परभणी : चार अवैध वाळू साठे केले जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 16, 2018 12:16 AM2018-05-16T00:16:15+5:302018-05-16T00:16:15+5:30

महसूलच्या पथकाने तालुक्यात केलेल्या कारवाईत दोन दिवसांमध्ये चार वाळूसाठे जप्त केले आहेत़ जप्त केलेली १६० ब्रास वाळू सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयात जमा करण्यात आली़

Parbhani: Four illegal sand stacks were seized | परभणी : चार अवैध वाळू साठे केले जप्त

परभणी : चार अवैध वाळू साठे केले जप्त

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
गंगाखेड : महसूलच्या पथकाने तालुक्यात केलेल्या कारवाईत दोन दिवसांमध्ये चार वाळूसाठे जप्त केले आहेत़ जप्त केलेली १६० ब्रास वाळू सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयात जमा करण्यात आली़
गोदावरी नदीपात्रातून अनधिकृतरीत्या वाळू उपसा करून ती ठिक ठिकाणी साठवली होती़ हे वाळू साठे जप्त करण्यासाठी एका पथकाची नियुक्ती करण्यात आली होती़ या पथकाने झोला, मसला, खळी, गौंडगाव, चिंचटाकळी, मैराळ सावंगी, दुसलगाव, भांबरवाडी, महातपुरी, आनंदवाडी, धारखेड, नागठाणा, मुळी, धारासूर इ. गावांमध्ये वाळू साठ्यांचा शोध घेतला़ १३ मे रोजी पिंपरी (झोला) शिवारात २ आणि १५ मे रोजी गंगाखेड शहरातील दत्तमंदिर परिसरात आढळलेले २ असे ४ वाळू साठे जप्त करण्यात आले़ ही कारवाई नायब तहसीलदार गणेश चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली स्थापन केलेल्या पथकाने केली़ या पथकात मंडळ अधिकारी विक्रम गायकवाड, यु़टी़ सरोदे, बालाजी लटपटे, तलाठी आऱडी़ भराड, शिवाजी मुरकुटे, गजानन फड, चंद्रकांत साळवे, एम़ए़ नेमाडे, अव्वल कारकून दत्तराव बिलापट्टे, राहुल गोला, गणेश वाघ यांचा समावेश होता.
वाळू साठे जप्त करण्याची मोहीम गतिमान केल्याने तालुक्यात हजारो ब्रास अवैध वाळू साठे मिळून येण्याची शक्यता आहे़

Web Title: Parbhani: Four illegal sand stacks were seized

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.