परभणी : २०० ठिकाणी अवैध धंदे तेजीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 21, 2018 12:27 AM2018-10-21T00:27:57+5:302018-10-21T00:28:23+5:30

शहरासह तालुक्यात २०० पेक्षा जास्त ठिकाणी अवैध देशी व हातभट्टी दारू सहज उपलब्ध होत आहे. तर ठिकठिकाणी कल्याण-मुंबई नावाचा जुगार, क्लब व अवैध लॉटरी सेंटर खुलेआम सुरू आहेत. या धंद्यांना नेमके कोणाचे पाठबळ मिळत आहे? याबाबत तर्क-वितर्क लावले जात आहेत.

Parbhani: The illegal trade in 200 places | परभणी : २०० ठिकाणी अवैध धंदे तेजीत

परभणी : २०० ठिकाणी अवैध धंदे तेजीत

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
जिंतूर (परभणी) : शहरासह तालुक्यात २०० पेक्षा जास्त ठिकाणी अवैध देशी व हातभट्टी दारू सहज उपलब्ध होत आहे. तर ठिकठिकाणी कल्याण-मुंबई नावाचा जुगार, क्लब व अवैध लॉटरी सेंटर खुलेआम सुरू आहेत. या धंद्यांना नेमके कोणाचे पाठबळ मिळत आहे? याबाबत तर्क-वितर्क लावले जात आहेत.
शहरात मागील सहा महिन्यांपासून वरवर मुंबई, कल्याण, मीलन नाईट नावाचा जुगार बंद असल्याचे दिसत असले तरी अनेक ठिकाणी हा जुगार राजरोसपणे सुरू आहे. ग्राहकांना चिठ्ठी न देता डायरी व मोबाईलवर हा जुगार चालू आहे. विशेषत: शहरातील बसस्थानक, मोंढा, तहसील परिसर या ठिकाणी जुगाराचे प्रमाण वाढले आहे. एकीकडे पोलीस प्रशासन अवैध धंदे बंद करण्याचा कांगावा करीत असले तरी या बंदमधील चालू धंद्यांना पाठबळ कोणाचे? हे न समजणारे कोडे आहे.
या शिवाय शहरात चार ते पाच ठिकाणी क्लब आहेत. राजकीय पार्श्वभूमी असलेल्या बड्याहस्तींचे हे क्लब असल्याने कार्यवाही होत नाही. तसेच अनाधिकृत लॉटरी सेंटरही खुलेआम सुरू आहेत. शहरासह ग्रामीण भागात देशीदारू सहज किराणा दुकान, पानटपरी व इतर ठिकाणी उपलब्ध होते. दररोज ंिजंतूर, इटोली, चारठाणा, बोरी आदी भागातील शेकडो बॉक्स दारू वाहतूक केल्या जाते. प्रत्येक गावात दोन ते तीन ठिकाणी दारू मिळते. या ठिकाणाहून पोलीस प्रशासनाला मोठा महसूल मिळत असल्याची चर्चा आहे. तसेच तालुक्यातील वाडी, तांड्यावर हातभट्टीचे प्रस्त वाढले आहे. हजारो लिटर हातभट्टी दारू तयार करून विक्री होत आहे. याकडेही कानाडोळा केला जात आहे. एकंदरित शहरातील वाढते अवैध धंदे, ग्रामीण भागातील अवैध दारू विक्री, हातभट्टीचे वाढते प्रस्थ यामुळे पोलीस प्रशासनाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.
सतरंजी टाकून चालतो जुगार
४शहरातील काही प्रतिष्ठीत व्यक्तीकडून शहराबाहेरील एमआयडीसी परिसरात रात्रीच्या वेळी सतरंजी टाकून जुगार खेळला जातो. एवढेच नव्हे तर यासाठीची सर्व व्यवस्था एका व्यक्तीने केली आहे. यातून मोठी आर्थिक उलाढाल होते. विशेष म्हणजे हा एक छोटा क्लब बनल्याची चर्चा सुरू आहे.
पोलीस प्रशासन गप्प का?
४शहरात व तालुक्यात सुरू असलेल्या अवैध धंद्याबाबत कठोर कारवाई करण्याऐवजी पोलीस बघ्याची भूमिका घेत आहेत. कारवाई न करण्यामागे पोलिसांचा हेतू काय आहे, असा प्रश्न नागरिकातून चर्चिला जात आहे. विशेष म्हणजे शहरातील दोन कि.मी. अंतरावर मैनापुरी या धार्मिक व पवित्र मंदिरात तसेच बंद पडलेल्या एका कारखान्याशेजारी शहरातील काही युवक मद्यपान व जुगार खेळत आहेत.

शहरात व परिसरात मटका व अवैध धंदे बंद केले आहेत. कुठे चालू असतील तर लगेच कार्यवाही करू. नागरिकांनी जागरूक राहुून पोलिसांना माहिती दिली पाहिजे.
-सोनाजी आम्ले, पोलीस निरीक्षक, जिंतूर

Web Title: Parbhani: The illegal trade in 200 places

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.