परभणी : श्रमदानातून स्वच्छ केला शाळा परिसर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 26, 2018 12:51 AM2018-09-26T00:51:10+5:302018-09-26T00:51:55+5:30

येथील जिल्हा परिषद प्रशालेतील विद्यार्थी व शिक्षकांनी २४ सप्टेंबर रोजी श्रमदान करून शाळेचा परिसर स्वच्छ केला.

Parbhani: cleaned the school premises | परभणी : श्रमदानातून स्वच्छ केला शाळा परिसर

परभणी : श्रमदानातून स्वच्छ केला शाळा परिसर

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
गंगाखेड (परभणी) : येथील जिल्हा परिषद प्रशालेतील विद्यार्थीशिक्षकांनी २४ सप्टेंबर रोजी श्रमदान करून शाळेचा परिसर स्वच्छ केला.
येथील गटसाधन केंंद्राजवळ असलेल्या जिल्हा परिषद शाळेच्या मैदानावर मोठ्या प्रमाणावर गाजरगवत, बाभळीची झाडे वाढली होती. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला होता.
गटशिक्षणाधिकारी बालाजी सगट, अ‍ॅड. शेख कलीम, प्रमोद मस्के यांच्या पुढाकारातून मुख्याध्यापक भगवान ठुले यांंनी शाळेतील शिक्षक, विद्यार्थ्यांना एकत्र करून स्वछतेला प्रारंभ केला. विद्यार्थी, शिक्षकांनी श्रमदान करून गाजरगवत, बाभळीची झाडे तोडली. तसेच या परिसरात झालेला कचरा साफ करून या कचऱ्याची विल्हेवाट लावली. त्यामुळे शाळेचा परिसर स्वच्छ झाला आहे.
या उपक्रमामध्ये मुख्याध्यापक भगवान ठुले, वैशाली जाधव, ज्योती कसबे, मनीषा सोनकांबळे, रेणुकादास पिंपरखेडकर, पोशेट्टी गोपोड, राजेश्वरी खनपटे, जयदीप फड या शिक्षकांबरोबरच आठवी, नववी व दहावी वर्गातील प्रेरणा सोनकांबळे, रेखा वाघमारे, सत्यशीला तांदळे आदी विद्यार्थिनींनी सहभाग नोंदविला.

Web Title: Parbhani: cleaned the school premises

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.