परभणी : मानवतमध्ये पाण्यावरुन खडाजंगी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 21, 2018 12:20 AM2018-10-21T00:20:16+5:302018-10-21T00:21:39+5:30

शहराच्या पाणीप्रश्नावरुन नगरसेवक आणि मुख्याधिकाऱ्यांमध्ये खडाजंगी झाल्याचा प्रकार २० आॅक्टोबर रोजी सकाळी मानवत शहरात घडला.

Parbhani: Due to water flows in Manavata | परभणी : मानवतमध्ये पाण्यावरुन खडाजंगी

परभणी : मानवतमध्ये पाण्यावरुन खडाजंगी

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
मानवत (परभणी): शहराच्या पाणीप्रश्नावरुन नगरसेवक आणि मुख्याधिकाऱ्यांमध्ये खडाजंगी झाल्याचा प्रकार २० आॅक्टोबर रोजी सकाळी मानवत शहरात घडला.
मानवत शहराला झरी येथील तलावातून पाणी पुरवठा केला जातो. झरी तलावात मूबलक प्रमाणात पाणी उपलब्ध असतानाही शहरवासियांना मात्र आठ ते दहा दिवसांतून एक वेळा पाणीपुरवठा होत आहे. हा पाणीपुरवठा विस्कळीत का झाला, याची विचारणा करण्यासाठी कॉंग्रेसचे नगरसेवक शनिवारी पालिकेमध्ये गेले. यावेळी मुख्याधिकाºयांना जाब विचारत असतानाच मुख्याधिकारी आणि नगरसेवकांमध्ये खडाजंगी झाली. मुख्याधिकारी उमेश ढाकणे यांनी नगरसेवकांना आरेरावीची भाषा वापरली, असा आरोप कॉंग्रेसच्या नगरसेवकांनी केला आहे. या प्रकरणी नगरसेवकांनी थेट जिल्हाधिकारी पी. शिव शंकर यांच्याकडेच मुख्याधिकारी ढाकणे यांची तक्रार केली असून त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
झरी तलावामध्ये मूबलक प्रमाणात पाणी असताना नागरिकांना पाणीटंचाईला तोंड द्यावे लागत आहे. ही बाब मुख्याधिकारी उमेश ढाकणे यांच्या निदर्शनास आणून दिली असता त्यांनी आरेरावीची भाषा केली, असा आरोप नगरसेवकांनी केला आहे. या निवेदनावर नगरसेवक शोभा चव्हाण, सरुबाई भदर्गे, संगिता देशमुख, अ.रहीम अ.करीम, स.जमील, विनोद रहाटे, गोपाल गौड, शैलेजा बारहाते, रबियाबी अन्सारी आदींच्या स्वाक्षºया आहेत.
कृत्रिम पाणीटंचाईचे संकट
४मानवत शहराला झरी येथील तलावातून पाणीपुरवठा केला जातो. सध्या जायकवाडी प्रकल्पाचे पाणी कालव्याला सोडले असल्याने या पाण्याने झरी तलावात मूबलक पाणीसाठा उपलब्ध आहे. साधारणत: मे महिन्यापर्यंत पुरेल एवढे पाणी तलावात असताना मानवतकरांना मात्र टंचाईला सामोरे जावे लागत आहे. सध्या शहरात आठ ते दहा दिवसांना एकवेळ पाणी येते.
४झरी तलाव परिसरात एक्सप्रेस फिडर नसल्याने शहरवासियांना सुरळीत पाणी पुरवठा होत नाही. झरी परिसरात एक्सप्रेस फिडर उभारावा, अशी अनेक दिवसांची मागणी आहे;परंतु, त्याकडेही नगरपालिका प्रशासन गांभीर्याने पाहत नाही. परिणामी शहराला पाणीपुरवठा करताना अडथळे निर्माण होतात आणि दोन आवर्तनातील कालावधी वाढत चालला आहे.
४शहराचा विस्तार वाढला असून नवीन जलवाहिनी टाकण्याचे काम नगरपालिकेने हाती घेतले आहे. मात्र अनेक भागात हे काम ठप्प आहे. त्यामुळे पाणीपुरवठ्यात विस्कळीतपणा निर्माण होत आहे. झरी बरोबरच जुन्या इरळद येथून पाणीपुरवठा करण्याची योजना कार्यान्वित केली तर शहराचा प्रश्न मिटू शकतो. मात्र यावरही हालचाली होत नाहीत.

Web Title: Parbhani: Due to water flows in Manavata

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.