परभणी : शेतकऱ्यांचे १७ लाख दोन वर्षानंतरही पडून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 19, 2018 12:23 AM2018-10-19T00:23:53+5:302018-10-19T00:24:53+5:30

दोन वर्षापूर्वी अतिवृष्टी आणि आवकाळी पावसाने नुकसान झालेल्या शेतकºयांसाठी शासनाने ५० लाख ३५ हजार रुपयांची मदत जिल्ह्यातील शेतकºयांना देऊ केली होती़ मात्र दोन वर्षानंतरही या मदतीतील १७ लाख रुपये पडून असल्याने शेतकरी मदत जाहीर होवूनही आर्थिक लाभापासून वंचित राहिले आहेत़

Parbhani: Even after 17 lakh two years of farming | परभणी : शेतकऱ्यांचे १७ लाख दोन वर्षानंतरही पडून

परभणी : शेतकऱ्यांचे १७ लाख दोन वर्षानंतरही पडून

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : दोन वर्षापूर्वी अतिवृष्टी आणि आवकाळी पावसाने नुकसान झालेल्या शेतकºयांसाठी शासनाने ५० लाख ३५ हजार रुपयांची मदत जिल्ह्यातील शेतकºयांना देऊ केली होती़ मात्र दोन वर्षानंतरही या मदतीतील १७ लाख रुपये पडून असल्याने शेतकरी मदत जाहीर होवूनही आर्थिक लाभापासून वंचित राहिले आहेत़
२०१६ मध्ये एप्रिल आणि नोव्हेंबर महिन्यात परभणी जिल्ह्यात अतिवृष्टी व अवकाळी पाऊस झाला होता़ या पावसाने पिकांचे नुकसान झाले़ राज्य शासनाने अतिवृष्टीने नुकसान झालेल्या पिकांसाठी मदत जाहीर केली़ परभणी जिल्ह्याला ही मदत प्राप्तही झाली़ जिल्हा प्रशासनाने शेतकºयांच्या नुकसानीपोटी मिळालेली ही रक्कम तहसील प्रशासनाकडे प्रदान केली असून, तहसील मार्फत त्या त्या शेतकºयांना मदतीचे वितरण करण्यात आले़ २०१६ मध्ये झालेल्या या नुकसानीपोटी बाधीत शेतकºयांना आर्थिक मदत देण्यासाठी जिल्हा प्रशासनाला ५० लाख ३५ हजार रुपयांचा निधी प्राप्त झाला होता़ १९ आॅक्टोबर २०१८ अखेर प्राप्त झालेल्या या निधीतून केवळ ३३ लाख १३ हजार रुपये शेतकºयांच्या खात्यावर जमा करण्यात आले असून, उर्वरित १७ लाख २२ हजार रुपयांचे वाटप रखडले आहे़ निधी उपलब्ध असतानाही प्रशासनाने ती रक्कम वितरित केली नाही़ अतिवृष्टीने पिके बाधित झालेल्या केवळ २ हजार ५३४ शेतकºयांनाच मदतीचा लाभ झाला आहे़ प्राप्त अनुदानापैकी ६६ टक्के अनुदानाचे वितरण झाले आहे़
राज्य शासनाने नुकसानग्रस्त शेतकºयांना अनुदान देऊ केले़ मात्र प्रशासनातील उदासिनतेमुळे या अनुदानाचे वितरण रखडले आहे़ दोन वर्षांपासून शेतकºयांना अनुदान मिळत नसल्याने शेतकरी तहसील कार्यालयात चकरा मारत आहेत़ त्यानंतरच्या दोन्ही वर्षांच्या काळात शेती उत्पादनात घट झाली आहे़ शेतकºयांना फारसे उत्पन्न मिळाले नसल्याने आर्थिक संकटाला सामोरे जावे लागले़ यावर्षी तर पावसाचे प्रमाण कमी राहिल्याने शेतकरी अडचणीत सापडला आहे़ तेव्हा अनुदान मंजूर झाले असेल तर ते त्वरित वितरित करावे, अशी मागणी होत आहे़
परभणी तालुक्यात : वितरणच नाही
४जिल्हा प्रशासनाला प्राप्त झालेले अनुदान तहसील प्रशासनाने लाभार्थी शेतकºयांना वितरित केले आहे़ परभणी तालुक्याने मात्र अद्यापपर्यंत या अनुदानाचे वितरण केले नसल्याची बाब समोर आली आहे़ सोनपेठ तालुक्याने ९७ टक्के, पालम तालुक्याने ३०़१० टक्के, जिंतूर तालुक्याने ९५़१३ टक्के तर पूर्णा तालुक्याने १०० टक्के अनुदानाचे वितरण केले आहे़ सोनपेठ तालुक्यातील ५० शेतकºयांना ७२ हजार रुपये, पालम तालुक्यातील २९७ शेतकºयांना ३ लाख १३ हजार रुपये, जिंतूर तालुक्यातील १ हजार १९९ शेतकºयांना १८ लाख ७६ हजार रुपये आणि पूर्णा तालुक्यातील ९८८ शेतकºयांना १० लाख ५२ हजार रुपये असे २ हजार ५३४ शेतकºयांना ३३ लाख १३ हजार रुपयांचे वितरण झाले आहे़
तालुका निहाय प्राप्त झालेले अनुदान
अतिवृष्टीतील बाधित शेतकºयांना मदत देण्यासाठी परभणी तालुक्याला ८ लाख ९७ हजार रुपये, सोनपेठ तालुक्याला ७४ हजार रुपये, पालम तालुक्याला १० लाख ४० हजार रुपये, जिंतूर तालुक्याला १९ लाख ७२ हजार रुपये आणि पूर्णा तालुक्याला १० लाख ५२ हजार रुपयांचे अनुदान प्राप्त झाले होते़
दोन वर्षांपासून
वितरण ठप्प
४जिल्ह्यातील ५ तालुक्यांमध्ये अतिवृष्टी झाल्याने नुकसानग्रस्त शेतकºयांसाठी अनुदान प्राप्त झाले़ तालुकास्तरावरून या अनुदानाचे वितरणही शेतकºयांना करण्यात आले आहे़ काही शेतकरी अनुदानाच्या लाभापासून अजूनही वंचित आहेत़
४दोन वर्षांपासून अनुदान वितरण झाले नसल्याने या मागची कारणेही शोधली नाहीत़ विशेष म्हणजे, तहसील प्रशासनाने अनुदान शिल्लक असले तर जिल्हाधिकारी कार्यालयाकडे समर्पितही केले नाही़ त्यामुळे या अनुदानाचे वितरणाचे काय? असा प्रश्न निर्माण होत आहे़

Web Title: Parbhani: Even after 17 lakh two years of farming

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.