परभणी : ‘व्यापाऱ्यांप्रमाणे मच्छीमारांना भाव द्यावा’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 9, 2019 11:49 PM2019-04-09T23:49:06+5:302019-04-09T23:49:32+5:30

जिल्ह्यात पावसाअभावी दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली असून मासेमारी हा व्यवसाय धोक्यात आला आहे. तेव्हा मत्स्य व्यवसाय संस्था व्यापाऱ्यांना ज्या दराने मासे विक्री करतात तोच दर मासेमारी करणाºया मच्छीमारांना द्यावा, अशी मागणी केली जात आहे. मात्र अद्याप तोडगा निघाला नसल्याने भोई समाजावर उपासमारीची वेळ आली आहे.

Parbhani: 'To give favors to fishermen like merchants' | परभणी : ‘व्यापाऱ्यांप्रमाणे मच्छीमारांना भाव द्यावा’

परभणी : ‘व्यापाऱ्यांप्रमाणे मच्छीमारांना भाव द्यावा’

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : जिल्ह्यात पावसाअभावी दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली असून मासेमारी हा व्यवसाय धोक्यात आला आहे. तेव्हा मत्स्य व्यवसाय संस्था व्यापाऱ्यांना ज्या दराने मासे विक्री करतात तोच दर मासेमारी करणाºया मच्छीमारांना द्यावा, अशी मागणी केली जात आहे. मात्र अद्याप तोडगा निघाला नसल्याने भोई समाजावर उपासमारीची वेळ आली आहे.
परभणी जिल्ह्यात येलदरीसह इतर प्रकल्पांमध्ये मासेमारी केली जाते. जिंतूर तालुक्यातील येलदरी भागात मत्स्य व्यवसाय मोठ्या प्रमाणात आहे. गोड्या पाण्यातील या माशांना परराज्यात मोठी मागणी आहे. मात्र यावर्षी अत्यल्प पाणीसाठा असल्याने मासेमारीवर अवलंबून असलेल्या भोई समाजाला समस्यांचा सामना करावा लागत आहे. तेंव्हा येलदरी जलाशयावर असलेल्या पूर्णा मत्स्य व्यवसाय सहकारी संस्थेने व्यापाऱ्यांना माशांचा दिला जाणारा दर भोई समाजालाही द्यावा, अशी मागणी केली जाते.
मत्स्य व्यवसाय विभागाच्या अधिकाºयांसमवेत या अनुषंगाने चारवेळा बैठकाही पार पडल्या; परंतु, अद्यापही तोडगा निघालेला नाही. तेव्हा पूर्णा मत्स्य व्यवसाय सहकारी संस्था आणि संबंधित पदाधिकाºयांनी याकडे लक्ष घालून तोडगा काढावा, अशी मागणी भोई समाज संघटनेचे नानासाहेब लकारे, रमेश गहिरे, हिरामण लहरे, मनोज कटकुरी, गजानन माने, उत्तम कचरे, कोंडिराम बिजुले, गोविंद गहिरे, रामकिशन गव्हाणे, कुटारे, मुंगासे, संतोष लहरे आदींनी केली आहे.
मत्स्य व्यवसाय धोक्यात
जिल्ह्यातील प्रकल्पांमध्ये पाणीसाठाच उपलब्ध नसल्याने मत्स्य व्यवसाय धोक्यात आला आहे. मागील वर्षभरापासून ही परिस्थिती असल्याने मासेमारी करणाºया कुटुंबियांची उपासमार होत आहे.

Web Title: Parbhani: 'To give favors to fishermen like merchants'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.