परभणी : धान्याचा अपहार करणारी टोळी सक्रिय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 17, 2018 12:23 AM2018-02-17T00:23:17+5:302018-02-17T00:23:24+5:30

ई-पॉज मशीनच्या माध्यमातून लाभार्थ्यांना धान्य वितरित करुन रेशनच्या धान्याचा काळा बाजार रोखण्याची वल्गना करणाºया पुरवठा विभागाच्या उपाययोजना कागदावरच राहिल्या आहेत. त्यामुळे या धान्याचा अपहार करणारी टोळी सक्रिय झाल्याचे गेल्या काही दिवसांपासून स्पष्ट होऊ लागले आहे.

Parbhani: The granary gang activated | परभणी : धान्याचा अपहार करणारी टोळी सक्रिय

परभणी : धान्याचा अपहार करणारी टोळी सक्रिय

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : ई-पॉज मशीनच्या माध्यमातून लाभार्थ्यांना धान्य वितरित करुन रेशनच्या धान्याचा काळा बाजार रोखण्याची वल्गना करणाºया पुरवठा विभागाच्या उपाययोजना कागदावरच राहिल्या आहेत. त्यामुळे या धान्याचा अपहार करणारी टोळी सक्रिय झाल्याचे गेल्या काही दिवसांपासून स्पष्ट होऊ लागले आहे.
परभणी जिल्ह्यात रेशनच्या धान्याचा काळा बाजार करण्याची परंपरा गेल्या अनेक वर्षांपासून सुरु आहे. आॅगस्ट २०१६ मध्ये २८ कोटी रुपयांच्या धान्याचा घोटाळा केल्या प्रकरणी तब्बल ३७ जणांवर पोलिसांत गुन्हे दाखल झाले होते. या प्रकरणात महसूल विभागाने त्यांच्या विभागातील अधिकाºयांना एकीकडे पाठिशी घातले तर दुसरीकडे पोलिसांनी प्रारंभी चांगला तपास केला. त्यानंतरच्या तपासात घेतलेली कचखाऊ भूमिका कायम आहे. विशेषत: हिंगोलीच्या अधिकाºयांकडे या प्रकरणाचा तपास गेल्यापासून फाईलींवर धूळ साचली आहे. आता या प्रकरणी पुढील कारवाई होण्याची सुताराम शक्यता वाटत नाही. परभणीचा धान्य घोटाळा राज्यभर गाजला. त्यामुळे मधील काळात पुरवठा विभागाकडून धान्य वितरित करताना बरीच खबरदारी घेतली जात होती. याच काळात रेशनचे धान्य वाहून नेणाºया वाहनांना जीपीएस यंत्रणा बसविणे, ई-पॉस मशीनच्या माध्यमातून लाभार्थ्यांना धान्य वितरित करणे, आधारकार्डची रेशन कार्डशी जोडणी करणे आदी उपक्रम पारदर्शक कारभारासाठी राबविण्यात येत असल्याचे पुरवठा विभागाकडून सांगण्यात आले. त्यामुळे पुरवठा विभागात खरोखरच बदल झाला की काय? अशी चर्चा सर्वसामान्यांमध्ये होऊ लागली असतानाच पुन्हा एकदा रेशन धान्य माफिया सक्रिय झाल्याचे प्रकार समोर येऊ लागले आहेत.
चार महिन्यांपूर्वी पूर्णा तालुक्याला रेशनचे धान्य वितरित करणारा टेंपो वसमतमध्ये असल्याचे दिसून आले होते. त्यावेळी चौकशीत हा टेंपो तेथे रिकामा उभा असल्याचे सांगण्यात आले. त्यावेळी वरिष्ठ अधिकाºयांकडून कडक भूमिका घेतली गेली नाही. याच पार्श्वभूमीवर १२ फेब्रुवारी रोजी परभणी- वसमत महामार्गावर असोला पाटीजवळ ताडकळस पोलिसांनी काळ्या बाजारात जाणारे रेशनचे जवळपास ४० क्विंटल धान्य पकडले होते. या प्रकरणी ताडकळस पोलीस ठाण्यात दोघांविरुद्ध गुन्हा दाखल झाला. या प्रकरणाचा तपास सध्या ग्रामीणचे उपविभागीय पोलीस अधिकारी सुधाकर रेड्डी यांच्याकडून सुरु आहे. त्यानंतर १३ फेब्रुवारी रोजी माजलगाव पोलिसांनी पाथरी येथील दुकानांमधून आलेले रेशनचे धान्य असलेला टेंपो पकडला होता. या प्रकरणी तालुक्यातील १४ रेशन दुकानदारांच्या चौकशीचे आदेश तहसीलदार वासुदेव शिंदे यांनी गुरुवारी दिले होते. शुक्रवारी नायब तहसीलदार निलेश पळसकर यांनी माजलगाव येथे जावून पोलिसांच्या ताब्यात असलेल्या धान्याची तपासणी केली.
माजलगाव पोलिसांनी जे धान्य पकडले ते पाथरीतील पुरवठा विभागातील गोदामातून बाहेर गेल्याची माहिती आहे. येथील गोदामपाल हे दोन दिवसांपासून गायब आहेत. पुरवठा विभागाकडून आता ज्या १४ रेशन दुकानदारांवर संशय व्यक्त केला जात आहे, त्यांनी प्रत्यक्ष किती रेशनचे धान्य उचलले, त्यापैकी वितरित किती केले, शिल्लक किती होते, याबाबतची माहिती घेतली जात आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार उचलेले धान्य व वितरित केलेल्या धान्यात तफावत आढळून आले असल्याचे समजते. त्यामुळे रेशनच्या धान्याचा काळा बाजार पाथरीतूनही सुरु झाल्याच्या चर्चेला दुजोरा मिळत आहे.
परभणीत दोन दुकानांना सील ठोकले
४ताडकळस पोलिसांनी १२ फेब्रुवारी रोजी असोला पाटीजवळ जे रेशनचे धान्य पकडले होते, ते धान्य परभणी शहरातील संजय गांधी नगर भागातील दोन रेशन दुकानांतून गेल्याचे पोलीस चौकशीत स्पष्ट झाले आहे. त्यामुळे या प्रकरणी आता संबंधित रेशन दुकानदारांवरही गुन्हा दाखल होण्याची शक्यता आहे. पुरवठा विभागाच्या वतीने या दोन दुकानांना सील ठोकण्यात आले आहे. तशी माहिती तहसीलदार विद्याचरण कडवकर यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.
वादातून नांदेड ऐवजी माजलगावला गेले धान्य
परभणी जिल्ह्यातून रेशनचे धान्य काळ्या बाजारात विक्री करण्यासाठी नांदेडला जात असल्याचे सातत्याने उघड झाले आहे. विशेष म्हणजे परभणीतील धान्य घोटाळ्यात नांदेडच्याच दोघांचा आरोपींमध्ये समावेश आहे. या पार्श्वभूमीवर १२ फेब्रुवारी रोजी ताडकळस पोलिसांनी रेशनचे धान्य घेऊन जाणारा पकडलेला टेंपो नांदेडकडेच जात होता. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार पाथरीचे धान्यही पूर्वी नांदेडकडे जात होते. परंतु, नांदेड येथील संबंधित व्यक्तीशी परभणी जिल्ह्यातून धान्य पाठविणाºयांचा वाद झाल्याने हे धान्य माजलगावकडे पाठविण्यात आले. त्यातूनच बीड पोलिसांना खबºयामार्फत गुप्त माहिती मिळाली आणि त्या माहितीच्या आधारे माजलगाव पोलिसांनी पाथरीतून आलेल्या रेशनच्या धान्याचा टेंपो पकडल्याचे समजते.

Web Title: Parbhani: The granary gang activated

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.