परभणी : जवळा येथील युवकाच्या खून प्रकरणी चौघांना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 20, 2018 12:52 AM2018-08-20T00:52:48+5:302018-08-20T00:53:31+5:30

युवकाचा खून करून त्याचा मृतदेह कालव्यात फेकल्याची घटना १८ आॅगस्ट रोजी समोर आली होती़ या प्रकरणी पोलिसांनी चौघांना अटक केली आहे़

Parbhani: Four people arrested in Juvenile murder case | परभणी : जवळा येथील युवकाच्या खून प्रकरणी चौघांना अटक

परभणी : जवळा येथील युवकाच्या खून प्रकरणी चौघांना अटक

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
पाथरी : युवकाचा खून करून त्याचा मृतदेह कालव्यात फेकल्याची घटना १८ आॅगस्ट रोजी समोर आली होती़ या प्रकरणी पोलिसांनी चौघांना अटक केली आहे़
तालुक्यातील जवळा झुटा येथील दिगंबर लिंबाजी नाईकनवरे (१९) याचे अपहरण करून त्याचा खून करण्यात आला़ जायकवाडीच्या कालव्यात दिगंबर नाईकनवरे याचा मृतदेह आढळला होता़ या प्रकरणी पाथरी पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा नोंद झाला़ स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेच्या पथकाने या प्रकरणात तपास सुरू केला़ मिळालेल्या माहितीनुसार चौघांनी दिगंबरचा खून केल्याचे स्पष्ट झाले़ पोलिसांनी या प्रकरणात अंगद आश्रोबा झुटे याला बीड जिल्ह्यातील माजलगाव येथून तर शेख कदीर शेख इस्माईल, लक्ष्मण बाबासाहेब झुटे आणि गणेश सोपानराव सुरवसे यांना ताब्यात घेतले़ त्यांच्याकडे विचारपूस केली असता, चौघांनी मिळून कट रचून हा खून केल्याचे स्पष्ट झाले़ अनैतिक संबंधाच्या कारणावरून दिगंबर यास मारण्याचा कट रचला होता़ त्यानुसार अंगद झुटे, शेख कदीर शेख इस्माईल आणि लक्ष्मण बाबासाहेब झुटे यांनी त्यास जिवे मारले़ तर गणेश सोपानराव सुरवसे हा कट रचण्यात मुख्य आरोपी असून, त्याने दिगंबर यास मारण्यासाठी बाहेरून मदत केल्याची माहिती पोलिसांना मिळाली आहे़ पोलिसांनी चारही आरोपींना ताब्यात घेतले आहे़ पोलीस अधीक्षक कृष्ण कांत उपाध्याय, अप्पर पोलीस अधीक्षक विश्व पानसरे, उपविभागीय पोलीस अधिकारी रेणुका वागळे, स्थागुशाचे प्रवीण मोरे, पोलीस निरीक्षक श्रीमनवार यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक विवेक सोनवणे, सुग्रीव केंद्रे, जमीर फारुखी, किशोर चव्हाण, माने, काळे, मोहिते यांनी ही कामगिरी केली़

Web Title: Parbhani: Four people arrested in Juvenile murder case

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.