परभणी : वीज तारांच्या घर्षणामुळे आग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 7, 2019 12:54 AM2019-05-07T00:54:54+5:302019-05-07T00:54:59+5:30

जिंतूर तालुक्यातील माथला येथे विद्युत तारांचे घर्षण होऊन लागलेल्या आगीत गाव परिसरातील गवत, कडबा जळून खाक झाल्याची घटना ६ मे रोजी दुपारी १ वाजेच्या सुमारास घडली.

Parbhani: Fire due to electricity wires | परभणी : वीज तारांच्या घर्षणामुळे आग

परभणी : वीज तारांच्या घर्षणामुळे आग

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
माथला (परभणी): जिंतूर तालुक्यातील माथला येथे विद्युत तारांचे घर्षण होऊन लागलेल्या आगीत गाव परिसरातील गवत, कडबा जळून खाक झाल्याची घटना ६ मे रोजी दुपारी १ वाजेच्या सुमारास घडली.
जिंतूर तालुक्यातील माथला येथे वीज वितरण कंपनीकडून उभारण्यात आलेल्या विद्युत तारा लोंबकाळतल्या आहेत. याबाबत ग्रामस्थांनी वारंवार महावितरण कंपनीकडे या दुरुस्त कराव्यात, यासाठी मागणी केली; परंतु, याकडे दुर्लक्ष करण्यात आले. ६ मे रोजी दुपारी लोंबकळणाऱ्या विद्युत तारांचे घर्षण होऊन आग लागली. या आगीमध्ये गाव परिसरातील गवत, कडबा व शेती उपयोगी साहित्य जळून खाक झाले. पाहता पाहता ही आग वाढत गेल्याने अग्नीशमन दल व ग्रामस्थांनी तीन तासांच्या प्रयत्नानंतर ही आग आटोक्यात आली.

Web Title: Parbhani: Fire due to electricity wires

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.