परभणी : जात पडताळणीच्या कंत्राटी कर्मचाऱ्यांची सेवा समाप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 11, 2018 01:06 AM2018-12-11T01:06:48+5:302018-12-11T01:07:09+5:30

येथील जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती कार्यालयातील बाह्यस्त्रोतामार्फत नियुक्त करण्यात आलेल्या ८ कर्मचाºयांची सेवा समाप्त करण्याचा निर्णय राज्याच्या जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीचे मुख्य समन्वयक कैलास कणसे यांनी घेतला आहे.

Parbhani: Contract verification of contract workers will be terminated | परभणी : जात पडताळणीच्या कंत्राटी कर्मचाऱ्यांची सेवा समाप्त

परभणी : जात पडताळणीच्या कंत्राटी कर्मचाऱ्यांची सेवा समाप्त

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : येथील जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती कार्यालयातील बाह्यस्त्रोतामार्फत नियुक्त करण्यात आलेल्या ८ कर्मचाºयांची सेवा समाप्त करण्याचा निर्णय राज्याच्या जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीचे मुख्य समन्वयक कैलास कणसे यांनी घेतला आहे.
परभणी येथील जात प्रमाणपत्र पडताळणी कार्यालयाचा कारभार बनावट प्रमाणपत्र प्रकरणात चव्हाट्यावर आला आहे. या कार्यालयातून बनावट कागदपत्रांच्या आधारे जात पडताळणी प्रमाणपत्र दिल्याचा आणि बनावट कागदपत्रांच्या आधारेच काहींचे जात पडताळणी प्रमाणपत्राचे अर्ज रद्द केल्याचा प्रकार गेल्या महिन्यात उघडकीस आला होता. ६ नोव्हेंबर रोजी परभणीतील नवा मोंढा पोलीस ठाण्यात या प्रकरणी प्रारंभी ५ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर आणखी दोन जणांना अटक करण्यात आली होती. अटकेतील दोन पैकी एक आरोपी सध्या जामिनावर सुटला आहे. या प्रकरणाचा तपास सहाय्यक पोलीस अधीक्षक संदीपसिंह गील हे करीत आहेत. जवळपास महिनाभरापासून या प्रकरणाचा तपास सुरु असताना अनेक महत्वपूर्ण कागदपत्रे पोलिसांनी जप्त केली. जवळपास ४० जणांचे जबाब नोंदविण्यात आले. त्यामध्ये महसूल आणि अन्य विभागातील वर्ग १ दर्जाच्या अधिकाºयांचाही समावेश आहे. असे असले तरी या प्रकरणात पोलिसांनी दोन व्यतिरिक्त एकाही आरोपीला अटक केलेली नाही. शिवाय आरोपीची संख्याही वाढलेली नाही. या पार्श्वभूमीवर राज्याच्या जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीचे मुख्य समन्वयक तथा डॉ.बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्थेचे पुणे येथील महासंचालक कैलास कणसे यांनी नुकताच एक आदेश काढला आहे. त्यामध्ये जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती कार्यालयातील बाह्यस्त्रोतामार्फत कार्यरत असलेल्या सर्व कर्मचाºयांच्या सेवा समाप्त करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार बाह्यस्त्रोत कंपनी मे.ब्रिक्स इंडिया प्रा.लि. यांच्या मार्फत या कार्यालयात कार्यरत असलेले व्यवस्थापक श्रीकृष्ण नारायण रिक्षे, अभिलेखापाल ए.एम.वाघमारे, संशोधन सहायक प्रल्हाद खंडू कांबळे, प्रकल्प सहाय्यक आर.बी.उगले, एन.एस.सराफ, श्रीमती आर.ए.दांडगे, कार्यालयीन सहाय्यक एस.एस.सावंत, रुपाली वाघमारे या सर्व ८ कर्मचाºयांच्या सेवा १९ नोव्हेंबर २०१८ पासून पूर्णपणे समाप्त करण्यात याव्यात. त्याऐवजी नवीन मनुष्यबळ उपलब्ध करुन देण्यात येईल, असेही या संदर्भातील आदेशात कणसे यांनी म्हटले आहे. त्यामुळे या कार्यालयातील कंत्राटी कर्मचाºयांचे अस्तित्व संपुष्टात आले आहे. त्यामुळे आता या कार्यालयात नव्याने कंत्राटी कर्मचाºयांची नियुक्ती करावी लागणार आहे.
आदेशानंतरही कर्मचारी कार्यरतच
महासंचालक कैलास कणसे यांनी परभणीतील जात प्रमाणपत्र पडताळणी कार्यालयातील ८ कंत्राटी कर्मचाºयांची सेवा समाप्त करण्यासंदर्भातील आदेश १९ नोव्हेंबर रोजी काढला आहे. विशेष म्हणजे याच दिवशी हे पत्र परभणी कार्यालयाला प्राप्त झाल्याची नोंद आहे. याच दिवसापासून या कर्मचाºयांची सेवा समाप्त करण्याचे आदेश दिले असतानाही अनेक कर्मचारी १० डिसेंबरपर्यंत कार्यालयात कार्यरत होते. त्यामुळे महासंचालक कणसे यांचा आदेशही परभणीच्या कार्यालय प्रमुखांनी मानला नाही की काय? अशी चर्चा होताना दिसून येत आहे.
कार्यालयातील कामकाज ठप्प
जात प्रमाणपत्र पडताळणी कार्यालयासंदर्भातील प्रकरण पोलिसात दाखल झाल्यापासून या कार्यालयातील कामकाज गेल्या महिनाभरात चांगलेच मंदावले आहे. आता तर या कार्यालयात नियमितपणे विविध प्रकरणांमध्ये सुनावणी होत नाही. त्यामुळे जात प्रमाणपत्र पडताळणीसाठी येणारे विद्यार्थी, शासकीय नोकरदार व राजकीय पदाधिकारी यांना हाताश होऊन परतावे लागत आहे. ही बाब वरिष्ठपातळीवर माहिती आहे की नाही, याचीही चर्चा आता होताना दिसून येत आहे.

Web Title: Parbhani: Contract verification of contract workers will be terminated

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.