला आणखी जवळपास तीन महिन्यांचा कालावधी असताना राजकीय पक्षांकडून या संदर्भातील तयारी सुरु करण्यात आली असून भारतीय जनता पार्टीने परभणी शहरात सदस्य नोंदणीला सुरुवात केली आहे. तर काँग्रेसने परभणी विधानसभा मतदारसंघातून इच्छुकांच्या अर्ज मागणीची प्रक्रिया पूर्ण केली आहे.
आॅक्टोबर महिन्यात विधानसभेची निवडणूक होणार असून सप्टेंबरमध्ये यासाठीची आचारसंहिता लागू शकते. त्यामुळे राजकीय पक्षांमध्ये यासाठीची तयारी सुरु झाली आहे. भारतीय जनता पार्टीच्या वतीने शनिवारी परभणी शहरात पक्षाच्या सदस्य नोंदणीस सुरुवात करण्यात आली. यानिमित्त शिवाजी चौक येथे झालेल्या कार्यक्रमास महानगर अध्यक्ष आनंद भरोसे यांच्या हस्ते या मोहिमेचा प्रारंभ करण्यात आला. यावेळी सदस्य नोंदणीची आधुनिक पद्धतही सांगण्यात आली. यावेळी सदस्य नोंदणी प्रमुख संजय शेळके, प्रमोद वाकोडकर, मोहन कुलकर्णी, नगरसेविका मंगलाताई मुद्गलकर, मधुकर गव्हाणे, रितेश जैन, सुनील देशमुख, संजय रिझवानी, नितीन वट्टमवार, प्रशांत पार्डीकर, डी.एस. कदम, अशोक सेलगावकर, अन्नपूर्वे, घुगे, दिनेश नरवाडकर, व्यंकट डहाळे, देशपांडे, भीमराव वायवळ, भालचंद्र गोरे, विजय गायकवाड, सुधीर कांबळे, संजय कुलकर्णी आदींची उपस्थिती होती. यावेळी जनसंघाचे संस्थापक डॉ.शामाप्रसाद मुखर्जी यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेचे पूजन करुन अभिवादन करण्यात आले. नवीन सदस्यांना वृक्ष भेट दिली.
दरम्यान, शिवसेनेनेही या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ‘आमदार आपल्या दारी’ हा उपक्रम सुरु केला आहे. शुक्रवारी शहरातील शंकरनगर भागात यानिमित्त कार्यक्रम घेण्यात आल्यानंतर शनिवारी प्रभाग क्रमांक १५ मधील पवनसूतनगर येथे हा उपक्रम घेण्यात आला. यावेळी आ.डॉ.राहुल पाटील, सहसंपर्क डॉ.विवेक नावंदर, नंदू पाटील यांनी उपस्थित नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या. तसेच शासकीय योजनांची माहिती दिली. यावेळी विविध विभागाचे कर्मचारीही उपस्थित होते.
वरपूडकर यांचा पाथरीसाठी अर्ज
परभणी : काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुरेश वरपूडकर यांनी पाथरी मतदारसंघातून उमेदवारी मागितली आहे. तसा शनिवारी त्यांनी रितसर अर्ज दाखल केला. परभणी विधानसभा मतदारसंघातून १४ जणांनी उमेदवारी मागितली. त्यात माजी आ.सुरेश देशमुख, तुकाराम रेंगे, शहर जिल्हाध्यक्ष नदीम इनामदार, उपमहापौर माजूलाला, भगवानराव वाघमारे, गणेश देशमुख, रविराज देशमुख, सिद्धार्थ हत्तीअंबिरे, बाळासाहेब देशमुख, विशाल बुधवंत, अ‍ॅड.मुजाहेद खान, सुनील देशमुख, सचिन अंबिलवादे, मलेका गफार यांचा समावेश आहे.

Web Title: Parbhani: Members of BJP registered; A crowd of enthusiasm for Congress

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.