परभणी : महाकवी कर्डक आंबेडकरी चळवळीच्या प्रतिभेचे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 19, 2018 12:51 AM2018-08-19T00:51:10+5:302018-08-19T00:51:15+5:30

शब्दांचे सौंदर्य, शब्दांची प्रभावी रचना करून आंबेडकरी चळवळीत समर्पित भावनेने गीत प्रबोधनातून अशिक्षीत समाजात बाबासाहेबांचे विधायक विचार पोहचविले. त्यामुळे आंबेडकरी चळवळीच्या प्रतिभेचे महाकवी वामनदादा कर्डक असल्याचे प्रतिपादन स्थागुशाचे पोलीस निरीक्षक प्रवीण मोरे यांनी केले़

Parbhani: Mahakavi Kardak talent of the Ambedkar movement | परभणी : महाकवी कर्डक आंबेडकरी चळवळीच्या प्रतिभेचे

परभणी : महाकवी कर्डक आंबेडकरी चळवळीच्या प्रतिभेचे

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : शब्दांचे सौंदर्य, शब्दांची प्रभावी रचना करून आंबेडकरी चळवळीत समर्पित भावनेने गीत प्रबोधनातून अशिक्षीत समाजात बाबासाहेबांचे विधायक विचार पोहचविले. त्यामुळे आंबेडकरी चळवळीच्या प्रतिभेचे महाकवी वामनदादा कर्डक असल्याचे प्रतिपादन स्थागुशाचे पोलीस निरीक्षक प्रवीण मोरे यांनी केले़
बोधीसत्व फाऊंडेशन लातूरच्या वतीने शहरातील बी़ रघुनाथ सभागृहात १५ आॅगस्ट रोजी महाकवी वामनदादा कर्डक जयंती महोत्सव दशकपूर्ती सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते़ यावेळी पोनि मोरे बोलत होते़ महोत्सवाच्या अध्यक्षस्थानी डॉ़ बी़टी़ धुतमल हे होते़ तर व्यासपीठावर डॉ़प्रकाश डाके, गौतम मुंडे, तहसीलदार सखाराम मांडवगडे, उद्योजक मिलिंद सावंत, राजेंद्र कांबळे, मनोहर वाव्हळे, रवि सोनकांबळे, प्रा़बालाजी आचार्य, आयोजक पू़ भंते मुदितानंद थेरो यांची उपस्थिती होती़
प्रवीण मोरे म्हणाले, राजकारणापुरते मर्यादित न राहता युवकांनी सर्वव्यापी बाबासाहेब आंबेडकरांना समजून घेणे गरजेचे आहे़ त्याचबरोबर कलावंतांनी वानमदादा कर्डक यांचा वारसा जोपासावा, असेही आवाहन केले़ या कार्यक्रमात सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रातील योगदानाबाबत महाकवी वामनदादा कर्डक जीवन गौरव पुरस्काराने डॉ़संदीप काला, प्रा़ वाय़आऱ कुºहाडे, नंदकुमार टाक यांना मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले़ मानपत्राचे वाचन गौतम मुंडे, अरविंद हनमंते, पंकज खेडकर यांनी केले़ भीमप्रकाश गायकवाड, अ‍ॅड़ रवि गायकवाड, नागेश सोनपसारे यांचा विशेष सन्मान करण्यात आला़ दासराव पुंडगे, शाहीर भागवान वाघमारे, शुभम मस्के, बबन दिपके, भारती राऊत, अन्नपूर्णा लाटे यांनी ‘गाणे वामना’चे सादर केले़
संजय बगाटे यांनी सूत्रसंचालन केले़ प्रा़बालाजी आचार्य यांनी आभार मानले़ यशस्वीतेसाठी गोपीनाथ कांबळे, बाबाजी बनसोडे, सचिन पाचपुंजे, प्रमोद अंबोरे, सिद्धार्थ झोडपे, मिलिंद कांबळे, धनंजय एंगडे आदींनी प्रयत्न केले़
४महाकवी वामनदादा कर्डक जयंती महोत्सव दशकपूर्ती सोहळ्याच्या शेवटी ‘गाणे वामना’चे या गीताचे सादरीकरण करण्यात आले़ त्यांना संविधान गायकवाड, समाधान गायकवाड, समाधान किरवले, आनंद वाव्हळे, पद्माकर वायवळ, सचिन लोखंडे यांनी साथ संगत दिली़ या सोहळ्यास जिल्ह्यातील आंबेडकरप्रेमी नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती़

Web Title: Parbhani: Mahakavi Kardak talent of the Ambedkar movement

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.