परभणी : अति दारुप्राशनाने झाला वृद्धाचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 26, 2019 12:07 AM2019-05-26T00:07:07+5:302019-05-26T00:08:13+5:30

तालुक्यातील डोंगरगाव शिवारात अति दारु प्राशनाने एका वृद्धाचा मृत्यू झाल्याची घटना शनिवारी सकाळी ९ वाजेच्या सुमारास उघडकीस आली.

Parbhani: The death of old age due to excessive alcoholism | परभणी : अति दारुप्राशनाने झाला वृद्धाचा मृत्यू

परभणी : अति दारुप्राशनाने झाला वृद्धाचा मृत्यू

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
गंगाखेड (परभणी): तालुक्यातील डोंगरगाव शिवारात अति दारु प्राशनाने एका वृद्धाचा मृत्यू झाल्याची घटना शनिवारी सकाळी ९ वाजेच्या सुमारास उघडकीस आली.
धनगरमोहा येथील भानूदास विठ्ठलराव इमडे (६०) यांना अति दारु सेवन करण्याची सवय होती. २१ मे रोजी मंगळवारी ते धनगरमोहा येथून जवळच असलेल्या डोंगरगाव येथे धार्मिक कार्यक्रमासाठी गेले होते. मात्र ते घरी परत आले नसल्याने नातेवाईकांनी त्यांचा शोध सुरु केला. यावेळी त्यांचा मावसभाऊ गंगाधर व्होरगीळ यांनी गावातील श्रीमन व्होरगीळ, अनिल शिंगाडे, अभंग चाटे यांना सोबत घेऊन डोंगरगाव शिवारात पाहणी केली असता शनिवारी सकाळी ९ वाजेच्या सुमारास माळरानावर कालव्याजवळ भानूदास इमडे यांचा कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह आढळून आला. या प्रकरणी गंगाधर व्होरगीळ यांच्या माहितीवरुन गंगाखेड पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
महिलेवर बलात्कार
सोनपेठ- तालुक्यातील दहिखेड येथे लग्नाचे आमिष दाखवून एका महिलेवर बलात्कार केल्या प्रकरणी सोनपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दहीखेड येथील अक्षय जयराम साळवे या आरोपीने वर्षभरापूर्वी गावातील एका महिलेला लग्नाचे आमिष दाखविले व सदरील महिलेवर बलात्कार केला. त्यानंतर वर्षभरापासून पीडितेस लग्नाचा नकार दिला व जिवे मारण्याची धमकी दिली. त्यावरुन पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Web Title: Parbhani: The death of old age due to excessive alcoholism

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.