परभणी : आखाड्याला आग लागून लाखोंचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 22, 2019 11:36 PM2019-05-22T23:36:57+5:302019-05-22T23:37:30+5:30

शेत आखाड्याला आग लागून जीवनावश्यक वस्तूंसह ५ मेंढ्या व रोख दीड लाख रुपये जळून खाक झाल्याची घटना सोनपेठ तालुक्यातील बोंदरगाव येथे १९ मे रोजी सकाळी ११ वाजेच्या सुमारास घडली़

Parbhani: The loss of lakhs of people after the fire in the Akhda | परभणी : आखाड्याला आग लागून लाखोंचे नुकसान

परभणी : आखाड्याला आग लागून लाखोंचे नुकसान

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
सोनपेठ (परभणी): शेत आखाड्याला आग लागून जीवनावश्यक वस्तूंसह ५ मेंढ्या व रोख दीड लाख रुपये जळून खाक झाल्याची घटना सोनपेठ तालुक्यातील बोंदरगाव येथे १९ मे रोजी सकाळी ११ वाजेच्या सुमारास घडली़
तालुक्यातील बोंदरगाव येथील दत्ता देविदास सातपुते यांचा बोंदरगाव शिवारात शेत आखाडा आहे़ या आखाड्यावर शेती उपयोगी साहित्यासह मेंढीचे पाच पिले ठेवण्यात आली होती़ १९ मे रोजी सकाळी ११ वाजेच्या सुमारास या आखाड्यास अचानक आग लागली़ या आगीत ५ पोते ज्वारी, ३ फवारे, ५ मेंढीचे पिले, एक मोटार सायकल व दीड लाख रुपये रोख रक्कम जळून खाक झाल्याची घटना घडली़ या घटनेन दत्ता सातपुते यांचे कुटूंब उघड्यावर आले आहे़ त्यामुळे तालुका प्रशासनाने या घटनेचा पंचनामा करून मदत देण्यात यावी, अशी मागणी होत आहे़

Web Title: Parbhani: The loss of lakhs of people after the fire in the Akhda

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.