परभणी : ‘जलयुक्त’च्या कामांचा बोजवारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 22, 2018 12:39 AM2018-10-22T00:39:48+5:302018-10-22T00:40:31+5:30

राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा ड्रिम प्रोजेक्ट म्हणून गणल्या गेलेल्या जलयुक्त शिवार योजनेचा पालम तालुक्यात चांगलाच बोजवारा उडाला आहे़ सहा महिने संपले तरीही कामांची देयके निघत नसल्याने गुत्तेदार व कृषी विभागातील अधिकारी यांच्यातील वाद चव्हाट्यावर आला आहे़

Parbhani: The deleter of water works | परभणी : ‘जलयुक्त’च्या कामांचा बोजवारा

परभणी : ‘जलयुक्त’च्या कामांचा बोजवारा

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
पालम ( परभणी) : राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा ड्रिम प्रोजेक्ट म्हणून गणल्या गेलेल्या जलयुक्त शिवार योजनेचा पालम तालुक्यात चांगलाच बोजवारा उडाला आहे़ सहा महिने संपले तरीही कामांची देयके निघत नसल्याने गुत्तेदार व कृषी विभागातील अधिकारी यांच्यातील वाद चव्हाट्यावर आला आहे़
पालम तालुक्यात यावर्षी जलयुक्त शिवार अभियानातून एप्रिल ते मे दरम्यान ३२ ढाळीच्या बांधांचे काम मंजूर होऊन कामे पूर्ण झाली आहेत़ यातील बहुतांश कामे निकृष्ट दर्जाची झाल्याने वेळेत मोजमाप पुस्तिका तयार करण्यात आल्या नाहीत़ या बांधावर दोन-दोन फुट गवत उगवल्यानंतर मोजमाप पुस्तिका तयार करण्याचे काम वेगात सुरू झाले़ राजकीय पक्षाचे कार्यकर्ते गुत्तेदार असल्याने बोगस कामे लपविण्यासाठी धावपळ सुरू झाली आहे़ यातून अधिकारी व कर्मचारी यांच्यावर देयके काढण्यासाठी दबाव टाकला जात आहे़ जिल्हाधिकारी पी़ शिव शंकर यांची धास्ती घेतलेले कर्मचारी कामे बोगस झाल्याने मोजमाप पुस्तिकांवर सह्या करण्यास टाळाटाळ करीत आहेत़ यातून गुत्तेदार व कर्मचारी यांच्यात वादाचे ठिणगी पडत आहे़ रामापूर, रामापूर तांडा, फत्तूनाईक तांडा, बनवस, बोरगाव बु़, बोरगाव खु़, आरखेड, फळा, सिरसम, उमरथडी, रोकडेवाडी, नाव्हलगाव आदी गावांत कामे निकृष्ट दर्जाची झाल्याने शासनाचा उद्देश असफल ठरला आहे़ अधिकारी-गुत्तेदारांच्या वादात जलयुक्त शिवार अभियानाची मात्र वाताहात होताना दिसत आहे़
कर्मचाऱ्यांना : झाला दंड
४कामाच्या मोजणीत काही गावांत मोठी तफावत निघाली असून, कृषीच्या अधिकारी व कर्मचारी यांना ३ लाख २० हजारांचा दंड आकारण्यात आला आहे़ गुत्तेदारांच्या राजकीय दबावाखाली मोजमाप पुस्तिका लिहाव्या लागतात़ त्याचबरोबर वरिष्ठ अधिकाºयांच्या कारवाईला सामोरे जावे लागत आहे़ त्यामुळे कर्मचारी दुहेरी संकटात अडकल्याचे सध्या दिसून येत आहे़
कंत्राटी अभियंत्यांचे फावले
जलयुक्तच्या कामांची तक्रार झाल्याने कामाची फेर तपासणी केली जात आहे़ यासाठी कंत्राटी अभियंत्यांकडे जबाबदारी देण्यात आली होती़ कामाचे मोजमाप करताना या अभियंत्यांनी गुत्तेदारांना झुकते माप दिले आहे़ संधीचे सोने करीत हात मारून घेतल्याची चर्चा ऐकावयास मिळत आहे़
गाळ उपस्याचे काम कागदावरच
पालम तालुक्यात लांडकवाडी शिवारात जलयुक्त शिवारमधून तलावातील गाळ उपसण्याचे १० लाखांचे काम मंजूर होते़ या ठिकाणी थातूर-मातूर काम करून देयके उचलून गुत्तेदाराने उखळ पांढरे केल्याचा आरोप होत आहे. त्यामुळे गाळ उपसण्याचे काम केवळ कागदावरच करण्यात आले की काय? असा प्रश्न ग्रामस्थांतून उपस्थित केला जात आहे़

जलयुक्त शिवार अभियानाची कामे ही उन्हाळ्यात झालेली आहेत़ मी याची माहिती घेत आहे़ देयके अदा करण्यासाठी काळजी घेतली जाईल़
-सुरेश मस्के, प्रभारी तालुका कृषी अधिकारी, पालम

Web Title: Parbhani: The deleter of water works

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.