परभणी : वृद्धेला मारहाण करणाऱ्या चौघांविरूद्ध गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 1, 2019 12:02 AM2019-05-01T00:02:47+5:302019-05-01T00:03:19+5:30

जागा विकत का देत नाहीस, या कारणावरून एका वृद्ध महिलेला घरात घुसून मारहाण केल्याची घटना २६ एप्रिल रोजी रात्री ९ वाजेच्या सुमारास पूर्णा तालुक्यातील वझूर येथे घडली़ या प्रकरणी गंगाखेड पोलीस ठाण्यात चौघांविरूद्ध गुन्हा नोंद झाला आहे़

Parbhani: An FIR has been lodged against four persons who beat up the elderly | परभणी : वृद्धेला मारहाण करणाऱ्या चौघांविरूद्ध गुन्हा दाखल

परभणी : वृद्धेला मारहाण करणाऱ्या चौघांविरूद्ध गुन्हा दाखल

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
गंगाखेड (परभणी): जागा विकत का देत नाहीस, या कारणावरून एका वृद्ध महिलेला घरात घुसून मारहाण केल्याची घटना २६ एप्रिल रोजी रात्री ९ वाजेच्या सुमारास पूर्णा तालुक्यातील वझूर येथे घडली़ या प्रकरणी गंगाखेड पोलीस ठाण्यात चौघांविरूद्ध गुन्हा नोंद झाला आहे़
वझूर येथील ज्ञानोबा गणेश लांडे, पुरभाजी ज्ञानोबा लांडे, रोहन ज्ञानोबा लांडे आणि ताडोबा दगडोबा लांडे या चौघांनी २६ एप्रिल रोजी रात्री ९ वाजेच्या सुमारास घराजवळील जागेवर उकंडा करू नकोस आणि ही जागा आम्हाला का विक्री करत नाहीस, असे म्हणत एका ६० वर्षीय वृद्ध महिलेच्या घरात घुसून तिला लोखंडी गज आणि काठीने मारहाण केली़ यात ही महिला जखमी झाली आहे़ मारहाणीदरम्यान, आरोपींनी वृद्ध महिलेचा विनयभंग केला़ या मारहाणीत जखमी झालेल्या महिलेवर परभणी येथील रुग्णालयात उपचार सुरू असून, त्याच ठिकाणी पीडित महिलेने दिलेल्या तक्रारीवरून २९ एप्रिल रोजी रात्री उशिरा चार आरोपींविरूद्ध गुन्हा दाखल झाला आहे़
पत्नीच्या मृत्यू प्रकरणी पतीविरूद्ध गुन्हा
४पतीच्या त्रासाला कंटाळून पेटवून घेतलेल्या विवाहित महिलेच्या मृत्यूनंतर पतीविरूद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्या प्रकरणी गुन्हा नोंद झाला आहे़ अकोली येथील पुष्पा सतीश मुंडे यांनी २२ एप्रिल रोजी स्वत:ला पेटवून घेतले होते़
४उपचारा दरम्यान २८ एप्रिल रोजी त्यांचा मृत्यू झाला़ रुस्तूम तात्याराव टोम्पे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गंगाखेड पोलीस ठाण्यात पती सतीश लक्ष्मण मुंडे याच्याविरूद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्या प्रकरणी गुन्हा नोंद झाला आहे़

Web Title: Parbhani: An FIR has been lodged against four persons who beat up the elderly

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.