परभणी: सव्वा लाख कुटुंबांची यादी झाली अपलोड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 24, 2019 12:01 AM2019-02-24T00:01:36+5:302019-02-24T00:02:11+5:30

शेतकऱ्यांना निश्चित उत्पन्न मिळण्याकरीता केंद्र शासनाने सुरू केलेल्या प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेंतर्गत २३ फेब्रुवारीपर्यंत जिल्ह्यातील १ लाख ३० हजार ५२ पात्र शेतकरी कुटुंबाची यादी केंद्र शासनाच्या पोर्टलवर अपलोड करण्यात आली आहे.

Parbhani: List of 5 million families uploaded | परभणी: सव्वा लाख कुटुंबांची यादी झाली अपलोड

परभणी: सव्वा लाख कुटुंबांची यादी झाली अपलोड

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : शेतकऱ्यांना निश्चित उत्पन्न मिळण्याकरीता केंद्र शासनाने सुरू केलेल्या प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेंतर्गत २३ फेब्रुवारीपर्यंत जिल्ह्यातील १ लाख ३० हजार ५२ पात्र शेतकरी कुटुंबाची यादी केंद्र शासनाच्या पोर्टलवर अपलोड करण्यात आली आहे.
जिल्ह्यात शेतकºयांना ऐन निवडणुकीच्या तोंडावर वार्षिक ६ हजार रुपये मानधन देण्याचा निर्णय केंद्र सरकारने १ फेबु्रुवारी रोजी घेतला. शेतकºयांना निश्चित उत्पन्न मिळावे व आर्थिक मदत म्हणून अर्थसंकल्पात ही घोषणा केली आहे. २ हेक्टरपर्यंत जमीन असणाºया शेतकºयांच्या बँक खात्यात ३ टप्यात ६ हजार रुपये जमा केले जाणार आहेत. याचा पहिला हप्ता मार्च महिन्यात दुसºया आठवड्यात जमा केला जाणार आहे. दुसरा हप्ता एप्रिल व तिसरा हप्ता जूनमध्ये दिला जाणार आहे. जिल्ह्यात ही योजना राबविण्यासाठी व नोंदणी करण्यासाठी तलाठी, ग्रामसेवक, कृषीसहाय्यक यांच्या गावनिहाय नियुक्त्या करण्यात आल्या आहेत. जिल्ह्यात ८४८ गावे असून ४ लाख ४८ हजार २०१ एवढी शेतकºयांची संख्या आहे. आतापर्यंत ८३४ गावांतील शेतकºयांची माहिती संकलित करण्यात आली आहे. यामध्ये २३ फेब्रुवारीपर्यंत परिपूर्ण प्रस्ताव आलेल्या शेतकºयांची १ लाख ७१ हजार ४७ एवढी संख्या आहे. त्यापैकी ७८८ गावांतील १ लाख ३० हजार ५२ पात्र शेतकरी कुटुंबांची माहिती शासनाच्या पोर्टलवर अपलोड केली आहे.
१२८१ कुटुंबे योजनेपासून वंचित
४देवगाफाटा-पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेतंर्गत ५ एकरपर्यंत शेती असणाºया शेतकºयांना वार्षिक ६ हजार रुपयांची मदत केली जाणार आहे; परंतु, यासाठी जाचक अटी असल्याने देवगाफाटा सज्जांतर्गत येणाºया २०९३ कुटुंबांपैकी केवळ ८१२ कुटुंबातील व्यक्तींनाचा या योजनेचा लाभ मिळणार आहे. परिणामी १२८१ कुटुंब या योजनेच्या लाभापासून वंचित राहणार आहेत. अर्थमंत्री पियूष गोयल यांनी अर्थसंकल्पात प्रधानमंत्री सन्मान योजनेची घोषणा केली आहे. या योजनेंतर्गत देवगावफाटा सज्जाचे तलाठी एन.आर. सोडगीर यांनी या सज्जांतर्गत देवगावफाटा, नांदगाव, बोरकिनी, नरसापूर येथील शेतकºयांना माहिती दिली. यासाठी आवश्यक असणारी कागदपत्रे शेतकरी बांधवांकडून घेऊन शासकीय संकेतस्थळावर अपलोड केली आहेत. या माहितीप्रमाणे देवगावफाटा येथील ५५९ कुटुंबांपैकी २६५, नांदगाव येथील २५० पैकी १६० कुटुंब, बोरकिनी येथील ८३४ पैकी २५१ कुटुंब तर नरसापूर येथील ४५० पैकी १३६ कुटुंबातील व्यक्तीचा या योजनेचा मिळविण्यासाठी पात्र ठरणार आहेत. त्यामुळे देवगावफाटा सज्जांतर्गत येणाºया २०९३ कुटुंबांपैकी केवळ ८१२ कुटुंबातीलच सदस्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे. त्यामुळे शासनाच्या अटी व निकषाच्या अडथळ्यामुळे देवगाफाटा महसुल मंडळातील १२८१ कुटुंब या योजनेपासून वंचित राहणार आहेत. त्यामुळे शेतकºयांमधून तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. याकडे जिल्हाधिकाºयांनी लक्ष द्यावे, अशी मागणी शेतकºयांमधून केली जात आहे.

Web Title: Parbhani: List of 5 million families uploaded

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.