परभणी:पोलिसांच्या कारवाईत दारूसह शस्त्रही जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 18, 2019 12:24 AM2019-04-18T00:24:53+5:302019-04-18T00:26:10+5:30

लोकसभा निवडणुकीचे मतदान आणि महावीर जयंतीच्या पार्श्वभूमीवर ड्राय डे असतानाही दारू विक्री करीत असताना पोलिसांनी सात जणांविरूद्ध कारवाई केली आहे़ विशेष म्हणजे या कारवाईत एक धारदार शस्त्रही जप्त करण्यात आले आहे़

Parbhani: Dargah arms were seized in the police action | परभणी:पोलिसांच्या कारवाईत दारूसह शस्त्रही जप्त

परभणी:पोलिसांच्या कारवाईत दारूसह शस्त्रही जप्त

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : लोकसभा निवडणुकीचे मतदान आणि महावीर जयंतीच्या पार्श्वभूमीवर ड्राय डे असतानाही दारू विक्री करीत असताना पोलिसांनी सात जणांविरूद्ध कारवाई केली आहे़ विशेष म्हणजे या कारवाईत एक धारदार शस्त्रही जप्त करण्यात आले आहे़
स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाने १७ एप्रिल रोजी परभणी शहरात विशेष मोहीम राबवून अवैध दारू विक्री करणाऱ्यांविरूद्ध कारवाई केली़ शहरातील नानलपेठ, नवा मोंढा, कोतवाली आणि ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत दिवसभरात छापे टाकण्यात आले़ डॉक्टर लाईन भागातील गुरुगोविंदसिंग नगर, त्रिमूर्तीनगर, साखला प्लॉट, गव्हा आणि समसापूर या ठिकाणी चोरटी दारू विक्री होत असल्याचे निदर्शनास आले़ या कारवाईत देशी दारूच्या ३२९ बाटल्या, मॅकडॉल नंबर वन १०, आॅफीसर्स चॉईस एक बाटली आणि किंग फिशर बिअरच्या ६ बाटल्या पोलिसांनी जप्त केल्या आहेत़ एकूण २० हजार १०८ रुपयांची दारू जप्त करण्यात आली़ तसेच राजूसिंग लच्छूसिंग टाक याच्या ताब्यातून कोयता जप्त करण्यात आला़ या कारवायामध्ये बलजीतसिंग लच्छूसिंग टाकू, राजूसिंग लच्छूसिंग टाक, विनोद संतोष चोपडे, मंचक बापूराव मेटे, नारायण दिगंबर काळे यांच्यासह दोन महिला आरोपींविरूद्ध शहरातील विविध पोलीस ठाण्यांमध्ये ५ गुन्हे नोंदविण्याची प्रक्रिया सुरू आहे़ ही कारवाई स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेच्या पथकातील कर्मचाऱ्यांनी केली़
महिलेचा विनयभंग
पूर्णा- महिलेचा विनयभंग केल्या प्रकरणी पूर्णा पोलीस ठाण्यात दोघांविरूद्ध गुन्हा दाखल झाला आहे़ पीडित महिला मंगळवारी बाजारातून घरी जात असताना रेल्वेस्थानक परिसरात आरोपी धुम्मा व स्वप्नील साबळे यांनी रस्त्यावर विवाहितेचा विनयभंग केला़ तसेच तिला जिवे मारण्याची धमकी दिली़ पीडित महिलेच्या तक्रारीवरून पूर्णा पोलीस ठाण्यात धुम्मा व स्वप्नील साबळे या दोघांविरूद्ध गुन्हा दाखल झाला आहे़ जमादार दत्ता काकडे तपास करीत आहेत़
दारू पकडली
मानवत- शहरातील भारतीय दूर संचार निगम कार्यालयाच्या परिसरात पोलिसांनी १७ एप्रिल रोजी ७०० रुपयांची दारू पकडली आहे़ या कार्यालयाच्या जवळच असलेल्या लिंबाच्या झाडाखाली बसून एक जण दारू विक्री करीत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली़ उपनिरीक्षक शिवशंकर मन्नाळे यांनी छापा टाकून ही दारू जप्त केली़ या प्रकरणी बल्लूसिंग दरबारसिंग बावरी याच्याविरूद्ध गुन्हा दाखल झाला आहे़

Web Title: Parbhani: Dargah arms were seized in the police action

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.