परभणी :क्रिकेट खेळण्याच्या कारणावरून वाद : २० जणांविरुद्ध गुन्हे दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 13, 2019 11:29 PM2019-04-13T23:29:37+5:302019-04-13T23:30:07+5:30

क्रिकेट खेळण्याच्या कारणावरून लहान मुलांमध्ये झालेल्या वादाचे पर्यावसन दोन गटातील मारहाणीत झाल्याने अ‍ॅट्रॉसिटी अ‍ॅक्टसह विविध कलमान्वये दोन्ही गटातील २० जणांविरुद्ध शनिवारी पहाटे गंगाखेड पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

Parbhani: Controversy over the cause of playing cricket: 20 people have filed criminal cases against them | परभणी :क्रिकेट खेळण्याच्या कारणावरून वाद : २० जणांविरुद्ध गुन्हे दाखल

परभणी :क्रिकेट खेळण्याच्या कारणावरून वाद : २० जणांविरुद्ध गुन्हे दाखल

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
गंगाखेड (परभणी) : क्रिकेट खेळण्याच्या कारणावरून लहान मुलांमध्ये झालेल्या वादाचे पर्यावसन दोन गटातील मारहाणीत झाल्याने अ‍ॅट्रॉसिटी अ‍ॅक्टसह विविध कलमान्वये दोन्ही गटातील २० जणांविरुद्ध शनिवारी पहाटे गंगाखेड पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
शहरातील बरकत नगर व सर्जेराव नगर येथील लहान मुले १२ एप्रिल रोजी दुपारी अडीच वाजेच्या सुमारास क्रिकेट खेळण्यासाठी मोसीकॉल परिसरात गेले होती. तेथे शिवम वाव्हळे, अदित्य गायकवाड या दोन मुलांमध्ये क्रिकेट खेळण्यावरून दुपारी ३.३० वाजेच्या सुमारास वाद झाला. या वादाची माहिती समजताच शिवम वाव्हळेचे आई-वडील तेथे पोहचले. तेव्हा तेथील इतर मुलांनी पळ काढला. त्याच वेळी अदित्य गायकवाड याचेही आई-वडील तेथे पोहचले.
दोघांचा वाद सुुरु झाला. तेव्हा उपस्थित मध्यस्थांनी हा वाद मिटविला. त्यानंतर वाव्हळे कुटुंब घरी गेल्यानंंतर दुपारी ४ वाजता रामा गोविंद गायकवाड, सीताबाई रामा गायकवाड, अदित्य रामा गायकवाड, लक्ष्मण गोविंद गायकवाड यांच्यासह इतर पाच अनोळखी असे एकूण १२ जणांनी वाव्हळे यांच्या घरात घुसून जातीवाचक शिवीगाळ करीत मारहाण केली. त्याच बरोबर अरूणा पिराजी वाव्हळे, पिराजी वाव्हळे, शिवम वाव्हळे, शीतल वाव्हळे यांना मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिल्याची फिर्याद अरूणा पिराजी वाव्हळे यांनी १३ एप्रिल रोजीच्या पहाटे गंगाखेड पोलीस ठाण्यात दिल्यावरून १२ जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. या घटनेचा अधिक तपास उपविभागीय पोलीस अधिकारी बलराज लांजिले हे करीत आहेत.
दरम्यान, याच प्रकरणी रामा गोविंद गायकवाड यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पिराजी वाव्हळे, अरूणा वाव्हळे, अशोक गायकवाड, शेषराव गायकवाड, अरूणा यांचा भाऊ, पिराजी वाव्हळे यांचा भाऊ आदींसह आठ जणांविरुद्ध मारहाण करून जखमी केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास राजेश राठोड हे करीत आहेत.

Web Title: Parbhani: Controversy over the cause of playing cricket: 20 people have filed criminal cases against them

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.