परभणी : चार अवैध वाळूसाठे जप्त !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 23, 2019 11:39 PM2019-04-23T23:39:40+5:302019-04-23T23:40:34+5:30

कॅमेऱ्यांची नजर चुकवित वाळूचा बेसुमार उपस्या’ या मथळ्याखाली २० एप्रिल रोजी ‘लोकमत’ने प्रसिद्ध केलेल्या वृत्ताची दखल घेत महसूल प्रशासनाने २३ एप्रिल रोजी तालुक्यातील गौंडगाव, झोला पिंप्री व मसला येथे अवैध चार वाळू साठे जप्त केले़ या कारवाईमुळे वाळूमाफियांत खळबळ उडाली आहे़

Parbhani: Four illegal sand bars seized! | परभणी : चार अवैध वाळूसाठे जप्त !

परभणी : चार अवैध वाळूसाठे जप्त !

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : कॅमेऱ्यांची नजर चुकवित वाळूचा बेसुमार उपस्या’ या मथळ्याखाली २० एप्रिल रोजी ‘लोकमत’ने प्रसिद्ध केलेल्या वृत्ताची दखल घेत महसूल प्रशासनाने २३ एप्रिल रोजी तालुक्यातील गौंडगाव, झोला पिंप्री व मसला येथे अवैध चार वाळू साठे जप्त केले़ या कारवाईमुळे वाळूमाफियांत खळबळ उडाली आहे़
तालुक्यातील गोदावरी नदीपात्रात असलेल्या वाळू धक्क्यातील दुसलगाव व चिंच टाकळी येथील दोन वाळू धक्के वगळले तर इतर वाळू धक्क्यांचे अद्यापही लिलाव झाले नाहीत; परंतु, या धक्क्यातून राजरोजपणे बेसुमार वाळू उपसा होत आहे़ याकडे महसूल प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याने ‘लोकमत’ने २० एप्रिल रोजीच्या अंकात ‘कॅमेऱ्यांची नजर चुकवित अवैध वाळू उपसा’ या मथळ्याखाली वृत्त प्रकाशित केले होते़ त्यानंतर महसूल प्रशासन खडबडून जागे होत २१ एप्रिल रोजी सायंकाळी ४़३० वाजेच्या सुमारास जिल्हाधिकारी पी़ शिव शंकर यांनी वाळू माफियांची नजर चुकवित तालुक्यातील खळी, गौंडगाव, चिंच टाकळी आदी भागात अचानक भेटी दिल्या़
या भेटी दरम्यान गौंडगाव येथील गायरान जमिनीवर असलेल्या अंदाजे १२ ब्रासपेक्षा जास्त वाळुचा अवैध साठा जप्त करून पोलीस पाटलांच्या ताब्यात दिला़ जिल्हाधिकाºयांच्या कारवाईनंतर गंगाखेड येथील तहसीलदार स्वरुप कंकाळ, मंडळ अधिकारी शंकर राठोड, तलाठी चंद्रकांत साळवे, शिवाजी मुरकुटे आदींनी २३ एप्रिल रोजी सकाळी ८ वाजेच्या सुमारास तालुक्यातील झोला, पिंप्री व मसला या गावात भेटी देऊन गोदावरी नदीच्या पात्राची पाहणी केली़
या पाहणी दरम्यान झोला येथील पाण्याच्या टाकळीजवळ गोदाकाठी अंदाजे २५ ब्रासपेक्षा अधिकच्या वाळुचा अवैधसाठा जप्त केला़ त्याचबरोबर मसला येथे मंडळ अधिकारी शंकर राठोड व तलाठी चंद्रकांत साळवे यांनी गोदावरी नदीपात्रा जवळ असलेल्या जवळपास ३० ब्रास अवैध वाळूसाठा जप्त केला़ याच परिसरातून वाळू वाहतूक करणाºया वाहनधारकांनी मंडळ अधिकारी व तलाठी यांना पाहून चार रिकाम्या गाड्या घेऊन धूम ठोकली़ तेव्हा मंडळ अधिकार राठोड व तलाठी साळवे यांनी दुचाकीवरून या वाहनांचा पाठलाग सुरू केला़ मात्र परिसरातील रस्त्यांवर असलेल्या खड्ड्यांच्या दुचाकी घसरून मंडळ अधिकारी व तलाठी खाली पडल्याचा फायदा घेत वाळूमाफिया पळून जाण्यास यशस्वी झाले़ दुचाकी घसरल्याने तलाठी चंद्रकांत साळवे यांच्या पायाला चांगलाच मार लागला आहे़
महसूल प्रशासनाने अवैध वाळू साठे जप्त करण्याची मोहीम हाती घेत गौंडगाव, झोला, पिंप्री व मसला येथील चार अवैध वाळू साठ्यात शंभर ब्रासपेक्षा अधिक वाळू जप्त केल्याने गंगाखेड तालुक्यातील वाळू माफियांत चांगलीच खळबळ उडली आहे़
कारवाई करूनही : वाळू उपसा थांबेना
गंगाखेड तालुक्यातून वाहणाºया गोदावरी नदीपात्रातून केवळ दुसलगाव व चिंच टाकळी येथील वाळू धक्क्यांचा लिलाव आता महसूल प्रशासनाने केला आहे़ परंतु, इतर ठिकाणचा अद्यापही लिलाव झाला नाही़ मात्र या ठिकाणाहून राजरोजपणे अवैध वाळू उपसा मोठ्या प्रमाणात सुरू आहे़ विशेष म्हणजे, जिल्हा महसूल प्रशासन व तालुका महसूल प्रशासन वारंवार अवैध वाळू उपसा करणाºया वाळू माफियांवर कारवाई करते़ विशेष म्हणजे कारवाई केलेल्या बहुतांश वाळू माफियांना लाखोंचा दंडही ठोठावण्यात आला आहे़ परंतु, अवैध वाळू उपसा मात्र काही केल्या थांबण्याचे नाव घेत नाही़ विशेष म्हणजे लोकसभा निवडणुकीच्या कामामध्ये जिल्हा प्रशासन गुंतले असताना याचा फायदा घेत वाळूमाफियांनी मोठ्या प्रमाणात अवैध वाळू उपसा करून साठे करून ठेवले आहेत़

Web Title: Parbhani: Four illegal sand bars seized!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.