परभणी: खाजगी बसमधून माल वाहतूक करण्यास शासनाकडून बंदी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 25, 2019 12:09 AM2019-06-25T00:09:54+5:302019-06-25T00:10:27+5:30

खाजगी प्रवासी बसेसमधून माल वाहतूक करण्यास कायद्याने बंदी घालण्यात आली असून, अशा प्रकारे वाहतूक केल्याचे आढळून आल्यास परिवहन विभागातर्फे संबंधितांवर कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले असल्याची माहिती परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी विधान परिषदेत एका प्रश्नावर लेखी स्वरुपात दिली़

Parbhani: Government ban on transport by private buses | परभणी: खाजगी बसमधून माल वाहतूक करण्यास शासनाकडून बंदी

परभणी: खाजगी बसमधून माल वाहतूक करण्यास शासनाकडून बंदी

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : खाजगी प्रवासी बसेसमधून माल वाहतूक करण्यास कायद्याने बंदी घालण्यात आली असून, अशा प्रकारे वाहतूक केल्याचे आढळून आल्यास परिवहन विभागातर्फे संबंधितांवर कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले असल्याची माहिती परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी विधान परिषदेत एका प्रश्नावर लेखी स्वरुपात दिली़
परभणी जिल्ह्यातील खाजगी प्रवासी वाहतूक करणाऱ्या बसमधून मोठ्या प्रमाणात माल वाहतूक केली जात आहे़ या अनुषंगाने भाजपाचे आ़ प्रवीण दरेकर, शिवसेनेचे आ़ अनिल परब, आ़ मनिषा कायंदे, आ़ गिरीष व्यास, आ़ भाई गिरकर, आ़ नागोराव गाणार यांनी विधान परिषदेत या संदर्भात प्रश्न उपस्थित केला होता़ त्यावर बोलताना परिवहन मंत्री दिवाकर रावते म्हणाले की, खाजगी बसेसमधून माल वाहतूक करण्यास कायद्याने बंदी आहे़ अशा प्रकारची वाहतूक केल्याचे आढळल्यास परिवहन विभागातर्फे संबंधितावर कारवाई करण्यात यावी, असे आदेश शासनाने दिले आहेत़ परिवहन आयुक्त कार्यालयाने २२ जानेवारी २०१९ रोजी राज्यातील सर्व परिवहन कार्यालयांना खाजगी बसेसमधून होणाºया अवैध माल वाहतुकीविरूद्ध कारवाई करण्यासाठी २४ जानेवारी ते ७ फेब्रुवारी या कालावधीत विशेष तपासणी मोहीम राबवावी म्हणून निर्देश दिले होते़ त्या अनुषंगाने २ हजार ४०९ वाहनांची तपासणी करण्यात आली़ यामध्ये ३८८ वाहने दोषी आढळून आली असून, त्यांच्याकडून १६ लाख २१ हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. ११ वाहनांची अनुज्ञप्ती निलंबित करण्यात आली आहे़ तसेच २०१७-१८ ते मे २०१९ या कालावधीत खाजगी बसेसमधून होणाºया माल वाहतुकीविरूद्ध केलेल्य कारवाईत २५ हजार ४५२ वाहनांची तपासणी करण्यात आली़ यामध्ये १ हजार ७२९ वाहने दोषी आढळून आली असून, त्यापोटी ४३ लाख ४७ हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला व १८० वाहनांची अनुज्ञेप्ती व १८३ परवाने निलंबित करण्यात आले आहे, असे परिवहन मंत्री रावते म्हणाले़
परभणीत अंमलबजावणी होईना
४परभणी शहरातील काही खाजगी प्रवासी बसमधून सर्रासपणे माल वाहतूक केली जात आहे़ विशेष म्हणजे भर रस्त्यावर अशी वाहने उभी करून वाहनांच्या डिक्कीमध्ये माल भरला जात असताना येथील उप प्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालयाकडून कारवाई करण्याकडे दुर्लक्ष केले जात आहे़
४परिणामी शासनाचा आदेश असतानाही त्याकडे काना डोळा केला जात असल्याने खाजगी प्रवासी बस चालकांचे फावत आहे़ त्यामुळे या प्रकरणी परिवहन विभागाच्या अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी होत आहे़

Web Title: Parbhani: Government ban on transport by private buses

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.