परभणी : गंगाखेड तहसीलसमोर धरणे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 21, 2018 12:43 AM2018-11-21T00:43:03+5:302018-11-21T00:43:11+5:30

तालुक्यातील दुष्काळग्रस्त भागात विविध योजना राबवून शेतकरी व शेतमजुरांना तातडीने मदत वाटप करावी, यासह अन्य मागण्यांसाठी १९ नोव्हेंबर रोजी डोंगरी विकास जनआंदोलन समितीच्या वतीने तहसीलसमोर एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले.

Parbhani: Gangadhar Tahsil | परभणी : गंगाखेड तहसीलसमोर धरणे

परभणी : गंगाखेड तहसीलसमोर धरणे

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
गंगाखेड (परभणी): तालुक्यातील दुष्काळग्रस्त भागात विविध योजना राबवून शेतकरी व शेतमजुरांना तातडीने मदत वाटप करावी, यासह अन्य मागण्यांसाठी १९ नोव्हेंबर रोजी डोंगरी विकास जनआंदोलन समितीच्या वतीने तहसीलसमोर एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले.
गावा-गावांमध्ये चारा छावण्या उभाराव्यात, पाणीटंचाई दूर करण्यासाठी टँकर सुरु करावेत, शेतकऱ्यांचे वीज बिल १०० टक्के माफ करावे, २०१७-१८ या वर्षात वाटप झालेल्या पीक विम्याच्या याद्या प्रत्येक गावात ग्रा.पं.च्या भिंतीवर डकवाव्यात, वंचित शेतकºयांना पीक विम्याने तात्काळ वाटप करावे, रोहयोच्या कामांना मंजुरी द्यावी, कर्ज खात्यात वळती केलेली पीक विम्याची रक्कम शेतकºयांना परत द्यावी आदी मागण्यांसाठी डोंगरी विकास जनआंदोलन समितीच्या वतीने सोमवारी दिवसभर तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. आंदोलनात समितीचे पंडितराव घरजाळे, ज्ञानोबा फड आदींसह शेतकरी, शेतमजूर मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

Web Title: Parbhani: Gangadhar Tahsil

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.