परभणी: जिंतूर रस्ता पूर्णत्वास एप्रिल २०२० उजाडणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 27, 2019 12:37 AM2019-06-27T00:37:40+5:302019-06-27T00:38:10+5:30

परभणी-जिंतूर रस्त्याच्या कामात काही कारणांमुळे दिरंगाई झाल्याची कबुली देत हे काम एप्रिल २०२० पर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन करण्यात आले असल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांनी विधान परिषदेत बोलताना दिली़

Parbhani: The completion of the Jyantur road will be inaugurated by April 2020 | परभणी: जिंतूर रस्ता पूर्णत्वास एप्रिल २०२० उजाडणार

परभणी: जिंतूर रस्ता पूर्णत्वास एप्रिल २०२० उजाडणार

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : परभणी-जिंतूर रस्त्याच्या कामात काही कारणांमुळे दिरंगाई झाल्याची कबुली देत हे काम एप्रिल २०२० पर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन करण्यात आले असल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांनी विधान परिषदेत बोलताना दिली़
परभणी-जिंतूर रस्ता जवळपास वर्षभरापासून खोदून ठेवण्यात आला आहे़ त्यामुळे या रस्त्यावरून ये-जा करताना वाहनधारकांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे़ या संदर्भात जिंतूर येथील नागरिकांनी अनेक वेळा आंदोलने केली़ त्यानंतर या रस्त्याचे काम सुरू करण्यात येईल, असे आश्वासन संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिले होते़ या पार्श्वभूमीवर विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, आ़ बाबाजानी दुर्राणी, आ़ सतीश चव्हाण, आ़ विक्रम काळे यांनी विधान परिषदेत या संदर्भात प्रश्न उपस्थित केला होता़ त्यामध्ये परभणी जिल्ह्यातील वाटूरफाटा ते जिंतूर, जिंतूर ते नागेश्वरवाडी, जिंतूर ते परभणी, गंगाखेड ते परभणी, गंगाखेड ते सोनपेठ, सेलू-पाथरी-सोनपेठ व इतर महत्त्वाचे राज्य व राष्ट्रीय महामार्ग यांची मंजुरी होवूनही सदरील कामे पूर्ण न झाल्याने तसेच केवळ कामे प्रगतीपथावर आहेत, असे शासनाकडून धोरण राबविण्यात येत असल्याने जिल्ह्यात दळणवळणाच्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे़, हे खरे आहे का? असल्यास जिंतूर-परभणी या मार्गावरील कौसडी ते बोरी या रस्त्याचे निकृष्ट काम झाल्यामुळे रस्त्याची दुरवस्था झाल्याचे मार्च २०१९ मध्ये निदर्शनास आले आहे का? असल्यास शासनाने या प्रकरणी चौकशी केली आहे का? त्या अनुषंगाने काय कारवाई करण्यात आली? सद्यस्थितीत कामाची स्थिती काय आहे? ही कामे कधी पूर्ण होणार? असे प्रश्न उपस्थित करण्यात आले होते़ त्यावर लेखी उत्तर देताना सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगितले आहे की, जिंतूर ते परभणी नवीन राज्य मार्ग ७५२ के़ या रस्त्याच्या रुंदीकरण व मजबुतीकरणाचे काम प्रगतीपथावर आहे़ या रस्त्याचे काम करीत असताना तेथील स्थानिक नागरिकांनी विरोध करून बºयाचवेळा काम बंद पाडले होते़ तसेच सदरील रस्त्याच्या कंत्राटदाराच्या अडचणींमुळे हे काम चार महिने बंद होते़ त्यानंतर २५ मे २०१९ पासून या रस्त्याचे काम सुरू करण्यात आले असून, शीघ्रगतीने पूर्ण करण्याचे नियोजन करण्यात आले आहे़ उर्वरित रस्ते सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारीतील असून, विभागाच्या विविध योजनांमधून वाहतुकीस सुस्थितीत ठेवल्याबाबत कार्यवाही करण्यात येत आहे़ जिंतूर-परभणी महामार्गाचे बांधकाम प्रगतीपथावर असल्याने चौकशीचा प्रश्नच येत नाही़ सदरील कामास विलंब झाल्याबद्दल कंत्राटदारास तांत्रिक सल्लागारांनी नोटिसा बजावल्या आहेत़ वेळोवेळी या बांधकामावर देखरेख करणारे तांत्रिक सल्लागार यांनी नोटिसा बजावलेल्या आहेत़ सदरचे काम एप्रिल २०२० पर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन आहे़ स्थानिक नागरिक, विविध संघटना यांनी केलेल्या तीव्र विरोधामुळे तसेच रस्त्याच्या दुतर्फा असलेली झाडे तोडण्यासाठी परवानगी मिळण्यास व रस्त्याच्या दुतर्फा असलेल्या विद्युत वाहिन्या व पाणीपुरवठा वाहिन्या आदींचे स्थलांतर करण्यास वेळ लागल्यामुळे जिंतूर-परभणी महामार्गाच्या कामास विलंब झाला आहे, असेही या उत्तरात चंद्रकांत पाटील यांनी म्हटले आहे़
बोरी-कौसडी रस्ता जड वाहनांमुळे खचला
४बोरी-कौसडी रस्त्याचे काम निकृष्ट झाल्याची तक्रारही करण्यात आली होती़ त्यावर उत्तर देताना बांधकाम मंत्री पाटील म्हणाले की, महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळामार्फत प्रगतीपथावर असणाºया या राष्ट्रीय महामार्गावरील बांधकाम साहित्याच्या क्षमतेपेक्षा जास्त जड वाहतुकीमुळे रस्त्याची हानी झाली असून, याबद्दल संबंधित महामंडळास सुचित करण्यात आले आहे़
४आज रोजी नादुरुस्त लांबीतील दुरुस्ती करून रस्ता वाहतुकीस सुस्थितीत ठेवण्यात आला आहे, असेही पाटील म्हणाले़ प्रत्यक्षात या रस्त्यावरील स्थिती वेगळी आहे़ या रस्त्याचे काम करताना व्यवस्थित दबाई करण्यात आली नव्हती़ तसेच साईड पट्टयाही भरण्यात आल्या नव्हत्या़ ५ किमीच्या या कामासाठी तब्बल दीड कोटी रुपयांचा निधी देण्यात आला होता़
४तसेच या रस्त्याची देखभाल दुरुस्ती ५ वर्षांच्या कालावधीत करणे आवश्यक असताना सदरील कंत्राटदाराने त्याकडे दुर्लक्ष केले आहे़ याला सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी जबाबदार आहेत़ त्यामुळे संबंधित अधिकारी व कंत्राटदारांवर कारवाई करण्याऐवजी बांधकाम मंत्र्यांनी त्यांना अभय दिल्याचे दिसून येत आहे़
परभणी-गंगाखेड, सोनपेठ-गंगाखेड रस्त्याचा उल्लेख टाळला
४विधान परिषदेत विचारण्यात आलेल्या प्रश्नात परभणी-गंगाखेड, सोनपेठ- गंगाखेड, जिंतूर- नागेश्वरवाडी (औंढा नागनाथ), सेलू-पाथरी-सोनपेठ आदी रस्त्यांबाबतचीही माहिती विचारण्यात आली होती; परंतु, बांधकाम मंत्री पाटील यांनी या रस्त्यासंदर्भातील मुद्दाच लेखी उत्तरातून गायब केला आहे़
४त्यामुळे आॅन दी रेकॉर्ड या रस्त्याच्या स्थितीची माहिती जाहीर होऊ शकलेली नाही़ परिणामी या रस्त्यांचे काम कधी पूर्ण होईल, हे अनिश्चित आहे़

Web Title: Parbhani: The completion of the Jyantur road will be inaugurated by April 2020

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.